रथसप्तमी
ॐ
रथसप्तमी
माघ शुध्द सप्तमीला रथसप्तमी म्हणातात.हा
दिवस सूर्यदेवाप्रीत्यर्थ पाळावा असे भविष्यादिक
पुराणात सांगितले आहे.सूर्य हा एक तेजोमय गोल
आहे व त्याच्याभोवती पृथ्वीसारखे इतर कित्येक
गोल फिरत असतात हे खरे आहे.तथापि सूर्याकडून
मानवी सुखास साह्यभूत अशा गोष्टी घडून येत
असल्यामुळे त्याला प्राचीनकाळी देव मानू लागले व
अर्थातच त्याची पूजा सुरु झाली. सूर्यापासनेचा
मुख्य हेतू आरोग्य व तदनुषंगाने उत्पन्न होणारे सुख
भोगावे हा आहे.
हा मन्वतराचा पहिला दिवस असून या दिवशी
सूर्यनारायणाची स्वारी सात घोडे जुंपिलेल्या नवीन
रथातून आकाशमार्गाने फिरावयास निघते या समजुतीने
त्याला रथसप्तमी हे नाव मिळाले आहे.