ॐ
|| श्री अधिकमास महात्म्य ||( व्रत व उपासना )
अधिकमास म्हणजे जास्तीचा महिना. दर तीन वर्षांनी येणाऱ्या या महिनास ‘अधिकमास ‘धोंडामास ‘ असे म्हणतात. शक संवत्सरात ३५५ दिवस, तर इंग्रजी वर्षात ३६५ दिवस असतात. त्या साठी शास्त्रकारांनी अधिकमास ठरविला आहे.दर तीन वर्षांनी (३२ महिने १६ दिवसांनी ) या अधिकमासा चे आगमन होते.
सूर्य प्रत्येक महिन्यास एक राशीचे संक्रमण करतो.अधिक महिन्यात सूर्याचे संक्रमण नसते; म्हणून अधिकमासास ‘मलमास’ असेही संबोधतात. या महिन्यात लग्नादी मंगलकार्य निषिद्ध असतात.
अधिकमासाचा स्वामी मुरलीधर श्रीकृष्ण आहे.अधिकमासात तीर्थस्थान, दानधर्म, उपवास, व्रते इत्यादी पुण्यकर्मे करतात.अधिकमासाचे आराध्य दैवत श्रीकृष्ण असल्याने त्याची मन:पूर्वक भक्ती करतात.
पुराणात अधिकमासाच्या कथा पुष्कळ आहेत. ‘ क्षयमास व अधिकमास ‘ अधिकमासात कोणत्याही राशीत सूर्याचे संक्रमण नसते.तसाही चमत्कार एखाद्दा महिनात घडून येतो.तेव्हा सूर्य दोन राशींचे संक्रमण करतो. त्या विशिष्ट महिन्यास ‘क्षयमास ‘असे म्हणतात.अशा वर्षात क्षयमास पाळण्याची पध्दत नसते. ते वर्ष १२ – १ = महिन्यांचे होईल ! या वर्षात दोन अधिक महिने येतात, म्हणजे ते वर्ष एकूण ११ +२ =१३ महिन्याचे होते. या दोन अधिक महिन्यांपैकी क्षयमासापूरवी अधिक महिना मंगलकार्य व पुण्यर्मास उपयुक्त नसतो. क्षयमासानंतर येणारा अधिक महिना वरील कार्यास उपयुक्त ठरतो.
क्षयमासाच्या या गणितात अनेक गमती-जमती आढळतात. १८२२ मध्ये क्षयमासाचे आगमन झाले होते. १९६३ मध्ये कार्तिकमासाचा क्षय झाला. या दोन कालावधीत १४१ वर्षांचे अंतर आहे.१९८२-८३ मध्येही म्हणजेच १९ वर्षांनी पौष महिन्याचा क्षय झाला, म्हणजेच पांचांगात पौष महिनाच नव्हता म्हणजे मार्गशीर्ष नंतर एकदम माघ महिना आला होता.
पौषातील संक्रांती चा नित्याचा सण १४ जानेवारी लाच आला होता. म्हणजेच मार्गशीर्ष कृष्ण अमावास्या हा पुण्यकाळ होता. आता २१०४ मध्ये क्षयमास यावयाचा आहे.क्षयमास सर्वसाधारण पणे कार्तिक, मार्गशीर्ष, पौष यापैकी एकच क्षयमास म्हणून संबोधला जातो.क्षयमास व त्यापूर्वी येणारा अधिकमास सर्व शुभ कार्यास वर्ज्य मानले जातात; तर क्षयमासानंतर येणारा अधिकमास पुण्यकार्यास उत्तम मानतात.

ब्लॉग आवडला? इतरांना सांगा
Like this:
Like Loading...