आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 2, 2012

ऋतू प्रमाणे पानांची पूजा

अधिक माहिती ऋतु प्रमाणे झाडांची पाने ह्या ब्लॉग मध्ये ५ सप्टेंबर २०११ ला लिहिली आहे. तो ब्लॉग अवश्य वाचावा.

श्री स्वस्ति शालिवाहनशक ऋतू प्रमाणे पानांची पूजा करतात. त्या पानांची पूजा घरात केलेली आहे. त्याची रोपं दाखवीत आहे.

सर्व छायाचित्र एकत्र पाहण्यास चांगली वाटतील हे नक्कीच !

aca1f8502b4e  DSCF0810  DSCF0827  DSCF1210dscf1827  DSCF1949DSCF1991  DSCF2682  DSCF2711  DSCF1130  कडुनिंब

मनाचे श्लोक

    ॐ
|| श्रीहरि: ||
श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित
मनाचे श्लोक ( मराठी )
मना ना कळे ना ढळे रूप ज्याचें |
दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचें |
तया खूण ते हीण दृष्टान्त पाहे |
तेथें संग निसंग दोनी न साहे || १९२ ||
नव्हे जाणता नेणता देवराणा |
न ये वर्णितां वेदशास्त्रां पुराणां |
नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा |
श्रुती नेणती नेणती अंत त्याचा || १९३ ||
वसे हृदयीं देव तो कोण कैसा |
पुसे आदरें साधकु प्रेष्ण ऐसा |
देहे टाकितां देव कोठें रहातो |
परी मागुता ठाव कोठें पाहतो || १९४ ||
वसे हृदयीं देव तो जाण ऐसा |
नभाचे परी व्यापकु जाण तैसा |
सदा संचला येत ना जात कांहीं |
तयावीण कोठें रिता ठाव नाहीं || १९५ ||
नभीं वावरे जो अणुरेणु कांहीं |
रिता ठाव या राघवेंवीण नाहीं |
तया पाहतां पाहतां तेंचि जाले |
तेथें लक्ष आलक्ष सर्वै बुडालें || १९६ ||
नभासारिखें रूप या राघवाचें |
मनीं चिंतितां मूळ तूटे भवाचें |
तया पाहतां देहबुधी उरेना |
सदा सर्वदा आर्त पोटीं पुरेना || १९७ ||
नभें व्यापिलें सृष्टीस आहे |
रघूनायेका ऊपमा ते न साहे |
दुजेवीण जो तोचि तो हा स्वभावें |
तया व्यापकु व्यर्थ कैसें म्हणावें || १९८ ||

%d bloggers like this: