जीवन
ॐ
लहान पणी वाटतं शाळा नको आई काकू मोठ्या माणसा सारखं व्हावा.
फिरायला मिळते.खाऊ करून खाता येते.नतंर वाटतं लग्न व्हावं हौस मौज करावी.
नवरा बरोबर गप्पा मारता येतात.मुलं व्हावीत.घर सुंदर असावं.नतंर वाटतं सुना जावाई
यावेत.नातवंड व्हावीत.जग बघावं एवढं सर्व होतं !अरे ! आपण मोठे झालो की ! आता आपले
दात नीट नाहीत.केस पांढरे झालेत.शरीर याचं कातड वयस्कर मऊ ओढलं जात.अरे !आता काय करायचं
तरी पण माणूस उद्दोगात राहतो.फिरायला जातो गप्पा मारतो.खान करतो.तरी त्याला आपण लहान असताना व
तरुण असताना कसे दिसत ह्याची आठवण आली की तेच बरं होतं !तरी पण किती माझी सत्तरी ऐंशी वर्ष झाली.
वाढदिवस थाटात करतो.हे खर जीवन !