आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 10, 2012

सौ. सूनबाई


सौ.सूनबाई (सौ .अनु )
मी व हे सौ.सूनबाई व मुला कडे अमेरिका येथे गेलो होतो.
त्यांनी असाच रेडीओ लावला.त्यात गाणं ओळखायचं व कोण
कोणी लिहिले कोणत्या सिनेमात आहे हे झटपट रेडोओ वर सांगायचे.
लवकर सांगितले की पहिला नंबर देत.व निकाल पण सर्व गाणी झाल्या नंतर लगेच चं
देत. आमच्या सौ सूनबाई ला पहिला क्रमांका चे बक्षीस मिळाले.त्यात ड्रेस वा किंवा साडी मिळाली.
आमच्या सौ.सुनबाई हिने मला मॉल मध्ये नेले. व साडी पसंत करायला सांगितली.व ती बक्षीस याची साडी
सौ.सूनबाई सौ अनु ने मला दिली.तिच्या बक्षीस ची साडी मला घेतांना पण मला अभिमान झाला वाटला.
मी ती बक्षीस ची साडी नसले.सौ सुनबाई हिने माझा बक्षीस च्या साडीचा माझा फोटो काढला.
आपल्याला मिळालेले बक्षीस आपल्या सौ.सासू ला (त्यावेळा ) द्दावे द्यावे ही चं मोठी आदराची ठेवण आहे.
तूं तूं मे मे

DSCF3385.jpg

मुळा

                                         ॐ
मुळा : सकाळी ८ वाजतां मुगाची डाळ भिजत टाकली. घातली.
संध्याकाळी ६ वाजतां पर्यंत मुगाची डाळ चांगली मऊ झाली.भिजली.
राहिलेला मुळा विळीवर बसून विळी च्या पाताने भाजी सारखा चिरून घेतला.
गॅस ची शेगडी पेटवून भांडे ठेवले तेल मोहरी ची फोडणी केली.तेल मोहरी च्या
फोडणीत भिजलेली मुगाची डाळ घातली.टाकली.हरबरा डाळ पण चालते.हरबरा डाळीचे
पीठ मुळाच्या पाला याला लावले.आता मुग डाळ वेगळी चव असावी.मुगाच्या डाळीत पाणी
घालून मुगाची डाळ शिजविली.मुळा चिरलेला भाजी मुगाच्या डाळीत घातला.परत थोड पाणी
घालून मुळा व मुगाची डाळ शिजविली.पचण्यास व चावण्यास सोपे जाते.पांचट होत नाही.
नंतर हळद मीठ लाल तिखट घातले. झाकण ठेवून वाफ आणली.थोडे पाणी रस मुळाच्या व
मुगाच्या डाळीत तिखट मीठ हळद तेल मोहरी फोडणी सर्व वाफ झाकण ठेवून आणली.
छान मुळा मुगाची डाळ तिखट मीठ हळद तेल मोहरी ची फोडणी सर्व एकत्र भाजी बाऊल मध्ये
काढली.फोटो काढला. मीच !

                                        DSCF2726

सूर्योपासना

सूर्योपासना
सूर्योपासना करण्याची पध्दती वेदकाली होती हे
सूर्यासंबंधीच्या प्रार्थनावरून स्पष्ट दिसते.सूर्य
आपल्या पापांचे क्षालन करतो अशी प्राचीन आर्यांची
भावना असल्यामुळे त्यांनी आपल्यास पापमुक्त
करण्यासाठी सूर्याची प्रार्थना केलेली ऋग्वेदात आढळते.
आठवड्यातील पहिल्या वारास जुन्या कालापासून सूर्याचे
नाव देण्यात आले आहे.यावरून जगात सर्वत्र सूर्याबद्दल प्राचीन
काळापासून पूज्यभाव व्यक्त होत आहे असे दिसते.ज्याप्रमाणे
शिवोपासकांना शैव,विष्णूच्या भक्तांना वैष्णव, त्याचप्रमाणे
सूर्यभक्तांना सौर असे म्हणतात. सूर्यनारायणाची प्रार्थना त्रिकाळ
करणे हे आजतागायत वैदिक धर्माचे एक प्रधान अंग होऊन बसले आहे.

DSCF2702

%d bloggers like this: