आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 3, 2012

ब्लॉग पोष्ट ७४२वां:

                               ॐ
ब्लॉग पोष्ट ७४२ वां : दिनांक तारीख ३ ऑगष्ट २०१२ साल ला
माझा ब्लॉग पोष्ट सातशे बेचाळीस ७४२ वा होत आहे. आता पर्यंत
श्रावण पौर्णिमा, दिवे,प्रयत्न, मटकीची उसळ, नागपंचमी, रवा बेसन लाडू ,
ऋतु प्रमाणे पानांची पूजा यांचे छायाचित्र फोटो लावलेले आहेत.मुख्य म्हणजे
मनाचे श्लोक श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित ( मराठी )मधून लिहिलेले मी
संगणक मध्ये लिहून काढले आहेत. चार ओळीचे एक कडव असे २०५ कडवे लिहून
मी काढली आहेत.एवढी शक्ती व इतका वेळ बसून लिहिणे मला जमले आहे.वेळ आहे
म्हणून नव्हे एवढी ताकद मला श्रीसमर्थ रामदासस्वामी यांनी दिली.श्रीरामदासस्वामी नां
माझा मनापासून नमस्कार ! एका ब्लॉग मध्ये ८ कडवे आहेत. लवकर तसे मनाचे श्लोक
लिहिले गेले आहेत हे पण महत्वाचे आहे.मनाचे श्लोक यांना एक फुली आली आहे.म्हणजे
मनाचे श्लोक पण वाचक वाचतात.
आपण सर्वांनी माझा ब्लॉग वाचन करून प्रतिक्रिया दिल्यात भेटी दिल्यात त्या बद्दल बध्दल
धन्यवाद ! धंयवाद ! भेटी आता पर्यंत ६४,५५९ आहेत.

                                    DSCF2701

पाऊस !

                                               ॐ
पाऊस : स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर आषाढ महिनात
व तसेच २०१२ साल मध्ये जून महिनात पाऊस कमी पडला.पडला नाही च म्हटले तरी
चालेल, पण श्रावण शुक्लपक्ष जुलै महिनात पाऊस तसा चांगला झाला.
राधानगरी धरण बुधवार सकाळी भरले दोन दरवाजे उघडले. ११ वाजता पूर्ण क्षमतेने
भरल्याने धरणाचे ३ आणि ६ क्रमांकाचे दोन स्वयंचलित दरवाजे ११ वाजता ५० मिनिटांनी
उघडले.त्यामुळे धरणाच्या दारावादातून २८०० क्युसेक्स तर वीज निर्मितीतून दोन हजार असा
एकूण ४ हजार ८०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरु आहे.यामुळे भोगावती ची
पातळी वाढली आहे.धरणात ८ हजार २७५.४ द.ल.घ.फुट पाणीसाठा असून ३४७.४५ फुट पाणी पातळी आहे.
ही माहिती पुढारी २ ऑगस्ट २०१२ गुरुवार च्या कोल्हापूर पान ३ अंकात पेपर मध्ये आहे.
महाबळेश्वर, कोयना वारणा राधानगरी सर्वच धरणात पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
कोयना धारण ५४ टक्के भरले आहे.ही माहिती महाराष्ट्र टाइम्स २ ऑगस्ट २०१२ पान ५ अंकात पेपर
मध्ये आहे.

                              DSCF2712  DSCF2713  DSCF2715

मनाचे श्लोक

     ॐ
|| श्रीहरि: ||
श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित
मनाचे श्लोक (मराठी )
अती जीर्ण विस्तीर्ण तें रूप आहे |
तेथें तर्क संपर्क तोही न साहे |
अती गूढ तें दृढ तत्काळ सोपें |
दुजेवीण जे खूण स्वामीप्रतापें || १९९ ||
कळे आकळे रूप तें ज्ञान होतां |
तेथें आटली सर्व साक्षी अवस्था |
मना उन्मनीं शब्द कुंठीत राहे |
तो गे तो चि राम सर्वत्र पाहे || २०० ||
कदा वोळखीमाजि दूजें दिसेना |
मनीं मानसीं व्दैत कांही वसेना |
बहूतां दिसां आपुली भेटि जाली |
विदेहीपणें सर्व काया निवाली || २०१ ||
मना गूज रे तूज हें प्राप्त जालें |
परी अंतरीं पाहिजे येत्न केले |
सदा श्रवणें पाविजे निश्र्चयासी |
धरीं सज्जनसंगती धन्य होती || २०२ ||
मना सर्वही संग सोडूनि द्दावा |
अती आदरें सज्जनाचा धरावा |
जयाचेनि संगें महां दु:ख भंगे |
जनीं साधनेंवीण सन्मार्ग लागे || २०३ ||
मना संग हा सर्व संगास तोडी |
मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी |
मना संग हा साधकां शीघ्र सोडी |
मना संग हा व्दैत निशेष मोडी || २०४ ||
मनाचीं शतें ऐकतां दोष जाती |
मतीमंद ते साधना योग्य होती |
चढें ज्ञान वैराग्य सामथ्यें आंगीं |
म्हणे दास विश्र्वासतां मुक्ति भोगी || २०५ ||
|| जय जय रघुवीर समर्थ ||
____________________________________

%d bloggers like this: