आपले स्वागत आहे!

           ॐ
|| श्रीज्ञानदेव-हरिपाठ ||
नामसंकीर्तन साधन पैं सोपें |
जळतील पापें जन्मांतरींचीं ||१||
न लगती सायास जावें वनांतरी |
सुखें येतो घरा नारायण ||२ ||
ठाईंच बैसोनि करा एकचित्त |
आवडी अनंत आळवावा ||३||
रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा |
मंत्र हा जपावा सर्वकाळ ||४||
याहूनि आणीक नाही पैं साधन |
वाहतसे आण विठोबाची ||५||
तुका म्हणे सोपें आहे सर्वांहूनि |
शहाणा तो धणी घेत आहे ||६||
देव गुज सांगे पंढरीसी या रे |
प्रेमें चित्ती घ्या रे नाम माझें ||१||
सकळही चालवी भार त्यांचा ||२||
भवसिंधु तारीन घ्या रे माझी भाक |
साक्ष पुंडलिक करुनि बोलें ||३||
हे जरी लटिकें नामयासी पुसा |
आहे त्या भरंवसा नामीं माझ्या ||४||
देवाचिये व्दारी उभा क्षणभरी |
तेणें मुक्ति चारी साधियेल्या ||१||
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा |
पुण्याची गणना कोण करी ||२||
असोनि संसारीं जिव्हे वेगु करी |
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ||३||
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे |
व्दाराकेचे राणे पांडवां घरीं ||४||

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: