आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 29, 2012

मलमास


स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन वर्षाऋतु अधिक भाद्रपद शुक्लपक्ष अधिकमास
अधिक महिना.तसेच ऑगस्ट २०१२ साल आहे.
पुरुषोत्तम म्हणजे कृष्ण याची भक्ती पूजा करतात.

DSCF2760

धोंडामास

द्रौपदीचा अपराध : पांडवांना द्दूत खेळण्याचा छंद होता.द्दूत म्हणजे जुगार,सट्टा !
द्दूतात पांडवांचा पराजय झाला. त्यांनी त्यांचे राज्य पणाला लावले.नंतर त्यांनी स्वत:ला व द्रौपदी ला पणास लावले.त्यातही त्यांचा पराजय झाला. त्यांच्या नशिबी १२ वर्ष वनवास व एक वर्षाचा अज्ञातवास आला.वनवासात असताना पांडवांस विविध क्लेशांस व व्यथांस तोंड द्दावे लागले;त्यामुळे त्यांनी श्रीकृष्णा चा धावा केला. पांडव म्हणाले,”भगवंता ! तुम्ही द्रौपदी चे बंधू आणि आमचे पाठीराखे ! आमचे हाल तुम्हाला बघावतात तरी कसे ?”

भ.श्रीकृष्ण म्हणाले. ” त्याला मी काय करणार ? ही सारी तुमच्या कर्माची फळं ! ती तुम्हाला भोगावीच लागणार |
द्दूतक्रीडेचा छंद तुम्हास भोवला.तुमच्या नशिबी अज्ञातवास आला.तुमच्याबरोबर तिलादेखील हे हाल भोगावेच लागणार ! पांडव आश्चर्याने म्हणाले,” ते कसे काय ?”

भ.श्रीकृष्ण म्हणाले,द्रौपदीचा अपराध पण तसाच आहे;पूर्वजन्माची मेधावी ब्राह्मणाची ती कन्या | आई बालपणी वारली. वडिलांनी तिंच लालन-पालन केलं. तिचं लग्न होण्यापूर्वीच त्यांना पण मरण आलं; मग मेधावतीनं शंकराची आराधना केली. ” मेधावातीची तपश्चर्या चालूच होती. तेवढ्यात नारदमुनी तेथे आले.ते म्हणाले,|”मुली, तू अधिकमास याचं व्रत कर. मुरलीधर ची पूजा कर.तुला उत्तम वर लाभेल.”

मेधावती म्हणाली, ” मी शंकरभक्त आहे.त्यांची मी आराधना करते.प्रत्यक्ष परमेश्वरा पुढे त्या मुरलीधराची काय कथा ? तेवढ्यात दुर्वास मुनी आले.त्यांना मेधावती च्या संभाषण याचा राग आला.ते म्हणाले,” मुली,तू पुरुषोत्तम याला कमी लेखतेस ? अधिकमास याचं व्रत तुला तुच्छ वाटतं. याचा परिणाम तुला भोगावा लागेल.पुढील जन्मी तुझे हाल होतील.ते तुला भोगावे लागतील.हा माझा तुला शाप आहे.”

” वरील शाप देऊन दुर्वास निघून गेले.मेधावतीला त्याचा पश्चात्ताप झाला.मेधावती पुढील जन्मी द्रौपदी बनली.आता ती फळं भोगीत आहे;पूर्वजन्माची ! मुनीने दिलेल्या शापाची ! !” पांडव म्हणाले, ” ही कथा झाली;पण आमच्या नशिबी आलेल्या व्यथांचं काय ? ”

श्रीकृष्णांनी मग पांडव यांची समजूत घातली.अधिकमास याचं व्रत पांडव यांना करण्यास सांगितलं. पांडव यांनी ते व्रत केले.पुण्यकर्मं केली.त्यांना त्यांचं राज्य परत मिळालं. ते सुखी-समाधानी झाले.

%d bloggers like this: