आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 16, 2012

स्वातंत्र्य

                                         ॐ
स्वातंत्र्य : देश स्वातंत्र्य झाला.लोकशाहि आहे.खूप देशाशाठी कांहीं तरी करावे
वाटणं सहाजिक चं आहे. सर्व नागरिकांना सोयी सवलती नोकरी हवी आहे.
आपला प्रांत मोठा सोयी सवलती चा हवा आहे.हे पूर्ण पटत.
म्हणून सरकार च्या बस गाड्या इतर वाहन खराब करून कोटी चे नुकसान होते
ते भरून येत नाही दुरुस्त करणे ही होत नाही दुसऱ्या देशा चा ध्वज झेंडा जाळून कधी ही
ही चूक भरून निघणार नाही.प्रत्येक ध्वज झेंडा मध्ये प्रत्येक नागरीक असतो.ही जाणीव
ठेवणे गरजेचे आहे.
आज १५ ऑगष्ट आहे. पण पेपर वर्तमान पत्र उघडल्या नंतर माजी महाराष्ट्र मुख्यमंत्री विलासराव देशमुख
यांचे निधन बातमी !हळहळ वाटली.१५ ऑगष्ट चा दिवस झेंडा उभा केला असला तरी
मनात रुखरुख आहे सर्वांच्याच !दुसऱ्या देशा चा स्वातंत्र्य दिवस आपण त्यांचा ध्वज झेंडा जाळतो.
आपला ध्वज १५ ऑगष्ट ला कसा उभा आहे हे लक्षात येते.
कोणत ही काम विचार पूर्वक विचार पूस करून करायला हवें !

                             DSCF2729

श्रीज्ञानदेव-हरिफाठ

         ॐ
|| श्रीज्ञानदेव-हरिफाठ ||
संतांचें संगति मनोमार्ग गति |
आकळावा श्रीपति येणें पंथें || १ ||
रामकृष्ण वाचा भाव हा जिवाचा |
आत्मा जो शिवाचा रामजप || २ ||
एक तत्व नाम साधिती साधन |
व्दैताचें बंधन न बाधिजे || ३ ||
नामामृत गोडी वैष्णवां लाधली |
योगियां साधली जीवनकळा || ४ ||
सत्वर उच्चार प्रल्हादीं बिम्बला |
उध्दवा लाधला कृष्णदाता || ५ ||
ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ |
सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे || ६ ||
विष्णुवीण जप व्यर्थ त्याचें ज्ञान |
रामकृष्णिं मन नाहीं ज्याचें || १ ||
उपजोनि करंटा नेणें अव्दय वाटा |
रामकृष्णिं पैठा कैसेनि होय || २ ||
व्दैताची झाडणी गुरुविणें ज्ञान |
त्यां कैचें कीर्तन घडे नामीं || ३ ||
ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान |
नामपाठ मौन प्रपंचाचें || ४ || ध्रु O ||

%d bloggers like this: