आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 30, 2012

अधिकमास

|| श्री अधिकमास ||
अधिकमास यांना धोंडोमास, मलमास,क्षयमास, अधिकमहिना अशी नावं आहेत.
कोणी कोणी पुरुषोत्तम मास पण म्हणतात.

अधिकमास

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन वर्षाऋतु अधिक भाद्रपद शुक्लपक्ष अधिकमास
अधिक महिना.तसेच ऑगस्ट २०१२ साल आहे.
पुरुषोत्तम म्हणजे कृष्ण याची भक्ती पूजा करतात.

dscf0825 dscf1827

अधिकमास

अधिकमासाचा इतर काही कथा

अधिकमासाच्या इतर कथा आहेत.पोथी-पुराणांत तया आढळतात.अधिकमासाचं महत्व त्यातही विशद केलेले आहे.अधिकमासाचे प्रिय वस्तूचा वा पदार्थाचा त्याग करावा. पुरुषोत्तम (श्रीकृष्ण)याची भक्ती करावी.त्यानं मनास सुख,शांती व समाधान लाभते.सर्वांचं
कल्याण होत.

इतर कथांमधून ही अशाच स्वरूपाचा उल्लेख आढळतो.’ गुणसुंदरी ‘,’द्रौपदी’ चंद्रकलाराणी इत्यादी च्या कथा या दीपपूजेच्या नेम,अधिकमास याचं महत्व विशद करतात.स्मिताविलासिनी इंद्रलोकीची अप्सरा, दुर्वास ऋषीच्या गळ्यात तिनं हार घातला.दुर्वासांना क्रोध आला. त्यांच्या शापानं अप्सरा पिशाच बनली.एका तपस्विनी नं तिला पुण्य दिलं.त्यामुळे तिचा उध्दार झाला. दुसऱ्यांच्या बागेतील फळं चोरून खाल्ली ‘म्हणून कदर्य नावाचा गृहस्थ पुढील जन्मी वानर बनला. तळ्याकाठच्या झाडावर वानर उद्या घेत होतं ते तळ्यात पडले,अधिकमास यात स्नानयोग घडला. त्या पुण्याई नं त्यानं स्वर्गलोक गाठला.रूपवती व मुग्धा सख्ख्या दोन जावा.अवंतपुरच्या त्या रहिवासी ! एकीला व्रताचरण केल्यानं मुरलीधर प्रसन्न झाले.तर पाहिलीस पश्चाताप झाला.काहीतरी पुण्यकर्म व्हावं ‘ अधिकमास ‘ याचं व्रत करावं व आपलं कल्याण साधावं.

ही अधिकमासाची साठा उत्तरांची कहाणी पाचां उत्तरी सुफल संपूर्ण |

%d bloggers like this: