ॐ
|| श्रीहरि: ||
श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित
मनाचे श्लोक ( मराठी )
मना ना कळे ना ढळे रूप ज्याचें |
दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचें |
तया खूण ते हीण दृष्टान्त पाहे |
तेथें संग निसंग दोनी न साहे || १९२ ||
नव्हे जाणता नेणता देवराणा |
न ये वर्णितां वेदशास्त्रां पुराणां |
नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा |
श्रुती नेणती नेणती अंत त्याचा || १९३ ||
वसे हृदयीं देव तो कोण कैसा |
पुसे आदरें साधकु प्रेष्ण ऐसा |
देहे टाकितां देव कोठें रहातो |
परी मागुता ठाव कोठें पाहतो || १९४ ||
वसे हृदयीं देव तो जाण ऐसा |
नभाचे परी व्यापकु जाण तैसा |
सदा संचला येत ना जात कांहीं |
तयावीण कोठें रिता ठाव नाहीं || १९५ ||
नभीं वावरे जो अणुरेणु कांहीं |
रिता ठाव या राघवेंवीण नाहीं |
तया पाहतां पाहतां तेंचि जाले |
तेथें लक्ष आलक्ष सर्वै बुडालें || १९६ ||
नभासारिखें रूप या राघवाचें |
मनीं चिंतितां मूळ तूटे भवाचें |
तया पाहतां देहबुधी उरेना |
सदा सर्वदा आर्त पोटीं पुरेना || १९७ ||
नभें व्यापिलें सृष्टीस आहे |
रघूनायेका ऊपमा ते न साहे |
दुजेवीण जो तोचि तो हा स्वभावें |
तया व्यापकु व्यर्थ कैसें म्हणावें || १९८ ||
मनाचे श्लोक
ऑगस्ट 2, 2012
प्रतिक्रिया व्यक्त करा