आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 31, 2012

अधिकमास

                         ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन वर्षाऋतु अधिक भाद्रपद शुक्लपक्ष अधिकमास
अधिक महिना.तसेच ऑगस्ट २०१२ साल आहे.
पुरुषोत्तम म्हणजे कृष्ण याची भक्ती पूजा करतात.
                         ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
शुक्रवार १५ (पौर्णिमा ) तसेच तारीख दिनांक ३१ ऑगस्ट २०१२ साल आहे.
अधिकमास अधिक महिना याची माहिती व कृष्ण याची आरती लिहिली.
दही याचा नैवेद्द दाखवीत आहे.

          DSCF2761

अधिकमास

अधिकमास

अधिक असे पुण्याचा | मंत्र दिधे कल्याणाचा | पूज्यभाव हो तयाचा |
आचाराते लाभो गती | ॐ विष्णवे नम: | ॐ पुरुषोत्तमाय नम : |
ॐ श्रीकृष्णाय नम : | ॐ दामोदराय नम : |ॐ मुरलीधराय नम : |
|| ॐ शांति : शांति : शांति : ||

आरती श्रीकृष्णाची
येउनि मानवदेहा भुललो संसारी | धन सुत जाया माझी म्हणुनिया सारीं ||
नाही स्मरलो तुजला क्षणही कंसारी | वारी भवदु:खाते शरणागत तारी ||१||
जय देव जय देव जय राधारमणा | चकवी लक्ष योनी चौऱ्यांशी भ्रमणा ||धृ o ||
जाणत जाणत आपुले केले अनहीत | स्वेच्छे रतलो विषयी त्यजुनीया विहित ||
गेला जन्म सज्जनसंगा विरहित | त्वत्पदकमलीं मिनलें नाही हे चित्त ||जय o ||२||
केसे अगणित पातक आतां तुज पाहीं || आलों शरणागत रक्षीं लवलाही ||
करुणादृष्टी पूर्ण दीनाकडे पाही | विभवी कृष्ण दास मनिं येउनि राहीं ||जय o ||३||

%d bloggers like this: