आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 25, 2012

अधिकमास

                             ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायण वर्षाऋतु अधिकमास भाद्रपद शुक्लपक्ष
तसेच दिनांक तारीख ऑगष्ट २०१२ साल चालू आहे.
पुरुषोत्तम म्हणजे कृष्ण याची भक्ती करतात.
मी रांगोळी ने जप लिहिला आहे.तो आपणास
वाचन करण्यास नक्की चं आवडेल !

                      DSCF2755

अधिक महिना

* चैत्र महिना पासून आश्विन महिना पर्यंत कोनताही एक आणि क्वचित फाल्गुन हे महिने अधिक येतात.
* पौष आणि माघ हे महिने कधीच अधिक येत नाहीत. मात्र मार्गशीर्ष, पौष आणि माघ हेच महिने काही  ( १२२, १४१, १९ अशा ) वर्षांनी क्षयमास होतात.
* एकदा आलेला अधिक महिना १९ वर्षांनी पुन: तोच अधिक येतो.
* क्षयमास आलेल्या वर्षात अधिक महिने २ येतात. क्षयमासापूर्वीचा अधिक हा सर्व कामांकरिता निषिध्द मानला जातो.
* पूर्वीच्या संवत्सरात ज्या महिन्यात कृष्ण पंचमीला सूर्यसंक्रांत असेल, तोच महिना पुढील वर्षी अधिक महिना येतो.

अधिक महिना मध्ये जावाई ला चांदीचे ताट व २१ अनारसे देतात.लेकीला हळद कुंकू साडी चोळी जोडवी देतात. सर्व सवाष्ण बाई जोडवी अधिक महिना त बदलतात.काचेच्या बांगड्या बदलतात.घालतात.गुरुजींना दिवा याचे वाण देतात.जेवण देतात.स्नान नदी समुद्र ह्या ठिकाणी करतात. गार पाणी याने स्नान करतात.नामस्मरण कुलदेवतेचे नामस्मरण करतात.नामस्मरण याने पुण्यलाभ होतो.देवदर्शन करतात.देवाचे चिंतन करतात.व्यथाचे निवारण होते.पोथी-वाचन करतात.ब्राह्मणाला पोथी दान करतात.

faral2

%d bloggers like this: