ॐ
मुळा : सकाळी ८ वाजतां मुगाची डाळ भिजत टाकली. घातली.
संध्याकाळी ६ वाजतां पर्यंत मुगाची डाळ चांगली मऊ झाली.भिजली.
राहिलेला मुळा विळीवर बसून विळी च्या पाताने भाजी सारखा चिरून घेतला.
गॅस ची शेगडी पेटवून भांडे ठेवले तेल मोहरी ची फोडणी केली.तेल मोहरी च्या
फोडणीत भिजलेली मुगाची डाळ घातली.टाकली.हरबरा डाळ पण चालते.हरबरा डाळीचे
पीठ मुळाच्या पाला याला लावले.आता मुग डाळ वेगळी चव असावी.मुगाच्या डाळीत पाणी
घालून मुगाची डाळ शिजविली.मुळा चिरलेला भाजी मुगाच्या डाळीत घातला.परत थोड पाणी
घालून मुळा व मुगाची डाळ शिजविली.पचण्यास व चावण्यास सोपे जाते.पांचट होत नाही.
नंतर हळद मीठ लाल तिखट घातले. झाकण ठेवून वाफ आणली.थोडे पाणी रस मुळाच्या व
मुगाच्या डाळीत तिखट मीठ हळद तेल मोहरी फोडणी सर्व वाफ झाकण ठेवून आणली.
छान मुळा मुगाची डाळ तिखट मीठ हळद तेल मोहरी ची फोडणी सर्व एकत्र भाजी बाऊल मध्ये
काढली.फोटो काढला. मीच !
मुळा
ऑगस्ट 10, 2012
प्रतिक्रिया व्यक्त करा