आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 11, 2012

हेतू व बोध

     ॐ
हेतू व बोध
परमेश्र्वरासंबंधाने ज्यांनी म्हणून आजवर विचार
केला, त्या सर्वांना आपल्या मनास पटल्या त्या ईशप्रात्पीच्या
दिशा दाखवून दिल्या. कोणी अग्नीची तर कोणी सूर्याची योग्यता
विशेष आहे असे मानून त्याच्या उपासनेचे गाइले.
कांलांतराने सर्व शक्तींचे अधिष्ठान एकच परमेश्र्वर आहे असे ठरले.
सूर्य, चंद्र,वायू,अग्नी,तारांगण,महासागर याम्च्याव्दारे परमेश्र्वराच्या
अगाधत्वाबाद्दल कल्पना होत असून त्यांच्या उपासनेच्या योगाने
परमपदाची प्राप्ती करून घेण्याचा पंथ खरोखर उदात्त स्वरूपाचा होय.
श्रीसूर्यनारायण सर्वांस आयुरारोग्य व ज्ञानप्रकाश देवो हीच त्याच्या
चरणी प्रार्थना आहे.
  * * *

%d bloggers like this: