आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 18, 2012

निसर्ग गुलमोहर

गुलमोहर : भर उन्हाळा एप्रिल व मे महिनात उत्तरायण शिशिर ऋतु
फाल्गुन व चैत्र पाडवा हया महिनात गुलमोहर ला छान लाल,
पिवळी,केशरी फुले येतात.गुलमोहर अगदी भरून भर उन्हात ताजा तवाना
उभा असतो.पाहंतान पण मस्त टवटवीत वाटतो दिसतो.आमच्या अपार्टमेंट मध्ये
पण पिवळे लाल रंगाचे गुलमोहर चे झाडं आहे. गुढी उभी केली की पिवळे फुल व हिरवी
पान व गुढी छान दिसते.

तसेच एक झाड त्यालाच हिरवी पान पांढरे आकाश केशरी फुल गुलमोहर ची असे एकत्र मिळून
भारत याचा झेंडा ध्वज तयार झाला आहे. चक्र म्हणजे सर्व प्रांत एकत्र आकाश आहे.
एकाच झाडाला हिरवा पांढरा केशरी रंग आहे याचे छायाचित्र फोटो संगणक मध्ये मिळाले आहे.
ते मी ब्लॉग मध्ये एक झाड केशरी पांढरा हिरवा रंग असलेले मी दाखवीत आहे.भारत झेंडा निसर्ग
याने केलेला आहे पाहण्यास नक्कीच छान वाटणार !

श्रीज्ञानदेव-हरिपाठ

          ॐ
|| श्रीज्ञानदेव-हरिपाठ ||
समाधि हरिची समसुखेंवीण |
न साधेल जाण व्दैतबुध्दि ||१||
बुध्दिचें वैभव अन्य नाहीं दुजें |
एका केशवराजें सकळ सिध्दि ||२||
ऋध्दि सिध्दि निधि अवघीच उपाधि |
जंव त्या परमानंदीं मन नाहीं ||३||
ज्ञानदेवा रम्य रमलें समाधान |
हरिचें चिंतन सर्वकाळ ||४||ध्रु O ||
नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी |
कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टीं ||१ ||
रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप |
पापाचे कळप पळती पुढें ||२||
हरि हरि हरि हा मंत्र शिवाचा |
म्हणती जे वाचा तयां मोक्ष ||३||
ज्ञानदेवा पाठ नारायण |
पाविजे उत्तम निजस्थान ||४|| ध्रु O ||
एक नाम हरि व्दैतनाम दुरी |
अव्दैतकुसरी विरळा जाने ||१||
समबुध्दि घेतां समान श्रीहरि |
शमदमावरी हरि झाला ||२||
सर्वांघटीं राम देहादेहीं एक |
सूर्य प्रकाशक सहस्त्ररश्मि ||३||
ज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा |
मागिलिया जन्मां मुक्त झालों ||४|| ध्रु O ||

%d bloggers like this: