रमजान ईद
ॐ
रमजान ईद : दिनांक तारीख २०१२ साल २० ऑगस्ट रमजान ईद आहे.
आमच्या भागात असेच मुस्लिम यांचे दुकान आहे.सर्वजण त्या दुकानात
दुध डाळी धान्य ब्रेड विकत घेतात.मी पण तेथून च सामान आणते. मला मावशी
म्हणतात. श्रावण अमावास्या झाली.मी सहज विचारले उपवास संपले !सोमवार
ला ईद आहे.म्हाणाले.पूर्वी आमचे साहेब असेच खीर खावयाला जात त्यांच्या बरोबर
घरी खीर पाठवीत.तर आज सकाळी दुकातील एकाने प्लॅस्टीक च्या पिशवीत खीर बांधून
पाठविली.मी म्हटले कांही देऊ का !नको! नको !खीर त शेवया दुध पिस्ता बदाम काजू साखर छान खीर
आहे.झाली.कसे माणसं जोडली जातात.पूर्वी च्या दुकानात कर्नाटक ह्यांनी घरी येऊन लग्नाची पत्रिका दिली.
असेच जैन दुकान ह्यांनी असेच बिस्कीट चा पुडा दिला.आपण पैसे देऊन सामान आणतो हे जरी खर असलं
तरी वागणूक कशी आहे माणुसकी लक्षात येते.
आज २० ऑगस्ट माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांचा वाढदिवस असतो.