भूईमुगाच्या शेंगा
ॐ
भूई मुगाच्या मुगाच्या जमिनीत भूई मुगाच्या शेंगा येतात. भूई मुगाच्या शेंगदाणे
वाळवून शेंगदाणे तयार होतात.जुलै ऑगस्ट मध्ये अशा प्रकारचे भूईमुगाच्या शेंगा मिळतात.
मध्यंतरी ३० रुपये पावशेर असायचे. आज मला १५ रुपये पावशेर मिळाले.आणले.कांही भूई मुगाच्या
शेंगा भाजल्या.कांही कुकर मध्ये पाणी व मीठ व भूईमुगाच्या शेंगा गॅस पेटवून कुकर ठेवला तीन चार
शिट्या कुकरला दिल्या.कुकर मधील भुईमुगाच्या शेंगा मीठ पाणी घातल्या मुळे छान मऊ व खारट आतील
शेंगदाणे तयार झाले.कुकर गार करून चाळणीत घातले.पाणी निथळू दिले.गरम च खाण्यास चांगले लागतात.
भाजलेले भुईमुगाच्या शेंगा पण मीठ लावून तसे पण खाल्ले.खातात