आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 17, 2012

श्रावण अमावास्या

                                         ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर दक्षिणायन वर्षाऋतु
आश्लेषा नक्षत्र कर्क राशिप्रवेश शुक्रवार श्रावण कृष्णपक्ष ३० दर्श पिठोरी अमावास्या
तसेच दिनांक तारीख १७ ऑगस्ट २०१२ साल आहे.
पोळा मातृदिन आहे.
हा दिवस पोळा अमावास्या भारतीय पंचाग प्रमाणे मातृदिन साजरा करतात.
बैल याची पूजा करतात.शेवया ची खीर करतात.साधी कणिक याची पुरी करतात.
मुलगा व मुलगी यांना आई दोरे याला हळद कुंकू लावून वाण देते.शेवया ची खीर पुरी देते
अशा प्रकारे पोळा श्रावण अमावास्या मातृदिन साजरा करतात.

                    DSCF2733 शेवया

                  DSCF2723    DSCF0356

श्रीज्ञानदेव-हरिपाठ

        ॐ
|| श्रीज्ञानदेव-हरिपाठ ||
त्रिवेणी संगमीं नाना तीर्थें भ्रमीं |
चित्त नाहीं नामीं तरी तें व्यर्थ ||१||
नामासी विन्मुख तो नर पापिया |
हरिवीण धांवया न पवे कोणी ||२||
पुराणप्रसिध्द बोलिले वाल्मीक |
नामें तिन्ही लोक उध्दरती ||३||
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचें |
परंपरा त्याचें कुळ शुध्द ||४||ध्रु O ||
हरि उच्चारणीं अनंत पापराशी |
जातील लयासी क्षनमात्रें ||१||
तृण अग्निमेळें समरस झालें |
तैसें नामें केलें जपतां हरि ||२||
हरि उच्चारणीं मंत्र पैं अगाध |
पळे भूतबाधा भेणें तेथें ||३||
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ |
न करवे अर्थ उपनिषदां ||४|| ध्रु O ||

तीर्थ व्रत नेम भावेंवीण सिध्दि |
वायांचि उपाधि करिसी जना ||१||
भावबळें आकळे एऱ्हवीं नाकळे |
करतळीं आंवळे तैसा हरि ||२||
पारियाचा रवा घेतां भूमीवरी |
यत्न परोपरी तैसें ||३||
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण |
दिधलें संपूर्ण माझे हातीं ||४||ध्रु O ||

%d bloggers like this: