आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 9, 2012

मुळा व मुळा चा पाला

                                         ॐ
मुळा व मुळा चा पाला : मुळाचा पाला सगट पांच रुपये (५) एक मिळाला.
मी १० दहा रुपये चे दोन पाला सगट मुळा आणला. घेतला.मुळा चा पाला एकत्र केला.
धुतला.विळी वर बसून ताटात मुळा चा पाला विळी च्या पातीने बारीक चिरून घेतला.
गॅस पेटवून पातेले ठेवले.तेल व मोहरी ची फोडणी केली.फोडणीत चिरलेला मुळा चा पाला
घातला.पाणी अर्धा भांड मुळाच्या पाल्याच्या भाजीत घातले.चांगले.शिजवू दिले.मुळाचा पाला
शिजल्या नंतर लाल तिखट मीठ हळद घातली.हिंग घातला नाही.मुळा चा वास चांगला येतो.
सर्व हलवून घेतले.त्यात डाव भर चना हरबरा डाळीचे पीठ घातले.परत मुळा चा पाला हरबरा डाळीचे
पीठ लाल तिखट मीठ हळद एला मोहरी ची फोडणी सेवा एकत्र हलवून वाफं आणली.परत हलवून वाफं आणली.
मुळा चा पाला याची भाजी चांगली केली.तयार झाली.बाऊल मध्ये मध्ये काढली.मुळा चा पाला ची भाजी शिजे पर्यंत
पांढरा मुळा किसणीने थोडा किसाला.त्यातील पाणी पिळले नाही.मुळाच्या किसा मध्ये मीठ शेंगदाणे याचा दोन चमचे कुट
घातला तिखट घातले नाही.मुळा तिखट असतो तेवढा व ती चव चांगली लागते .मुळाची कोशिंबीर तयार केली.
मुळाचा पालाची भाजी व मुळा ची कोशिंबीर तयार केली.त्याचे छायाचित्र फोटो काढला मीचं !

                   DSCF2720 DSCF2721  DSCF2722

शास्त्रोक्त विधी व रूढी

               ॐ
शास्त्रोक्त विधी व रूढी
या सप्तमीला पूर्वदिवशी उपोषण करावे व रात्र
संपताच अरुणोदयसमयी मस्तकावर दीप धारण
करून स्वच्छ व निश्र्चल अशा पाण्यात शिरावे,तेथे
सूर्योदयापर्यंत स्नान केल्यानंतर पुन्हा मस्तकावर दीप
घेऊन सूर्याचे ध्यान करावे व तो दिवा पाण्यात सोडून
द्दावा तसेच दुसरेही दिवे सूर्याप्रीत्यर्थ पाण्यात तरंगत
सोडावेत स्नानाच्या वेळी रुईची, बोरीची सातसात
पाने मस्तकावर ठेवून घ्यावी.स्नान व श्रीसर्यनारायणाची
प्रार्थना करून घरी आल्यावर देव तर्पण करून तुळसीवृंदानासमोर
सूर्यासह सात घोडे जुंपलेल्या रथाचे चित्र काढावे व त्याची पूजा करून,
गोवऱ्या पेटवून त्यांच्यावर मातीचा भाड्यांत तयार केलेल्या दह्याच्या
खिरीचा सूर्यास नैदेद्द दाखवावा. ब्राह्मणास धनधान्याचे दान द्दावे,ब्राह्मण व
सुवासिनी यांच्यासमवेत भोजन करावे.आपल्याकडे रथसप्तमीप्रीत्यर्थ खीर
करण्याचा संप्रदाय प्राय: सर्वत्र दिसून तेतो.

%d bloggers like this: