आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 19, 2012

कांद्याचीपात

                                                ॐ
कांदा याची पात : कांद्याचीपात : कांदाचीपात भाजी पाच (५)एक जुडी पेंडी मिळाली.
मी एक पेंडी घेतली.कांदाचीपात धुतली.बारीक विळीने चिरली.कांदा व कांदाचीपात दोन्ही
एकत्र केली.गॅस पेटवून पातेले ठेवले तेल मोहरीची फोडणी केली.त्या फोडणीत चिरलेली
कांदा व कांदाचीपात घातली.टाकली.कळत न कळत पाणी घातले.झाकण ठेवले.चांगली
कांदा व कांदाचीपात शिजली.मीठ, लाल तिखट, हळद,हिंग घातला नाही.कांदा याचा वास चांगला येतो.
परत परतून घेतले.हरबरा डाळीचे पीठ लावतात.मी लावले.नाही नुसती परतून चांगली लागते.एक चमचा
शेंगदाणे कूट घातला परत झाकण ठेवून कांदा कांदाचीपात मीठ,लाल तिखट शेंगदाणे चा कूट एकत्र करून वाफ
आणली.चांगली कांदा व कांदाचीपात याची भाजी तयार झाली.केली.डिश मध्ये काढून छायाचित्र काढले मी चं!
कोणताही पदार्थ मध्ये मीठ तिखट तेल मोहरी पाणी याची चव असते.मूळ चं भाजी उसळ यांना चव असते.तीच
चव ठेवावी म्हणजे पदार्थ याला चव येते असते.
माझ्या सौ.सासूबाई नेहमी म्हणत कोल्हापूर ला पदार्थ याला चं चव आहे.पूर्वी सकाळ चे सकाळी व रात्रीचे
रात्री पदार्थ पोळी पण संपत.संध्याकाळी भाकरी इतर भाजी असे.फ्रीज घरी नसायचे चं.

                         

                         DSCF2735    DSCF2736

श्रीज्ञानदेव-हरिपाठ

          ॐ
|| श्रीज्ञानदेव-हरिपाठ ||

हरिबुध्दि जपे तो नर दुर्लभ |
वाचेसी सुलभ रामकृष्ण ||१||
रामकृष्ण नामीं उन्मनी साधली |
तयासी लधली सकळ सिध्दि ||२||
सिध्दि बुध्दि धर्म हरिपाठीं आले |
प्रपंची निवाले साधुसंगे ||३||
ज्ञानदेव नामें रामकृष्ण ठसा |
तेणें दशदिशा आत्माराम ||४|| ध्रु O ||
हरिपाठ कीर्ति मुखें जरी गाय |
पवित्र तो होय देह त्याचा ||१||
तपाचें सामथ्यें तपिन्नला अमूप |
चिरंजीव कल्प वैकुंठिं नांदे ||२||
मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार |
चतुर्भुज नर होउनि ठेले ||३||
ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाभलें |
निवृत्तीनें दिधलें माझे हातीं ||४|| ध्रु O ||

%d bloggers like this: