आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 14, 2012

श्रावण सोमवार

                         ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
श्रावण कृष्णपक्ष चौथा सोमवार शिवमुष्टि जवस एकादशी
असली तरी शिवाला महादेव यांना जवस देतात.
तसेच दिनांक तारीख १३ ऑगस्ट (८) २०१२ सोमवार आहे.
कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर येथे वरील दगडा च्या पायऱ्या
वाकड्या असल्या तरी भक्त त्या महादेवाला जातात.तेथे गणपती चे
पण देऊळ आहे.अंधार असतो थोड पुढे नंदी पण आहे.त्याचे पण दर्शन घेतात.
मी काल तेथे गेले होते प्लॅस्टिक च्या पिशवीत वाटीभर जवस नेले व महादेवाला दिले.
नुसते टाकले तर वाहून फुकट जातात.इतर भक्त पण बेलाच पण व इतर देत होते.
अतिबलेश्वर, स्टॅन्ड जवळ वटेश्वर मंदिर उत्तरेश्वर पेठेतील महादेव मंदिर मंगळवार
पेठेतील रावणेश्वर व कैलासगड ची स्वारी काशीविश्वेश्वर मंदिर कपिलतीर्थ मंदिर
शुक्रवार पेठेतील ऋणमुक्तेश्वर मंदिर सोमेश्वर मंदिर आणि लहान मोठ्या महादेव येथे
भक्त भाविक गर्दीने देवदर्शन घेतले आहे.

                       DSCF2731

श्रीज्ञानदेव – हरिपाठ

        ॐ
|| श्रीज्ञानदेव – हरिपाठ ||
भावेंविण भक्ति भक्तिवीण मुक्ति |
बळेंवीण शक्ति बोलूं नये || १ ||
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित |
उगा राहे निवांत शिणसी वायां || २ ||
सायास करिसी प्रपंच दिननिशीं |
हरिसी न भजसी कोण्या गुणें || ३ ||
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणें |
तुटेल धरणें प्रपंचाचें || ४ || ध्रु O ||
योगयाग विधि येणें नोहे सिध्दि |
वायांचि उपाधि दंभ धर्म ||१ ||
भावेंवीण देव न कळे नि:संदेह |
गुरुविणें अनुभव कैसा कळे || २ ||
तपेंवीण दैवत दिधल्याविण प्राप्त |
गुजेंवीण हित कोण सांगे || ३ ||
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात |
साधूंचे संगतीं तरणोपाय || ४ || ध्रु O ||

%d bloggers like this: