आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 23, 2012

ब्लॉग पोस्ट ७७७ वां

ब्लॉग पोस्ट ७७७ वां : दिनांक तारीख २३ ऑगस्ट (८) २०१२ साल ला माझा ब्लॉग पोस्ट सातशे सत्याहत्तर ७७७ वां होत आहे.

सूर्य व सूर्यस्तुति || श्रीज्ञानदेव-हरिपाठ|| लिहिले आहे.पुस्तक कॉपी असली तरी एवढे लिखान वाचून लिहितांना व घरात केव्हां ही चांगल वाटतं ! ह्या वयात ही नामस्मरण त्या निमित्त याने होतं !

तसेच मेरीची जीत, श्रावण अमावास्या, कांदा याची पात याची भाजी,मुळाचा पाला याची भाजी. भुईमुगाच्या शेंगा,पाऊस, जीवन असे बरेच विषय आहेत.लिहितांना खूप चांगल वाटतं.

पूर्वी पेन शाई कागद ह्या मध्ये काही लिहिले जायचे.आंगठा व चाफेकळी दोन बोटात धरून लिहिण्याची सवय असायची आता संगणक मराठी याचा वापर केला आहे मी सर्व जण हल्ली भाषा वापरून संगणक याचा वापर करतात.

आपण सर्वांनी वसुधालय ब्लॉग पोस्ट वाचून प्रतिक्रिया दिल्यात.भेटी दिल्यात त्या बध्दल बद्दल धंयवाद ! धन्यवाद !

भेटी ६८,८७८ आहेत.

DSCF2743 DSCF2745

श्रीज्ञानदेव-हरिपाठ

           ॐ
|| श्रीज्ञानदेव-हरिपाठ ||
नामसंकीर्तन साधन पैं सोपें |
जळतील पापें जन्मांतरींचीं ||१||
न लगती सायास जावें वनांतरी |
सुखें येतो घरा नारायण ||२ ||
ठाईंच बैसोनि करा एकचित्त |
आवडी अनंत आळवावा ||३||
रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा |
मंत्र हा जपावा सर्वकाळ ||४||
याहूनि आणीक नाही पैं साधन |
वाहतसे आण विठोबाची ||५||
तुका म्हणे सोपें आहे सर्वांहूनि |
शहाणा तो धणी घेत आहे ||६||
देव गुज सांगे पंढरीसी या रे |
प्रेमें चित्ती घ्या रे नाम माझें ||१||
सकळही चालवी भार त्यांचा ||२||
भवसिंधु तारीन घ्या रे माझी भाक |
साक्ष पुंडलिक करुनि बोलें ||३||
हे जरी लटिकें नामयासी पुसा |
आहे त्या भरंवसा नामीं माझ्या ||४||
देवाचिये व्दारी उभा क्षणभरी |
तेणें मुक्ति चारी साधियेल्या ||१||
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा |
पुण्याची गणना कोण करी ||२||
असोनि संसारीं जिव्हे वेगु करी |
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ||३||
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे |
व्दाराकेचे राणे पांडवां घरीं ||४||

%d bloggers like this: