आपले स्वागत आहे!

Archive for सप्टेंबर, 2012

ब्लॉग पोस्ट ८६० वां

                           ॐ
ब्लॉग पोस्ट ८६० वां : वसुधालय माझा ब्लॉग पोस्ट
दिनांक तारीख ३० सप्टेंबर (९)२०१२ साल ला
आठशे साठं ८६० वां ब्लॉग पोस्ट होत आहे.
श्री सत्यविनायक पूजा व व्रतकथा लिहिली आहे.
१०८ दूर्वा समर्पण करणे – अष्टोत्तरशतनामवलि
ॐ लिहून गणपती ची नाव लिहिली आहेत.
ब्राम्हण पूजा, सरस्वतीपूजन (पोथी पूजा) लिहिली आहे.
कथा आरती, प्रार्थना नैवेद्द घरातील करून दाखविला आहे.
मंत्रपुष्पांजली समाप्त सर्व लिहिले आहे. तसेच गणपती चे
श्र्लोक श्लोक रांगोळी कागद पेन शाई व संगणक मध्ये
लिहिले आहेत.तसेच श्रीपाद श्री वल्लभ यांचा गणेश चतुर्थी
चा जन्म दिवस व थोडी माहिती लिहिली आहे.
आपण सर्वांनी ब्लॉग वाचन केलेतं ! प्रतिक्रिया दिल्यातं !
भेटी दिल्यातं !
त्या बध्दल बद्दल धंयवाद ! धन्यवाद !
भेटी, ७९, १०१ आहेत.

    DSCF2993 DSCF2994

१ अक्टोबर

                                 ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन वर्षाऋतु निज भाद्रपद शुक्लपक्ष नक्षत्र उत्तराभाद्रपदा
१५ रविवार भागवत सप्ताह समाप्ति, महालयारंभ, प्रतिपदा श्राध्द .
तसेच निज भाद्रपद कृष्णपक्ष १ सोमवार सुरु होत आहे.
तसेच दिनांक तारीख ३० सप्टेंबर रविवार २०१२ साल आहे.
सोमवार १ अक्टोबर (१०) २०१२ साल आहे.

                     DSCF2992

प्रौष्ठपदी पौर्णिमा

                                 ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन वर्षाऋतु निज भाद्रपद शुक्लपक्ष १४
अनंत चतुर्दशी, प्रौष्ठपदी पौर्णिमा आहे.शनिवार आहे.
तसेच दिनांक तारीख २९ सप्टेंबर २०१२ साल आहे.शनिवार आहे.

           

             DSCF2834

गणपती

                     ॐ
                गणपती
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि-समप्रभ |निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||

एकदंताय विघ्महे वक्रतुण्डाय धीमहि | तन्नो दंति: प्रचोदयात् ||

          DSCF2926 DSCF2910

गणपती

                                        ॐ
                                       गणपती
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि-समप्रभ | निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||
एकदंताय विघ्महे वक्रतुण्डाय धीमहि | तन्नो दंति: प्रचोदयात् ||

       DSCF2920 DSCF2922

      DSCF2923 DSCF2910

नैवेद्द

                             ॐ
                           नैवेद्द

   DSCF2918 DSCF2931

 DSCF2930 DSCF2932

DSCF2934 DSCF2935

DSCF2936 DSCF2940

DSCF2941 DSCF2944

DSCF2938 DSCF2946

श्रीपाद श्रीवल्लभ

                                   ॐ
श्रीपाद श्रीवल्लभ
श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थी ला झाला.
गणेश चतुर्थी ला झाला.कृष्ण-यजुर्वेद शाखा आपस्तंब सूत्र,
भारव्दाज गोत्रोद् भव ब्रह्मश्री घंडिकोटा अप्पालराज शर्मा आणि
महाराणी सुमतीदेवी यांच्या पोटी झाला. या अवताराची माहिती
गुरुचरित्रात, पाच,आठ,नऊ.व दहा या चार अध्यायात आलेली आहे.
श्रीवल्लभ स्वामींचा काळ इ.स.१३२० ते १३५० असा तीस वर्षाचा आहे.
श्रीपाद श्रीवल्लभ यांनी कुरवपूर येथे जरी वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी
कृष्णेत अदृश्य होऊन आपले जीवित कार्य समाप्त केले असलेतरी ते भक्तां ची
आजही काळजी घेतात.त्यांना दर्शन देतात.अशी भक्तांची श्रध्दा आहे.
हि सर्व माहिती तरुण भारत कोल्हापूर दिनांक १९ सप्टेंबर पान नंबर ४ मध्ये आहे.

     DSCF2885

नैवेद्द

                                            ॐ
नैवेद्द : कुकरच्या भाड्यांत बाऊल भर तांदूळ घेतले. पाणी घातले.
धुवून घेतले.ठेवले.दुसऱ्या भाड्यांत तूर डाळ बाऊल भर घेतली.
तूरडाळ धुतली.पाणी घातले.हळद घातली.टाकली.कुकर मध्ये पाणी
घातले.हळद टाकलेली पाणी घातलेले पातेले ठेवले.त्यात दुसरे पातेले
तांदूळ पाणी याचे ठेवले.कुकर ला कुकरचे झाकण लावले. शिट्टी ठेवली.
गॅस पेटवून कुकर ठेवला.चार ४ पाचं ५ शिट्टी दिल्या.कुकर गार करू दिला.
तुरीचे डाळीचे हळद घातलेले वरण मध्ये थोड पाणी घातले.मीठ घातले.
हिंग घातले.असे साधवरण तयार केले.एका डिश मध्ये मीठ लिंबू मिठाच्या
डाव्या बाजूला ठेवले.कोणी उजव्या बाजूला पण ठेवतात.तील लाल तिखट मीठ
हिंग हळद सर्व एकत्र बारीक केलेली चटणी लिंबू याच्या खाली वाढली.ठेवली.
तूप साखर याची वाटी ठेवली.मुठ न करता भात वाढतात तसा भात वाढला घातला.
दोन ठिकाणी वाढला. एका भात ह्यात तुरीचे डाळीचे मीठ हळद हिंग घातले वरण वाढले.
घातले.त्यात तूप वाढले.घातले. दुसरा भातात दही दूध मीठ वाढले.घातले.
देवाला नैवेद्द दाखवित असतांना मीठ वाढत नाहीत,व जेवतांना मीठ वाढून नंतर सर्व पदार्थ
वाढतात.मी मीठ वाढले आहे.अशा प्रकारे वरण भात तूप मीठ व दही दूध भात मीठ लिंबू
तील चटणी तूप साखर याचा नैवेद्द केला. वाढला.दिला.झाला.

dscf27193  DSCF2910

DSCF2945  DSCF2946

प्रा र्थं ना प्रार्थना मंत्रपुष्पांजली


प्रा र्थं ना
जाणें न आवाहन वा विसर्जंन | पूजा न जाणें तव तो जनार्दंन |
जाणें कांही तुजविण ईंश्र्वरा | क्षमा करावी मज दिन पामरा || १ ||
गेलेच पाप मम दु:खहि सर्वं गेलें | दारिश्र्च सर्वही तुवां विलयासी नेलें |
संपत्ति सौख्य सगळें क्षणीं यते हाता | कारुण्यसिंधु तुजला नयनीं पाहतां || २ ||
मंत्रहीन क्रियाहीन | भक्तिहीन असे तरी ||पूजाही आदरे सेवी| पूर्ण मागोनि अंतरी ||३ ||
अपराध सहस्त्रे जी प्रत्येही घडत करीं || दास मानूनि पायांचा परमेश क्षमा करी || ४ ||
रूपा देईं जय देईं | यशा देई बघीं भरी || सौभाग्य दे सुतांते दे | पूर्ण काम मला करीं || ५ ||

प्रार्थना
घालीन लोटांगण वंदीन चरण | डोळ्यांनी पाहीन रूप तुझें |
प्रेमें आलिंगन आनंदे पूजीन | भावे ओवाळिन म्हणे नामा || १ ||
त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बधुंश्र्च सखा त्वमेव |
त्वमेव विद्दा द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव || 2 ||
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुध्द्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् |
यद्दत्सकलं परस्मै | नारायणायेति समर्पयामि || ३ ||
अच्युत केशवं रामनारायणं कृष्णदामोदर वासुदेव हरिम् |
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्रं भजे || ४ ||
हरे राम हरे राम राम राम हरे हरे | हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे || ५ ||

मंत्रपुष्पांजली
ॐ यज्ञेन यज्ञमजन्त देवास्तानि धर्माणि प्रथामान्यासान्
ते ह नाकं महिमान: सचन्त यत्र पूर्वे साध्या: संति देवा: ||
ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे |
स मे कामान् कामकामाय मह्यं कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु |
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नम: | ॐ स्वस्ति साम्राज्यं
भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
संमतपर्या ईस्यात् सार्वभौम: | सार्वायुष आंतादापरार्धाiत् |
पृथिव्यै समुद्रपर्यंतया एकराळिति | तदप्येष श्लोको s भिगीतो मरुत:
परिवेष्टारो मरुत्तस्यावसन् ग्रहे | आविक्षितस्य कामप्रेर्विश्र्वेदेवा :
सभासद इति ||
|| समाप्त ||

                             dscf27193

नैवेद्दारती नीरांजन आरती कर्पूंरारती


नैवेद्दारती
जय देव जय देव विठाबाई |पक्वान्नाची सिध्दी अर्पी तुज ठायीं || धृ o ||
षडूसपक्वाने ही अर्पित तुज माई |कृपा करुनी ती तूं मान्य करुनि घेई ||
तृप्ती सर्व जीवा जेवितां तूं आई | जीवन संर्वाचे जीवन संर्वाचे हें असें तच पायीं || १ ||
आनंदें भोजन करावें आतां | येथेच्छ जेवूनी उच्छिष्ट उरतां ||
प्रसाद तो देईं अपुल्या भक्तां || हेंचि मागे ठेवुनि चरणीं माथा ||
जय देव जय देव || २ ||

नीरांजन आरती
पंचप्राणांचें नीरांजन करुनी | पंचतत्वें वाती परिपूर्ण भरुनी ||
मोहममतेचें समूळ भिजवोनी | अपरोक्ष प्रकाश दीप पाजळोनी ||१||
जय देव जय देव निरांजन | निरांजन ओवाळूं तुझिया समचरणा || धृ o ||
ज्वाला ना काजळी दिवस ना राती सदोदित प्रकाश भक्तीनें प्राप्ती ||
पूर्णांनंदे घालों बोलों मी किती | उजळों हे शिवराम भावे ओवाळीती |
जय देव जय देव जय निरांजना || २ ||


कर्पूंरारती
कर्पूरगौरा | करुणावतारा | संसारसारा | भुजगेद्रहारा |
सदा रहासी हृदयारविंदीं | भवा | भवानीसह तूज वंदी || १ ||

      dscf27193 DSCF2918

ॐकार वंदना

ॐ 

ॐकार वंदना 

भद्र भाद्रात प्रथमईशा लवूनी करतो वंदना 

तू शिवांकित गौरीवंदन पूर्ण साकार कामना 

दैवभास्करा कमलावरा मी करितो आवाहना 

रत्नजडीत किरीटधारी पूर्ण तूं चंद्रानना 

सूर्यप्रभा नयाने झरे तोषविसी या मना 

स्वरूप सुंदर कर्ण गजसे कर उदार सज्जना 

ॐकार उदरा मूषकधारा वर्णनी जो माईना

सकल विद्दा जाणिता तो सकल कला संयोजना 

अंतरीचे रूप मोहक सारखे लुचते मना 

तूंच इच्छा तूंच कर्ता तूंच साक्षात विश्वना 

विश्वातले मांगल्य तूंची साकार व्हावे पूजना 

भद्र भाद्रात प्रथम ईशा लवूनी करतो वंदना 

२४.८.९० श्रीकांत चिवटे

सर्व ओळीत शेवटी ना आले आहे.

DSCF2719

नैवद्द

                                      ॐ
नैवद्द : दोन २ खारीक. चार /पाचं ४ /५ बदाम. पाचं सहा ५ /६ बेदाणे.(मनुका).
चार पाचं ४ /५ पिस्ता.चार पाचं ४ / ५ काजु.थोडी चारोळी.थोड सुक खोबर.
पिठी साखर.सात खिरापत याचे एकत्र मिस्कर मधून बारीक केले.
त्याचे पाचं ५ मोदक केले.दोन २ करंजी केले.अशा प्रकारे खारीक बदाम
मनुका काजू चारोळी खोबर पिठी साखर पिस्ता ८ पंच खाद्द याचे ५ पाचं
मोदक व दोन २ करंजी यांचा खिरापत मोदक याचा नैवेद्द केला.झाला.

    dscf27193 DSCF2910

     DSCF2940 DSCF2941

सत्यविनायक याची उत्तरपूजा

                     ॐ
सत्यविनायक याची उत्तरपूजा :
(देवाला गंध लावावे ) – श्रीसत्यविनायकाय नम : | विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि |
श्रीसत्यविनायकाय नम : | अलड्क.रार्थे अक्षतान् समर्पयामि | ऋध्दिसिध्दिभ्यां नम : |
हरिद्रां-कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि | श्री सत्यविनायकाय नम : |
पूजार्थे कालोभ्दवपुष्पं , दुर्वांकुरान् समर्पयामि | श्रीसत्यविनायकाय नम : |
धूपं समर्पयामि | श्रीसत्यविनायकाय नम : दीपं समर्पयामि |
श्रीसत्यविनायकाय नम : | नैवेद्दार्थे पुरत : स्थापित नैवेद्दं समर्पयामि |
प्राणाय नम : | अपानाय नम : | व्यानाय नम : | उदानाय नम : |
समानाय नम : | ब्रह्मणे नम : | प्राणाय नम : | अपानाय नम : |
व्यानाय नम : | उदानाय नम : | समानाय नम : ब्रह्मणे नम : |
उत्तरापोशनं समर्पयामि | हस्तप्रक्षालनं समर्पयामि |
मुखप्रक्षालनं समर्पयामि | आचमनीयं समर्पयामि |
करोव्दर्तनार्थे चंदनं समर्पयामि | श्रीसत्यविनायकाय नम : |
मुखवासार्थे पूगीफल-ताम्बूलं समर्पयामि | नारिकेलफलं समर्पयामि |
कृतजासाडग.तासिध्द्यर्थं सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामि |
श्रीसत्यविनायकाय नम : | कर्पुरार्तिक्यदीपं समर्पयामि |
श्रीसत्यविनायकाय नम : | प्रदक्षिणापूर्वक-पुष्पाञ्जलिं समर्पयामि |
नमस्करोमि | आवाहनं न जानामि न जानामि विसर्जनम्
पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्र्वर || अन्यथा शरणं नास्ति
त्वमेव शरणं मम || तस्मात् कारुण्यभावेन रक्षस्व परमेश्र्वर ||
अपराधसहस्त्राणि क्रियंते s हर्निशं मया | दासो s यमिति मां
मत्वा क्षमस्व परमेश्र्वर || मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्र्वर |
यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे ||
पञ्चोपचारै : उत्तरपूजनेन श्रीसत्यविनायक :प्रियतां |
न मम तत्सद् ब्रह्मार्पणमस्तु | यान्तु देवगणा : सर्वे
पूजामादाय पार्थिवीम् | इष्टकामप्रसिध्द्यर्थं पुनरागमनाय च ||
आवाहितदेवता : विसर्जयामि | फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं
सचराचरम् | तस्मात् फलप्रदानेन सुफलाश्र्च मनोरथा : ||
|| इति श्रीसत्यविनायक पूजा समाप्त ||

         dscf27193

ब्राह्मणपूजन

ब्राह्मणपूजन
कृतस्य कर्मण : सांगतासिध्दर्थं ब्राह्मणपूजनं करिष्ये |
महाविष्णुस्वरुपिणे ब्राह्मणाय इदमासत्तनम् | ( स्वासनम् | )
इदं पाद्दम् | (सुपाद्दम् | ) इदम् अर्ध्यम् ( अस्त्वर्ध्यम् | )
इदमाचमनीयम् | ( अस्त्वाचमनीयम् | )गंधा :पांतु |( सौमंगल्यं चास्तु | )
अक्षता: पांतु ( आयुष्यमस्तु | ) पुष्पाणि पांतु | (सौश्रेयमस्तु | )
तांबुलं पातु | ( ऐश्र्वर्यमस्तु | ) दक्षिणा : पांतु | ( बहुदेयं चास्तु | )
( दीर्घमायु : श्रेय: शांति: पुष्टिस्तुष्टिश्र्चास्तु | )
नमो S स्तवनंताय सहस्त्रमूर्तये ,सहस्त्रपादाक्षिषिरोरुबाहवे | सहस्त्रनाम्गे पुरुषाय
शाश्र्वते , सहस्त्रकोटि – युगधारिणे नम: | ब्रह्मणे सकलाराधनै : स्वर्चितमस्तु | ( अस्तु स्वर्चितम् | )
तीर्थग्रहण मंत्र – पादोदकं सत्यदेव नरो यश्र्व पिबेत्तव | तस्य चाम्तर्गतं पापं नश्यति नात्र संशय : ||
प्रसादग्रहण मंत्र – विनायकप्रसादो यो गृण्हियात् भक्तिभावत : | सर्वान्कामानवाप्नोति प्रेत्य सायुज्यमाप्नुयात् |
तीर्थ प्रसाद द्दावा .

DSCF2719

बटाटा भाजी पोळी

                                       ॐ
बटाटा भाजी पोळी : चार पाचं ४ / ५ बटाटे कुकर मध्ये पाणी घालून
गॅस पेटवून कुकर ठेवला चार / पाचं ४ / ५ शिट्या दिल्या.कुकर गार केला.
बटाटे बटाटे पातेल्यात ठेवले.बटाटे गार केले.साल काढली. मध्यम बारीक
विळीने चिरले. गॅस पेटवून पातेले ठेवले. पातेल्यात तेल मोहरी ची फोडणी केली.दिली.
फोडणीत चिरलेले बटाटे घातले.मीठ, लाल, तिखट, हिंग, हळद घातले.टाकले.हिरवी मिरची
घरात आहे.लाल तिखट चव चांगली येते.अशा प्रकारे वाफ आणून बटाटा भाजी झाकण ठेवून
तयार केली.झाली.
पातेल्यात कणिक घेतली.तेल,मीठ घातले.पाणी घालून कणिक तिंबली.भिजविली.एक गोळा
घेतला पोळपाट ह्यात लाटण्याने लाटला,तेल लावले घडी केली.परत लाटला तेल लावले.घडी केली.
त्रिकोणी घडी तयार झाली.केली.लाटण्याने पोळपाट ह्यामध्ये गोल पोळी केली.
गॅस वर तवा तापलेला होता दोन्ही बाजूने पोळी भाजली.दोन पोळ्या केल्या.
डिश मध्ये पोळ्या,बटाटा भाजी,लिंबू लोणचं मीठ तूप साखर ठेवले,वाढले.नैवेद्द दाखविला.
छायाचित्र काढले.मी रोज चा नैवेद्द रोज दाखवीत आहे.आतल्या दिवस करून ठेवत नाही.
व रोज लिहिते पण आधी लिहित नाही.
मला कसहोईलअसे असं वाटतं राहत.

    dscf27193 DSCF2910

DSCF2939 DSCF2938

सरस्वतीपूजन

                                                  ॐ
सरस्वतीपूजन (पोथीची पूजा)
अद्द पूर्वोच्चारित-वर्तमान,एवंगुणविशेषण-विशिष्टायां शुभपुण्यतिथौ सत्यविनायक-पुजनांगभूतं
सरस्वतीपूजनं कथाश्रवणं च करिष्ये | श्रीसरस्वत्यै नम: | सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि |
श्रीसरस्वत्यै नम: | हरद्रां-कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयापि | श्रीसरस्वत्यै नम: | धूपं समर्पयामि |
श्रीसरस्वत्यै नम: | दीपं समर्पयामि | प्राणाय नम: | अपानाय नम: | व्यानाय नम: | उदानाय नम: |
समानाय नम: | ब्रह्मणे नम: | प्राणाय नम: | अपानाय नम: | व्यानाय नम: | उदानाय नम: | समानाय नम: |
ब्रह्मणे नम: | उत्तरापोशनं सपर्पायामि | हस्तप्रक्षालनं समर्पयामि | मुखप्रक्षालनं समर्पयामि 23| आचमनीयं समर्पयामि |
करोव्दर्तनार्थे चंदनं समर्पयामि | श्री सरस्वत्यै नम: | मुखवासार्थे पूगीफल-तांबूलं समर्पयामि | कृतपूजा-संगता-सिध्दर्थं
सुवर्णपुश्पदक्षिणां समर्पयामि | श्रीसरस्वत्यै नम: | मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि | नमस्करोमि अनेन कृतपूजनेन
श्रीसरस्वती देवी प्रियतां | न मम |यानंतर अबीर (बुक्का)किंवा अष्टगंध वाहावे.गुरुजिना ही लावावे.तसेच श्रोत्याम्ना ही
लावून घेन्यास सांगावे त्यानंतर गुरुजिनि कथा वाचनास आरम्भ करावा.श्रोत्यांनि कथा श्रवण करावी.

                   DSCF2719

हरबरा डाळीचे पुरण याचे मोदक

                                 ॐ
हरबरा डाळीचे पुरण याचे मोदक : एक बाऊल हरबरा डाळ कुकर च्या
भांड्यात घेतली.डाळ भिजवून पाणी राहील असे डाळ व भांडतात पाणी
घातले.हळद थोडी घातली.कुकर चे झाकण लावले.पेटत्या गॅस वर कुकर
ठेवला चार ४ पाच ५ शिट्या दिल्या.कुकर गार झाल्या नंतर चाळणी खाली
पातेले ठेवून चाळणीत हळद पाणी घातलेले हरबरा डाळ शिजलेली चाळणीत
घातली.डाळ पातेल्यात घेतली.एक १ बाऊल साखर व शिजलेली हळद टाकलेली
हरबरा डाळ साखर परत शिजविले.शिजविली.थोड पातळ पुरण तयार झाले.केले.
पुरण यंत्रात पुरण बारीक केले.कणिक तेल मीठ पाणी घालून भांड्यात तिंबली
भिजविली मळली.गोळा तयार झाला.केला.छोटे छोटे गोळे लाट्या केल्या.प्रत्येक
लाटीत हरबरा हळद टाकलेले साखर मध्ये शिजविलेले पुरण भरले.पाचं ५ मोदक
व दोन करंजी केल्या.तेलात तळून काढले.पुरण केले की शेवया याची खीर करतात.
शेवया तेलात परतून दुध साखर घालून शेवया याची खीर केली.
हळद टाकलेले साखरेचे हरबरा डाळीचे पुरण तेल मीठ कणिक पाण्यात तिंबलेली कणिक
त्यात पुरण याचे सारण भरलेले तेलात तळलेले पुरण याचे मोदक तयार केले.झाले.
नैवेद्द दाखविला फोटो काढला. छान वाटतं आहे.हलक वाटत आहे.

DSCF2910 DSCF2935

DSCF2936 dscf27193

सत्य विनायक व्रतकथा

                                                     ॐ
|| सत्य विनायक व्रतकथा ||
श्रीगणेशाय नम : सूत शौनकादि ऋषींना सांगतत – पूर्वी सत्यलोकी ब्रह्मदेव स्वस्थ बसलेला
असताना त्याचे जवळ देवर्षी नारद येऊन सर्व लोकांचे कल्याण व्हावे या इच्छेने अत्यंत नम्र होऊन
ब्रह्मदेवाला नमस्कार करून प्रश्र्न करते झाले || १ ||नारद म्हणातात,हे भगवान् आपण सर्वज्ञ आहात,
याकरिता ह्या जगात मनुष्यांनी आपल्या कल्याणाकरिता कोणत्या देवाची सेवा करावी ? ब्रह्मदेव म्हणतात..
नारदा सर्व वेदाच्या पूर्वी प्रतिष्ठा पावलेला म्हणजे ज्याच्यापासून वेद झाले तो जो ॐ काररुपी भगवान् तोच या
कलियुगामधे प्रत्यक्ष फल देणारा सत्यविनायक नावाचा देव होय .
सुदामा नावाचा एक ब्राह्मण उत्तम आचारसंपन्न व मोठा उदार असून अगदी दरिद्री होता.तो एकदा कुटुंबपोषणाच्या
चिंतेने व्याकूळ होऊन, आपल्या आश्रमात बसला असता त्याच्या स्त्रीने,’महाराज.आपला बाळमित्र व गुरुबंधु श्रीकृष्ण
ऐश्र्वर्यसंपन्न असा व्दारकेत नांदत असून तो दिन व ब्राह्मण याचेविषयी अर्याम्त दयाळू आहे त्याला भेटलात तर तो
तुमचे दारिद्र्य दु:ख दूर करील असे सुचविल्यानंतर तो ब्राह्मण (सुदामा) व्दाराकेस जाण्यास निघाला जाताना कृष्णाला
भेट देण्याकरिता म्हणून,मोठ्या प्रयत्नाने साठविलेले दोनतीन मुठी पोहे फाटक्या चिंध्यात बांधून घेऊन, तो जुन्या मित्राला
भेटण्याकरिता व्दाराकेस गेला.
तेव्हा तो आलेला पाहून, कृष्णाने त्याचा मोठा सत्कार केला.प्रथम मधुपर्कपूजा केली.
नंतर सुगंघि तेल लावून स्नान घातले व मिष्टान्न भोजन घालून ताम्बूल दिले.
नंतर उभयता एकांती गोष्टी करिता बसले,तेव्हा श्रीकृष्णांनी त्याच्या चार्य्रावरून त्याचे मनोगत
जाणले. श्रीकृष्ण सुदाम्याला म्हणतात,”मित्रा, मला भेट काय आणलीस ती दे ” असे म्हणून त्याच्याकडची
चिंध्याची पुरचुडी घेतली,आनी त्यातील मुथभर पोहे भक्षण करुन श्रीकृष्ण तृप्त झाले,आणि नामात म्हणाले,
” हाय हाय! माझ्या मित्राला काय हे दारिद्र्य राजामध्ये व या ब्राह्मणा मध्ये कितीसे अंतर राहते ते पाहतो
सत्यविनायकाच्या संतोषाने याचे दारिद्र्य नाहीसे करतो,” असा विचार करून, त्याने त्याला प्रश्र्न केला की तुझी
मुले -माणसे क्षेम आहेत ना ? तू आपल्या कुटुंबाचे पालन व पोषण कोणत्या धंद्दाने व कसे करतोस ? ” अशी कृष्णाची
प्रेमवाणी ऐकताच,सदामा लज्जित होऊन कृष्णाला म्हणाला देवां, तू नाथ असल्यामुळे सर्व जगाचे कल्याण आहे,मग तुझ्या
मित्राचे घरी कुशल आहे यात काय विचारावे ? हे यदुकुलश्रेष्ठा,मी आपल्या पोश्य्वार्गाचे परिपालन अयाचित वृत्तीने करीत असतो.
तथापि ती नित्यकर्मामधे गणली असल्याने ती ईश्र्वरार्पण बुद्धीने नित्य चालवून भुक्तिमुक्ति देणारा जो सत्यविनायक त्याचे
आराधन कर ” सत्यविनायक कोण हे सांगा श्रीकृष्ण म्हणतात – ” हे मित्रा जो सर्वाचा आदि असून सर्वाणि पूजा करण्यास योग्य
व जो साक्षात् परब्रहस्वरुपी आणि ब्रह्मा,विष्णु, महेश्र्वर इत्यादि आम्हि ज्याचे सेवकगण आहोत .त्याची पूजा करावी

पुष्टीपति ( पालनकर्ता ) जो विनायक याचा जन्म वैशाख महिन्यातील पौर्णिमा ला झाला .
त्या दिवशी किंवा वरद चतुर्थीस अथवा मंगळवार किंवा शुक्रवार हे व्रत करावे.
विनायकाचे यंत्र ठेवावे. विनायकाच्या यंत्रावर लक्ष्मीनारायण पार्वतीमहेश्र्वर;पर्थिवीवराह आणि
शक्तिमदन या चार देवतांची कोपऱ्यात क्रमाने करावी . स्थापना गर्गामुनिकडून तू या व्रताची बरोबर
अचूक माहिती घे,प्रसाद घेऊन मग घरी जा हे कृष्णाचे भाषण ऐकून सुदामा मोढ्या आनंदाने तेथे राहिला.
गर्गाचार्याकडून त्याने या व्रताची सर्व माहिती घेतली आणि संध्याकाळी मी सत्यविनायक याची पूजा करीन .
खवा साखर ह्याचे मैदात मोदक करून तळून प्रसाद करीन .

                        DSCF2719

पेढे याचे मोदक

                                  ॐ
पेढे याचे मोदक : पंधरा १५ रुपये ला पाचं पेढे आणले.मिळाले.
भांड्यात कणिक घेतली. हया मध्ये तेल मीठ घातले.पाणी घालून
कणिक तेल मीठ भिजविली भिजविले.तिंबली मळली.एकत्र कणिक
याचा गोळा केला.काही कणिक तिंबलेली याचे गोळे लाट्या केल्या.
असे पाचां ५ लाट्या केल्या. एका लाटीत एक १ पेढा बारीक मऊ करून
घातला.असे चार लाटीत पेढे घालून चार मोदक केले.एक १ लाटीत पेढा
मऊ करून घालून कारंजी केली.अशा प्रकारे पेढे चे चार ४ मोदक व एक १ करंजी
केली. गॅस पेटवून तेल पातेल्यात घातलेले तापविले. चार ४ पेढे व कणिक भिजविलेली
याचे केलेले मोदक व एक १ करंजी टळून काढली.भिजविलेली कणिक पाच पेढे याचे
मोदक व करंजी तळलेली तळलेले मोदक करंजी तयार झाली.केली.खर तर
मैदा मीठ दुधात भिजवून त्यात खवा साखर याचे सारण घालतात.तुपात तळतात.
मी आपले सोप पेढे आणून भिजविलेली कणिक याचे मोदक करंजी करून तेलात तळून
काढले. अशा प्रकारे पेढे याचे मोदक करंजी तयार झाली.कली.नैवेद्द तयार केला.झाला.

       DSCF2910 DSCF2934

        dscf27193DSCF2932

१०८ दूर्वा समर्पण करणे

                          ॐ

१०८ दूर्वा समर्पण करणे – अष्टोत्तरशतनामावलि म्हणणे –

अस्य श्रीविघ्नेश्र्वराष्टोत्तरशत – दिव्यनामामृत – स्तोत्रमंत्रस्य, गृत्समद ऋषि : गणपतिद्रेवता,
अनुष्टुप् छंद : ग बीजं नं शक्ति :, मं कीलकम्, श्रीसत्यविनायकप्रसादसिध्यर्थं दूर्वाकुरार्पणे विनियोग:

| ॐ विनायकाय नम : | ॐ विघ्नराजाय नम : | ॐ गौरीपुत्राय नम :
| ॐ गणेश्र्वराय नम : | ॐ स्कंदाग्रजाय नम : |ॐ अव्ययाय नम :
| ॐ पूताय नम : | ॐ दयाध्यक्षाय नम : | ॐ व्दिजप्रियाय नम : | ॐ अग्निगर्वच्छदे नम : ||१० ||

ॐ इंद्रश्रीप्रदाय नम : | ॐ वाणीबलप्रदाय नम : | ॐ सर्वसिध्दिमते नम :
|ॐ शर्वतनयाय नम : | ॐ शिवप्रियाय नम : | ॐ सर्वात्मकाय नम : | ॐ सृष्टिकर्त्रे नम :
| ॐ देवानीकार्चिताय नम : | ॐ शीवाय नम : | ॐ शुध्दाय नम : ||२०||

ॐ बुध्दिप्रियाय नम : | ॐ शांताय नम : | ॐ ब्रह्मचारिणे नम : | ॐ गजाननाय नम :
| ॐ व्दैमातुराय नम : | ॐ मुनिस्तुताय नम : | ॐ भक्तविघ्नविनाशनाय नम :
| ॐ एकदंताय नम : | ॐ चतुर्बाहवे नम : | ॐ चतुराय नम : ||३० ||

ॐ शक्तिसंयुताय नम : | ॐ लंबोदराय नम : |ॐ शूर्पकर्णाय नम :
| ॐ हेरंबाय नम : | ॐ ब्रह्मवित्तमाय नम : | ॐ कालाय नम : ॐ ग्रहपतये नम :
|ॐ कामिने नम : | ॐ सोमसूर्याग्निलोचनाय नम : | ॐ पाशांकुशधराय नम : ||४० ||

ॐ चम्दाय नम : | ॐ गुणातीताय नम : | ॐ अकल्मषाय नम :
| ॐ स्वयंबध्दाय नम : | ॐ सिध्दार्चित -पदांबुजाय नम : | ॐ बीजपूरप्रियाय नम : |
ॐ अव्यक्ताय नम : | ॐ वरदाय नम : | ॐ शाश्र्वताय नम : | ॐ कृतिने नम : || ५० ||

ॐ विव्दत् – प्रियाय नम : | ॐ वीतभयाय नम : | ॐ गदिने नम : | ॐ चक्रिणे नम :
| ॐ इक्षुचापघृते नम : | ॐ अजोत्पलकराय नम : | ॐ श्रीशाय नम : | ॐ निरंजनाय नम :
| ॐ श्रीपतिस्तुतिहर्षिताय नम : | ॐ कुलाद्रिभ्रुते नम : ||६० ||

ॐ जटिने नम : | ॐ चंद्रचुडाय नम : | ॐ अमरेश्र्वराय नम : | ॐ नागोपवीतिने नम :
| ॐ श्रीकंठाय नम 😐 ॐ रामार्चितपदाय नम : | ॐ व्रतिने नम : | ॐ स्थुलकंठाय नम :
| ॐ त्रयीकत्रे नम : | ॐ सामधोशप्रियाय नम : ||७० ||

ॐ अग्रगण्याय नम : | ॐ पुरुषोत्तमाय नम : | ॐ स्थूलतुंण्डाय नम :
| ॐ ग्रामण्ये नम 😐 ॐ गणपाय नम : | ॐ स्थिराय नम : | ॐ वृध्दिदाय नम :
| ॐ सुभगाय नम : | ॐ शूराय नम : | ॐ वागीशाय नम : || ८० ||

ॐ सिध्सिदाय नम : | ॐ दुर्वाबिल्वप्रियाय नम : | ॐ काम्ताय नम :
| ॐ पापहारिणे नम : | ॐ कृतागमाय नम : | ॐ समाहिताय नम : | ॐ वक्रतुंडाय नम :
| ॐ श्रीप्रदाय नम : | ॐ सौम्याय नम : | ॐ भक्तकांक्षितदात्रे नम : || ९० ||

ॐ अच्यताय नम : | ॐ केवलाय नम : | ॐ सिध्दिदाय नम :
| ॐ अच्चिदानंदविग्रहाय नम : | ॐ ज्ञानिने नम : | ॐ मायायुताय नम :
| ॐ दांताय नम : | ॐ ब्रह्मिष्ठाय नम : | ॐ भयविर्जिताय नम : | ॐ प्रमत्तदैत्यभयदाय नम : || १०० ||

ॐ व्यक्तमूर्तये नम : | ॐ अमूर्तिकाय नम : | ॐ पार्वतिशंकरोत्संगखेलनोत्सवलालसाय , नम 😐 ॐ समस्तजगदाधाराय नम 😐 ॐ वरमूषकवाहनाय नम 😐 ॐ हृष्टचित्ताय नम : |
ॐ प्रसन्नात्मने नम : | ॐ सर्वसिध्दिप्रदायकाय नम : || १०८ ||

अनेन अष्टोत्तरशतनामभि: दुर्वांकुरार्पणेन श्रीसत्यविनायक : प्रियताम् न मम |

dscf27193

नैवेद्द

                        ॐ
नैवेद्द : पाचं ५ रुपये ला एक मोसंब आणले.
फळ ब याचा पण नैवेद्द दाखवितात.मोसंब गोड असते.
साखर असते.साल काढून फोडी सोलून खातात.चिरून
काचेच्या रस भांड्यात पूर्वी रस काढत असत.आता प्लॅस्टिक चे
भांडे मिळतात.घरात कोणतेही भांड नाही.मोसंब सोलून आतल्या
फोडी खाणार ! गणपती देव यांना नैवेद्द दाखविला आहे.        

      DSCF2910 DSCF2931

गणपती

                                      ॐ
                                गणपती
मोदक : नारळ खोबर खोवलेले व गूळ एकत्र शिजविलेले सारण ठेवले.
आज कणिक व तेल मीठ एकत्र करून पाण्यात कणिक तिंबली भिजविली
मळली. त्याचे छोटे लाट्या गोळे घेतले त्यात खोबर गूळ सारण भरले.
मोदक याचा आकार दिला पाचं ५ मोदक व दोन कारंजी केले.कुकर च्या भांड्यात
मोदक करंजी ठेवले.कुकर मध्ये पाणी घालून मोदक करंजी चा डबा ठेवला.कुकर चे
झाकण कुकर ला लावले.वाफ आणली.शिट्टी दिली नाही.छान चांगली च वाफ आली.
कुकर बंद केला.थोड्या वेळाने कुकर मधले शिजलेले वाफ आलेले मोदक व karamji
डिश मध्ये काढली.ठेवली.व नैवेद्द दाखविला देवांना गणपती ला पण. फोटो छायाचित्र
मी चं काढले.सर्व करतांना मनाला खूप हलक व्यवस्थित वाटतं आहे.

DSCF2930 DSCF2910

ऋषिपंचमी

                            ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन वर्षाऋतु निज भाद्रपद शुक्लपक्ष गुरुवार
५ ऋषिपंचमी आहे.
तसेच दिनांक तारीख२० सप्टेंबर (९) २०१२ साल आहे.
कहाणी ऋषीपंचमी ची
ऐका ऋषीश्र्वरांनो, तुमची कहाणी !
आटपाट नगर होतं.तिथं एक ब्राह्मण होता. तो आपला शेतीभाती
करून सुखानं नांदत होता.पुढं एके दिवशी काय झालं ? त्याची बायको
शिवेनाशी झाली.विटाळ तसाच घरांत कालविला.त्या दोषानं काय झालं ?
तिचा नवरा पुढल्या जन्मीं बैल झाला. त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला
देवाची कारणी ! दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती.तो मोठा धार्मिक होता.
देवधर्म करी, श्राध्दपक्ष करी. आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई. एके दिवशी त्याच्या
घरी श्राध्द आलं. बायकोला सांगितलं, ” आज माझ्या बापाचं श्राध्द आहे.खीरपुरीचा
स्वयंपाक कर.”
ती मोठी पतिव्रता होती.तिने चार भाज्या, चार कोशिंबिरी केल्या.
खीरपुरीचा स्वयंपाक केला. इतक्यांत काय चमत्कार झालां ? खिरीचं भांड उघडं
होतं. त्यात सर्पानं आपली गरळ टाकली.हे त्याकुत्री नं पाहिलं.मनांत विचार केला,
‘ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील.मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल,’
म्हणून उधळी,पटकन जाऊन खिरीच्या पातेल्याला शिवली.ब्राह्मणाच्या
बायकोला राग आला.तिनं जळतं कोलीत घेतलं, नि कुत्रीच्या कंबरेत मारलं.
तो स्वयंपाक टाकून दिला.पुन्हां स्वयंपाक केला. ब्राह्मणांनं जेवू घातलं.
कुत्रीला कांही उष्टमाष्टदेखील घातलं नाही.सारा दिवस उपवास पडला.
रात्र झाली,तेव्हा ती आपल्या नवरा याचा जवळ म्हणजे बैलजवळ
गेली आणि आक्रोश करून रडूं लागली.बैलानं तिला कारण विचारलं
ती म्हणाली, ” मी उपाशी आहे.आज मला अन्न नाहीं,पाणी नाही,
खिरीच्या पातेल्यांत सर्पानं गरळ टाकलं, ते माझ्या दृष्टीस पडलं.
ब्राह्मण मारतील म्हणून मी पातेल्याला शिवलें. माझ्या सुनेला राग
आला.तिनं जळतं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली.माझं सारं अंग
दुखतं आहे.ह्याला मी काय करुं.?”
बैलानं तिला उत्तर दिलं,” तू आगळ्या जन्मी विटाळशीचा विटाळ
घरांत कालविलास,संपर्क मला झाला.त्या दोषानं मी बैल झालों.
आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं, तोंड बांधून मला मारलं.
मीदेखील आज उपाशीच आहे.त्याचं श्राध्द फुकट गेलं.”
हे भाषण मुलानं ऐकलं.लागलीच उठून बाहेर आला.बैलाला चारा
घातला.कुत्रीला अन्न घातलं,दोघांना चाम्गाल्म पाणी प्यायला दिलं.
मनांत फार दु:खी झाला.
दुसरे दिवशी सकाळी उठला,घोर अरण्यांत देला.तिथ ऋषींचा मेळा
पाहिला.त्यांना साष्टांग नमस्कार घातला.ऋषींनी त्याला प्रश्न
केला, ” तूं असा चिंताक्रांत कां आहेस ?”
मुलानं सांगितलं,” माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला
कुत्रीचा जन्म आला आहे.त्यांना मोक्ष कसा मिळेल, या चिंतेत मी पडलो आहे.
कृपा करून मला उपाय सांगा.”
तेव्हां ऋषींनी सांगितलं.| तूं ऋषिपंचमीचं व्रत कर.ते व्रत कसं
करावं ? भाद्रपद महिना येतो.चांदण्या (शुक्लपक्ष )पक्षांतली
पंचमी येते.त्या दिवशी काय करावं ? ऐन दुपारच्या वेळीं
नदीवर जावं. आघाड्याची प्रार्थना करावी,त्याच्या कष्टानं
दंतधावन करावं.आंवळकाठी कुटून घ्यावी,तीळ वांटून घ्यावे,
केसांना लावावे,मग अंघोळ करावी,धुतलेली वस्त्रे नेसावी.मग
चांगल्या ठिकाणी जावं.अरुंधती सह सप्तऋषीं चीं पूजा करावी,
असं सात वर्ष करावं.शेवटी उद्दापन करावं. ह्या व्रतानं काय होतं ?
रजस्वलादोष नाहींसा होतो,पापापासून मुक्तता होते.नाना तीर्थांच्या
स्नानंचं पुण्य लागतं. नाना प्रकारच्या दानांचं पुण्य लागतं.मनी इच्छिलेलं
कार्य होतं ”
मुलाने तें व्रत केलं. त्याचं पुण्य आपल्या आईबापास दिलं. त्या पुण्यानं काय
झालं ? रजोदोष नाहींसा झाला. आकाशांतून विमान उतरलं.बैल होता, तो सुंदर
पुरुष झाला.कुत्री होती, ती सुंदर स्त्री झाली.दोघं विमानांत बसून स्वर्गाला गेलीं.
मुलाचा हेतू पूर्ण झाला,तसा तुमचा आमचा होवो.ही साठां उत्तरांची कहाणी,
पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण . * * *

अथ श्रीसत्यविनायक पूजा प्रारंभ

                     ॐ
|| अथ श्रीसत्यविनायक पूजा प्रारंभ ||
श्रीगणेशाय नम : |
आचमन – ॐ केशवाय नम : | ॐ नारायणाय नम : | माधवाय नम : | ॐ गोविन्दाय नम : |
ॐ केशवाय नम : | ॐ नारायणाय नम : | ॐ माधवाय नम : ॐ गोविन्दाय नम : |
विष्णवे नम : | मधुसूदनाय नम : | त्रिविक्रमाय नम : | वामनाय नम : श्रीधराय नम : | हृषीकेशाय नम : |
पद्मनाभाय नम : दामोदराय नम : संकर्षणाय नम : | वासुदेवाय नम : | प्रद्दुम्नाय नम : | अनिरुध्दाय नम : |
पुरुषोत्तमाय नम : | अधोक्षजाय नम : | नरसिंहाय नम : | अच्युताय नम : | जनार्दनाय नम : | उपेन्द्राय नम : |
हरये नम : |श्रीकृष्णाय नम : |
प्राणायाम – प्रणवस्य परब्रह्मरुषि : | परमात्मा देवता | दैविगायत्री छन्द: | (सप्तानां व्याहृतीनां विश्र्वामित्र -जमदग्नि –
भरव्दाज -गौतम-अत्रि-वसिष्ठ -कश्यपा ऋषय 😐 अग्निवाय्वादित्य -बृहस्पति -वरुणेन्द्र -विश्र्वेदेवा : देवता : |गायत्र्युष्णिगनुष्टुब्र्
ब्रुतिपंक्तित्रिष्टु -ब्जगत्यश्चन्दांसि | गायत्र्या गाथिनो विश्र्वामित्र ऋषि : | सविता देवता | गायत्री छंद : | गायत्रिशिरस :
प्रजापतिर् ऋषि : ब्रह्मग्निवाय्वादित्या देवता : | यजु SHCHAM द : | ) प्राणायामे विनियोग : |
ॐ भू : | ॐ भुव : | ॐ स्व : | ॐ मह : | ॐ जन | ॐ तप : | ॐ सत्यम् |
ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि | धियो यो न : प्रचोदयात् |
ॐ आपो ज्योती रसो s मृ तं ब्रह्मभूर्भुव : स्वरोम् |
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटि -समप्रभ | निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा

                   DSCF2719

गणपती

                                        ॐ
गणपती : १९९६ साल ! भाद्रपद महिना व सप्टेंबर महिना !
आम्ही त्याच्या आधी ३०/३५ वर्ष भाद्रपद शुक्लपक्ष मध्ये गणपती आणलेले
आहेत.पुष्कर आमचा मुलगा ! अमेरिका येथे जाण्यास निघाला.वाटलं गणपती व
याची तारीख दिनांक अमेरिका येथे जाण्याची तारीख एक आली तर आपण सर्वजण
विमानतळ तेथे कसे जाणार ! पण त्याची तारीख १५ सप्टेंबर ला आली.१४ सप्टेंबर ला रात्री
मी, हे,प्रणव, कमल माऊशी,व पुष्कर चा मित्र मकरंद व पुष्कर सर्वजण १४ सप्टेंबर ११ वाजता
मुंबई विमान तळ येथे पोहोचलो.१५ सप्टेंबर ला त्याचे विमान रात्री अडीच वाजता अमेरिका येथे
जाण्यास सुटले.आम्ही सकाळी ९ च्या कोयना मुंबई कोल्हापूर रेल्वे आलो रात्री १० वाजता.
१५ सप्टेंबर ला आलो १६ सप्टेंबर ला भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थी ला सकाळी गणपती आणले.i
नेहमी प्रमाणे पूजा नैवेद्द केला.झाला.सकाळी पुष्कर च्या मित्रा चा फोन पुष्कर अमेराका येथे आला
पुष्कर कडे तेव्हा फोन नव्हता.मी च घेतला मला एकदम काही सुचेना कस असेल मी मित्रा विचारत होते.
त्याने ठेवून दिला. १६ तारीख ला गणपती आले तो दिवस पुष्कर चा संध्याकाळी त्यान बाहेरून आम्हाला
फोन केला मी सुखरूप व मजेत आहे.लगेच ठेवला आता आम्ही खूप वेळ अमेराका तून बोलतो पण ते २ मिनिट
आठवतात.आताही !गणपती ने स्वत:चं आमच्या कडून करून घेतलं व पुष्कर ची अमेरिका विमानतळ हि करून
घेतलं !
आपल्याला वाटतं मातीचा गणपती ! पण तो आपणास सर्व देऊन आपल्या कडून करून घेतो ! हे नक्की चं !

उकडी चे मोदक

                                        ॐ
उकडी चे मोदक : एक नारळ याचे खोबर खोवून घेतले.
एक बाउल खोबर कीस एक बाउल केले झाले.त्यात एक बाउल
गूळ घातला. खोबर गूळ व खोबरातील पाणी एका पातेल्यात घेतले.
नारळ याचे पाणी प्यायले तर नैवेद्द उष्टा होतो. व नारळ याचे पाणी
सर्वांना मिळते.नारळ खोबर गूळ नारळ याचे पाणी पेटत्या गॅस वर पातेले
ठेवले.चांगले शिजविले फार घट्ट केले नाही.कडक होते.
दुसऱ्या पातेल्यात एक बाउल पाणी घातले.थोड मीठ घातले.तेल एक चमचा
घातले. पाणी उकळू दिले.एक बाउल तांदूळ याचे पीठ घातले.चांगली वाफ आणली.
झाकण ठेवले.
तांदूळ पीठ याची उकड चांगली केली.झाली.
एका ताटात थोडी थोडी तांदूळ याची उकड घेतली.तांदूळ याचा गोळा करून त्यात
नारळ याचे खोबर गूळ नारळ याचे पाणी याचे केलेले सारण भरले.अकरा ११ मोदक
केले झाले. दोन २ कारंजी केल्या.हे सर्व कुकर मध्ये पाणी घालून भांड्यात तांदूळ याचे
उकडी चे मोदक याला कुकर चे झाकण ठेवून वाफ आणली शिट्टी दिली नाही.
अशा प्रकारे तांदूळ पीठ नारळ खोबर नारळ पाणी गूळ सर्व एकत्र मोदक तयार केले.
झाले. मी केले ! आकार हाताने च मोदक यांना दिला.नीट नाही आला.
पण आमचा प्रणव म्हणाला मोदक चं छान झालेत ! आणि काय हवे ! हवं !

             DSCF2918 DSCF2913

 DSCF2914 DSCF2915DSCF2910

गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया!
घरातील गणपती.

 

कहाणी श्रीगणपतीची

कहाणी श्रीगणपतीची
ऐका, भगवान गणेशा तुमची कहाणी !
निर्मळ मळे, उदकाचे तळें बेलाचा वृक्ष,सुवर्णाची कमळे,
विनायकाची देवळें -रावळें. मनाचा गणेश मनीं वसावा.
हा वसा कधी घ्यावा ? श्रावणाच्या चौथीं घ्यावा.माघी
संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं ? पशापायलीचं पीठ
कांडावं, अठरा लाडू करावे.सहा देवाला द्दावे, सहा ब्राह्मणाला
द्दावे, सर्व कुटुंब मिळून सहांचें भोजन करावं.अल्पदान महापुण्य
असा गजानन स्मरावा, मनीं पाविजे चिंतिलं लाभिजे.मन:कामना
कार्यसिद्धी निर्विघ्न कारंजे.
ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.
* * *

DSCF2719

श्री सत्यविनायक

     ॐ
श्री सत्यविनायक
पूजा व व्रतकथा
गणपतिपूजन
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ | निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||
मुख्य पूजा
श्र्वेतांगं श्र्वेतवस्त्रं हितकुसुमगणैरर्चितंश्रेतगंधै : क्षीराब्धौ रत्नपीठे सुरतरुविमले रत्नसिंहासनस्थम् |
दोर्भि : पाशांकुशेष्टाभयधृतिरुचिरं चंद्रमौलिं त्रिनेत्रम् ध्यायेत् शांतयर्थमीशं गणपतिममलं सर्वदा सुप्रसन्नम् || १ ||
एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुरभुजम् | पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सत्यविनायकम् || २ ||
श्रीसत्यविनायकाय नम : ध्यानार्थे दुर्वांकुरान् समर्पयामि |
(ॐ सहस्त्रशीर्षा O ) विघ्नराज नमस्तुभ्यं आगच्छ गिरिजात्मज | इमां मया कृतां पूजां गृहाण सुरसत्तम ||
श्री सत्यविनायकाय नम : | आवाहनार्थे दुर्वांकुरान् समर्पयामि |
अनेकरत्नसंयुक्तं मुक्ताहारैर्विभूषितम् | स्वर्णसिंहासनं देव प्रीत्यर्थ प्रतिगृह्यताम् || श्री सत्यविनायकाय नम 😐
आसनार्थे दुर्वांकुरान् समर्पयामि | उमासुत नमस्ते S स्तु शंकरप्रिय सिध्दिद | भक्त्या पाद्दं माया दत्तं स्वीकुरु प्रनतप्रिय ||
श्री सत्यविनायकाय नम : | पादयो : पाद्दं समर्पयामि |
( ॐ त्रिपादूर्ध्व O ) व्रतद्दिश्य विघ्नेश गंधपुष्पाक्षतैर्युतम् | गृहाणार्घ्यं मया दत्तं सर्वसिध्दिं प्रयच्छ मे ||
श्री सत्यविनायकाय नम : | हस्तयो : अर्घ्यं समर्पयामि |
( ॐ तस्माव्दिराळजा O ) गंगाजलं समानीतं सुर्वणकलशे स्थितम् | इदमाचमनं देव ग्रहाण गणनायक ||
श्री सत्यविनायकाय नम : |आचमनीयं समर्पयामि | ( ॐ यत्पुषेण हविषा O )
गंगा सरस्वती रेवा-पयोष्णी-नर्मदाजलै : | अनापयामि गणाध्यक्ष तत : शांतिं प्रयच्छ मे ||
श्री सत्यविनायकाय नम : | स्नानं समर्पयामि |स्नानांतरेण आचमनीयं समर्पयामि |
मध : ( ॐ मधुवाता ऋतायते O ) सर्वौषधिसमुत्पन्नं पीयूषसदृशं मधुं | स्नानार्थं ते प्रयच्छामि गृहाण गिरिजासुत ||
श्री सत्यविनायकाय नम : | मधुस्नानं समर्पयामि | मधुस्नानानंतरं शुध्दोदकस्नानं समर्पयामि | पुष्पं च समर्पयामि
साखर : ( ॐ स्वादु : पवस्व O ) इक्षुदंडसमुभ्दूतदिव्यशर्करया ह्यहम् | स्नापयामि महाभक्त्या परितो भव शिवात्मज ||
श्री सत्यविनायकाय नम : शर्करास्नानं समर्पयामि | शर्करास्नानानंतरं शुध्दोदकस्नानं समर्पयामि | पुष्पं च समर्पयामि |
( ॐ गंधव्दारां दुराधएषां O ) कर्पूरैलासमायुक्तं सुगंधद्रव्यसंयुतम् | गंधोदकं गणाध्यक्ष स्नानार्थं प्रतिगृह्यताम् ||
श्री सत्यविनायकाय नम : | गंधोदकस्नानं समर्पयामि | गंधोदकस्नानानंतरंशुध्दोदकस्नानं समर्पयामि | सकलपूजार्थे गंधपुष्पं /
गंधदूर्वांकुरान् समर्पयामि |
पूर्वपूजा : श्रीसत्यविनायकाय नम : | धूपं आघ्रापयामि | श्री सत्यविनायकाय नम : | दीपं दर्शयामि |
( ॐ सत्यंतवर्तेन परिषिंचामि ) ( ॐ ऋतं त्वा सत्येन परिषिंचामि | ) अमृतोपस्तरणमसि |
वैदिक – (ॐ प्राणाय स्वाहा | ॐ अपानाय स्वाहा | ॐ व्यानाय स्वाहा |ॐ उदानाय स्वाहा | ॐ समानाय स्वाहा | ॐ ब्रह्मणे स्वाहा |
नैवेद्द्मध्ये पानीयं समर्पयामि |
( ॐ प्राणाय स्वाहा | ॐ अपानाय स्वाहा | ॐ व्यानाय स्वाहा | ॐ उदानाय स्वाहा | ॐ समानाय स्वाहा | ॐ ब्रह्मणे स्वाहा |)
उत्तरापोषणं समर्पयामि | हस्तप्रक्षालनं समर्पयामि | मुखप्रक्षालनं समर्पयामि | आचमनीयं समर्पयामि | करोव्दर्तनार्थे चंदनं समर्पयामि |
मुखवासार्थे, पूगीफलतांबूलं, खर्जुरीफलं, वाताम्बुफलं, यथासम्पादित कालोभ्दवफलं च समर्पयामि | सुवर्णपुष्पदक्षिणां च समर्पयामि |
नमोस्करोमि |
( ॐ कनिक्रदज्जनुष O ) तैले लक्ष्मीर्जलेगंगा, यतस्तिष्ठति वै प्रभो | तन्मांगलिकस्नानार्थं, जलतैले समर्पये ||
श्री सत्यविनायकाय नम : | अभ्यंगस्नानं समर्पयामि | उष्णोदकस्नानं समर्पयामि |
अनेन कृतपूर्वाराधनेन श्री सत्यविनायक : प्रियताम् | न मम |

          DSCF2719

गणपती

                                           ॐ
तरुण भारत मध्ये दिनांक तारीख १५ सप्टेंबर (९) २०१२ साल
पण नंबर ५ पाचं शनिवार च्या अंकात पेपर मध्ये हातात वेगवेगळ्या
हातात पांढरे गणपती आहेत.पाहण्यास खूपच मस्त छान वाटतं आहे.

       DSCF2905 DSCF2906

                   DSCF2904

हरतालिका

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन वर्षाऋतु निज भाद्रपद शुक्लपक्ष
मंगळवार ३ हरतालिका तृतीया आहे.
तसेच दिनांक तारीख १८ सप्टेंबर २०१२ साल आहे.
त्या निमीत्त हरतालिका ची कहाणी लिहित आहे.

ऐका हरतालिके, तुमची कहाणी !
एके दिवशी ईश्र्वरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती.
पार्वतीनं शंकराला विचारलं, ” महाराज, सर्व वृतांत चांगलं असं व्रत कोणतं ?
तेव्हा शंकर म्हणाले,” जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहांत सूर्य श्रेष्ठ, चार वरणात
ब्राह्मण श्रेष्ठ, देवांत विष्णू श्रेष्ठ, नाद्दांत गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणं हरतालिका हे
व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे.”ते तुला सांगतो.तेंच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस
आणि त्याच पुण्याई नं तूं मला प्राप्त झालीस.ऐक.हे व्रत भाद्रपद महिन्यांतल्या
पहिल्या तृतीयेला करावं . पूर्वी तूं ते कसं केलंस तें मी तुला आतां सांगतो.
” मी तुला प्राप्त व्हावं म्हणून तूं लहानपणी मोठं तप केलंस.
चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस.थंडी,पाऊस, ऊन हीं
तिन्हीं दु:ख सहन केलीस.हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दु:ख झालं,
आणि अशी कन्या कोणास द्दावी ? अशी त्याला चिंता पडली.इतक्यात तिथं
नारदमुनी आले,हिमालया नं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं.
तेव्हा नारद म्हणाले, ” तुझी कन्या उपवर झाली आहे,ती विष्णूला द्दावी.
तो तिच्यायोग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे.
म्हणून इथं मी आलो आहे.”
हिमालयाला मोठा आनंद झाला.त्यानं ही गोष्ट कबूल केली.
नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले.त्यांना ही हकीकत
कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले.
नारद गेल्यावर तुझ्या बापानं ती गोष्ट तुला सांगितली.
ती गोष्ट तुला रुचली नाही.तूं रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं
रागावण्या चं कारण विचारलं. तेव्हा तूं सांगितलंस, ‘महादेवावांचून
मला दुसरा पती करणे नाहीं, असा माझा निश्र्चय आहे.” असं असून माझ्या
बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे.ह्याला काय उपाय करावा ?
मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस
पडली.जवळ च एक गुहा आढळली त्या गुहेंत जाऊन तूं उपवास केलास.तिथं माझं
लिंग पार्वतीसह स्थापिलंस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुध्द तृतीया चा
होता. रात्रीं जागरण केलसं, त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं, नंतर मी तिथं आलों.
तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हानालीस,” तुम्ही माझं पती व्हावं,
याशिवाय दुसरी इच्छा नाही,”
नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो.पुढं दुसऱ्या दिवशी ती
व्रतपूजा तूं विसर्जन केलीस.मैत्रीणींसह त्याचं पारणं केलंस. इतक्यांत
तुझा बाप तिथं आला.त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं.
मग तूं सर्व घडलेली हकीकत त्याला सांगितलीस.पुढं त्यानं तुला मलाच
देण्याचं वचन दिलं व तुला घेऊन तो घरी गेला.मग कांही दिवसांनी
चांगला मुहूर्त पाहून त्यानं तुला मला अर्पण केलं.अशी या व्रतानं तुझी
इच्छा पूर्ण झाली.याला हरतालिका-व्रत असं म्हणतात.
याचा विधी असा आहे.
” ज्या ठिकाणी हें व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं.
केळीचे खांब लावून तें स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून
पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारें त्याची पूजा
करावी आणि मनोभावें प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री
जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो.साती जन्माचं
पातक नाहीसं होतं.राज्य मिळतं.स्त्रियांच सौभाग्य वाढतं. या दिवशी
बायकांनी जर कांहीं खाल्लं, तर त्या जन्मावाम्ध्या व विधवा होतात.
दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो.कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण
द्दावं.दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं.”
ही साठां उत्तरांची कहाणी, पांचा उत्तरीं,देवाब्राह्मणाचे
व्दारी, गाईचे गोठी, गोठीम, पिंपळाचे पारीं सुफळ संपूर्ण.

निज भाद्रपद शुक्लपक्ष

                                  ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन वर्षाऋतु निज भाद्रपद शुक्लपक्ष २ सोमवार
तसेच तारीख दिनांक १७ सप्टेंबर २०१२ साल आहे.
भाद्रपद महिना सुरु होत आहे.

     

ब्लॉग पोस्ट ८२८ वां

                                                 ॐ
ब्लॉग पोस्ट ८२८ वां.: दिनांक तारीख १६ सप्टेंबर (९) २०१२ साल चालू आहे.
माझा ब्लॉग पोस्ट आठशे अठ्ठावीस वां ८२८ होत आहे.
कणीस,भुईमुगाच्या शेंगा, गव्हाची खीर,सुदामा पोहे,साबुदाणा खिचडी,लिहिली आहे.
अधिक महिना भाद्रपद चोवीस २४ वर्षाने येणारा याची माहिती लिहिली आहे.श्री दत्त
श्री कृष्ण याची आरती लिहिली आहे.विचार,श्री क्षेत्र गाणगापूर आहे.
आपण सर्वांनी वसुधालय माझे ब्लॉग वाचन करून प्रतिक्रिया दिल्यातं! व भेटी दिल्यातं !.
त्या बध्दल बद्दल धंयवाद ! धन्यवाद. !
भेटी ७६,१०१ आहेत. ६,१६ A . M . १६. ९. २०१२ साल .

            DSCF2902

श्रीकृष्णा ची आरती

                              ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन वर्षाऋतु अधिक महिना भाद्रपद २४ चोवीस वर्षाने
येणारा १ शनिवार अधिक भाद्रपद शुक्लपक्ष ते शनिवार रविवार
भाद्रपद अधिक भाद्रपद कृष्णपक्ष अमावास्या एवढा महिना
अधिक भाद्रपद महिना झाला आहे.चोवीस २४ वर्षाने येणारा !
तसेच दिनांक तारीख १८ ऑगस्ट ते १५ / १६ सप्टेंबर २०१२ साल ला
अधिक भाद्रपद महिना आला आहे.
ह्या महिना मध्ये कृष्ण याची पूजा जप करतात.गाई वासरू याची पूजा करता.
मी आता श्रीकृष्णा ची आरती लिहीत आहे.

                                                  श्रीकृष्णा ची आरती

ओवाळूं आरती मदन गोपाळा श्यामसुंदर गळां वैजयंती माळा || धृ o ||
चरणकमळ ज्याचे अति सुकुमार | ध्वज्वज्रांकुश ब्रीदाचे तोडर ||
ओंवाळूं o || १ || नाभिकमल ज्याचें ब्रह्मयाचें स्थान |हृदयीं पदक
शोभे श्रीवत्सलांछन || ओंवाळूं || २ ||मुखकमल पाहता सूर्याचिया कोटी |
वेधलें मानस हरपली दृष्टी || ओंवाळूं o || ३ ||जडितमुगुट त्याच्या
दैदिप्यमान | तेणें तेजें कोदलें अवघें त्रिभुवन || ओंवाळूं o || ४ ||
एका जनार्दनीं देखियलें रूप || रूप पाहो जातां अवघें झाले तद्रुप ||ओंवाळूं o || ५ ||

DSCF2761

गाणगापूर

गाणगापूर : गाणगापूर येथे श्री क्षेत्र गाणगापूर श्री निर्गुण मठ ( दत्त मंदिर आहे.निर्गुण पादुका दर्शन ( हे कर्मस्थान आहे.) तेथे रांगोळ्या पणत्या तेल वातीचे दिवे आहेत. लाईट पंखे आहेत. गुरूं चे छायाचित्र आहेत चांदीचे नक्षी दार दरवाजा आहे. भक्त लोक आहेत. ब्राह्मण ( गुरुजी ) आहेत.रोज आरती पालखी रात्री साडे आठ वाजता असते. भजन असतात. देवूळ च्या बाहेर पेढे प्रसाद पुस्तक जप माळा दत्त यांचे धातूमध्ये छायाचित्र आहेत. नदी आहे. भक्ती स्थान आहे. तेथे भक्त पोथी वाचतात.रांगोळ्या काढतात. फुल मिळतात.

कल्लेश्र्वर कल्लेश्वर येथे पंचमुखी गणपती आहे. सपत्नीक नवग्रह आहेत. शनैश्वर आहे.
चिंतामणी दगड आहे.त्यावर हात ठेवला व मनातील विचार सांगितला तर काम होणार असेल तर च हात पुढे पुढे सरकतात.असे तेथील स्थायिक भक्त म्हणतात. सांगतात.

गावात धन्य भाजी दुध सर्व ताज मिळते. बटाटे वडे पण मिळतात. शाळा आहे. मुल
भोवरा व खो. खो. खेळतांना पाहिले आहे. दर गुरुवार बाझार भरतो. गाई कुत्री आहेत.
असे गाणगापूर देवस्थान आहे सर्व उपलब्द सोयींनी सोइंनी भरलेले भरलेलं आहे.!

DSCF2885DSCF2827DSCF2877DSCF2780  DSCF2857DSCF2867

विचार

दुसऱ्यांना समजणे म्हणजे हुशारी

स्वतःला समजणे म्हणजे बुद्धी,

दुसऱ्यां वर अधिपत्य म्हणजे बळ

स्वतः वर अधिपत्य म्हणजे ताकद

भाद्रपद अधिक महिना

                                ॐ
अधिक महिना : भाद्रपद अधिक महिना व अधिक महिना याची
मी मला माहीत असलेली माहिती मी माझ्या ब्लॉग मध्ये लिहिली आहे.
कायम ही माहिती माझ्या ब्लॉग मध्ये राहणार आहे.
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन वर्षाऋतु अधिक भाद्रपद महिना कृष्णपक्ष
शनिवार १४ दर्श अमावास्या आहे.तसेच दिनांक तारीख १५ सप्टेंबर (९)
२०१२ साल आहे.शनिवार व रविवार मध्ये ३० आहे. रविवार च्या खाली १ आहे.
रविवार थोडी अमावास्या आहे. भाद्रपद अधिक महिना २४ वर्षाने येणारा संपत आहे.

            

गाणगापूर

                         ॐ
भाद्रपद अधिक महिना २४ वर्षाने येतो.
गाणगापूर यात्रा माझी मला पाहिजे त्याप्रमाणे पार पडली.
झाली.कोल्हापूर ते गाणगापूर जाणे येणे.तेथील देव दर्शन
भाद्रपद शुक्लपक्ष प्रदोष उपासाची साबुदाणा खिचडी मी
मी केलेली भिक्षावळ दिली.हे मला समाधानाचं आहे.
गाणगापूर तिन्ही देवस्थान दर्शन झाली.ह्याच तृप्तता आहे.
नातेवाईक पण भेटले याच हलक स आहे.
हे सर्व घडून येण माझं कडून घडल ही सर्व शक्ती दत्त गुरु यांची
कृपा आहे हे नक्की चं ! दत्त गुरु यांना पूर्ण अगदी मनापासून नमस्कार !
हे एवढं घडण सोप नाही. बाप रे !

      DSCF2827 DSCF2795

  DSCF2820 DSCF2875

 DSCF2831 DSCF2798

श्रीदत्त श्रीदत्त आरती

श्रीदत्त ची आरती
कृष्णा – पंचगंगा निजस्थान | चरित्र दावुनि केलें
गाणगापुरि गमन || तेथें भक्तश्रेष्ठ त्रिविक्रयति जाण |
विश्र्वरुपें दिधलें दर्शन : २ || जय देव जय देव जय सद्गुरुदत्ता |
नृसिंहसारस्वती जय विश्र्वंभरिता || धृ o || वंध्या साठीं वर्षें पुत्रनिधान |
मृत ब्राह्मण उठविला तीर्थ शिंपून ||वांझ महिषी काढवी दुग्ध दोहून |
अंत्यजामुखें वदवी निगमागम पूर्ण || जय o || २ || शुष्ककाष्ठीं पल्लव
दावुनी लवलाही | कुष्टी ब्राह्मण केला निजदेहीं || अभिनव महिमा त्याचा
वर्णूं मी कायी म्लेंच्छराज येउनी वंदी श्रीपायीं || जय देव o

DSCF2812 DSCF2781
DSCF2829DSCF2798DSCF2852 DSCF2882DSCF2883 DSCF2873DSCF2873

गाणगापूर

                               ॐ
गाणगापूर : कोल्हापूर हून गाणगापूर जाण्यासाठी संध्याकाळी
सहा (६) वाजतां लाल यस्टी S .T .सुटते.रस्यात सांगली मिरज
सोलापूर पंढरपूर अक्कलकोट व ईतर गावं लागतात.गाणगापूर
कर्नाटक मध्ये आहे.गाणगापूर हून संध्याकाळी चार (४) बस सुटते.
कोल्हापूर येथे रात्री अडीच २|| वाजता येते.मी काही यस्टी त बसून
गाणगापूर येथे जाताना फोटो छायाचित्र घेतली आहे ती पाहण्यास
नक्कीच आवडतील.

      DSCF2769 DSCF2770

   DSCF2771 DSCF2772

बारा ज्योर्तिंलीग

                                              ॐ
अधिक महिना भाद्रपद चालु आहे. देव व धार्मिक पण मनात भरतं .
मी पूर्वी वसुधालय माजःया माझ्या ब्लॉग मध्ये ज्योर्तिंलीग याची माहिती
स्वतंत्र फोटो दाखवून दिली आहे.आता सर्व एकत्र बारा ज्योर्तिंलीग याचे छायाचित्र
फोटो एकत्र दाखवीत आहे.एकत्र ज्योर्तिंलीग याचे फोटो देव दर्शन अधिक महिना भाद्रपद
चोवीस वर्षाने येतो.जेवढे देव दर्शन होईल तितके चांगले.म्हणून एकत्र छायाचित्र बारा १२
ज्योर्तिंलीग याचे छायाचित्र फोटो दाखवीत आहे.श्री क्षेत्र गाणगापूर येथील मी प्रत्यक्ष जाऊन
काढलेले छायाचित्र दाखविले आहेत आता बारा ज्योर्तिंलीग याचे एकत्र छायाचित्र फोटो दाखवीत आहे.
सर्व माहिती माझ्या ब्लॉग मध्ये आहे चं !१२

jyotirlingams12

गाणगापूर

                           ॐ
गाणगापूर : मी खूप वेळा गणगापूर पाहिले आहे.
आता भाद्रपद अधिक महिना मध्ये नुकतिच जाऊन आले आहे.
१) भीमा अमरजा औदुंबरवृक्ष संगमेश्वर व श्रींचे अनुष्ठान स्थान,
( हे भक्ती स्थान आहे.)संगमावर दत्त राहत असतं व ह्या नदी स्नान
करीत असतं.
२) श्री क्षेत्र गाणगापूर श्री निर्गुण मठ ( दत्तमंदिर ) निर्गुण पादुका दर्शन
हे कर्मस्थान आहे. लोकांच्या सांगण्यावरून दत्त तेथे राहण्यास गेले.
म्हणून तेथे त्यांच्या पादुका आहेत.देऊळ आहे.
३) कल्लेश्र्वर पंचमुखी गजानन सपत्नीक नवग्रह शिवालय चिंतामणी आहे.
कल्लेश्र्वर याचे दर्शन घेतले कि सर्व गाणगापूर याचे दर्शन झाले असे मानतात.म्हणतात.
मी मंदिर देऊळ याचे आतील व आजूबाजूचे छायाचित्र फोटो काढलेले दाखवीत आहे.

    DSCF2795 DSCF2798

  DSCF2799 DSCF2807

  DSCF2820 DSCF2847

  DSCF2836 DSCF2875

  DSCF2873 DSCF2827

 DSCF2831 DSCF2883

गाणगापूर

                                           ॐ
गाणगापूर : भोवरा खेळ : पूर्वी लाकडी टोकदार खिळा खाली असलेले भोवरे मिळत.
आता प्लॅस्टिक चे आतून च दोरा असलेले भोवरे मिळतात.मला गाणगापूर येथे
प्लॅस्टिक चा पण टोक खाली असलेला भोवरा मिळाला.तेथे मूलं खेळत होती.मी
त्यांना विचारले ! हे भोवरे कोठे मिळतात.त्यांनी मला दुकान दाखविले.
मी भोवरा ५ रुपये ला घेतला.दोरी ३ रुपये ला घेतली.तेथील सर्वजण माझ्या कडे
बघत होती.आजी भोवरा व दोरी खेळ विकत घेते.त्यांना खूप मजा वाटली.!
ओलीपींक !

        DSCF2840 DSCF2839

     DSCF2888 DSCF2828

अधिक भाद्रपद

                          ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन वर्षाऋतु अधिक भाद्रपद कृष्णपक्ष बुधवार
११ कमला एकादशी आहे.
दिनांक तारीख १२ सप्टेंबर (९) २०१२ साल आहे.बुधवार आहे.
मी रांगोळी पसरून ॐ हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हाताच्या बोटाने
जप लिहिला आहे.

      DSCF2901 DSCF2883

गाणगापूर

                            ॐ
गाणगापूर : गाणगापूर येथे दर गुरुवार ला बाझार भरतो.
रोज भाजी पण मिळते.धान्य याची दुकान पण आहेत.तरी पण
गुरुवार चा बाझार पाहण्यास माल कापड खरेदी वस्तू तेथील लोक
घेतात.आम्ही तेथे भाजी फळ घेतली.गरम गरम मिरची भजी खाल्ली .

DSCF2824 DSCF2825

DSCF2823 DSCF2826

DSCF2827 DSCF2830

गाणगापूर

                    ॐ
                गाणगापूर
                   ॐ
गाणगापूर : काहीं राहिलेले छायाचित्र !

 DSCF2813 DSCF2869

 DSCF2880 DSCF2879DSCF2838  DSCF2836

 DSCF2845 DSCF2792DSCF2831 DSCF2827

गाणगापूर

                                   ॐ
गाणगापूर : कल्लेश्र्वर ( कल्लेश्वर ) कल्लेश्र्वर येथील दर्शन घेतले
म्हणजे गाणगापूर यात्रा पूर्ण झाली असे म्हणतात.कल्लेश्र्वर हे
मुक्तीस्थान आहे. दत्त यात्रा पूर्ण झाली मानतात.मी प्रत्येक वेळेला
सर्व गाणगापूर देव स्थळ पाहिली आहे.पूर्ण केली आहे. गाणगापूर ची
यात्रा पूर्ण केली आहे.झाली आहे.

       DSCF2868 DSCF2872

   DSCF2871 DSCF2874

  DSCF2860 DSCF2873

  DSCF2875 DSCF2882

DSCF2861 DSCF2866

गाणगापूर

                                ॐ
गाणगापूर : भाद्रपद प्रौष्ठपदी पौर्णिमा ला श्रीमत भागवत ग्रंथ किंवा
देवी भागवत हेम सिहांसन (सोन्याच सिहांसन ) यावर ठेवून पूजन करून
ब्राह्मण यांना दान करावे.असे भागवत ग्रंथात च वर्णन आहे.पण यंदा
अधिक भाद्रपद आल्यामुळे अधिक भाद्रपद पौर्णिमा ला देवी भागवत किंवा
भागवत ग्रंथ दान करतात. मी अन्नपूर्णा स्तोत्र दान केले आहे.पुस्तक.

    DSCF2832 DSCF2834

 DSCF2842 DSCF2854DSCF2837 DSCF2855

DSCF2847  DSCF2850

अधिक महिना भाद्रपद

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर दक्षिणायन वर्षाऋतु अधिक भाद्रपद 7 कृष्णपक्ष कालाष्टमी ८ शनिवार तसेच तारीख दिनांक ८ सप्टेंबर (९) २०१२ साल भाद्रपद अधिक महिना २४ वर्षाने येणारा कृष्णपक्ष झाली आहे.

मी कालाष्टमी म्हणून घरात पातळ पोहे अर्धा बाऊल घेतले. एक बाऊल दुध घेतले.दोन चमचे दही घेतले.चवी पुरते मीठ घेतले. घरातील हिरवी वाळलेली मिरची दोन घेतल्या. मिरची हातानेच बारीक केली. पोहे दुध दही मीठ हिरवी मिरची सर्व एकत्र करून कृष्ण देव यांना घरात नैवेद्द केला. झाला. खर तर ज्वारीच्या लाह्याचा सर्व एकत्र करून गोपाल काला करतात.

मी सुदामा पोहे म्हणून पोहे ह्यात सर्व एकत्र कला केला आहे. पोहे याचा नैवेद्द केला आहे.

कालाष्टमी ला !

 

गाणगापूर

                 ॐ
गाणगापूर : संगमेश्वर व श्रींचे अनुष्ठान.
(हे भक्ती स्थान आहे.) येथे दत्त भीमा अमरजा
दोन नद्दा च्यां संगमात स्नान करतं व तेथे च रहात असतं.
संगमेश्वर येथील छायाचित्र फोटो मी लावत आहे.

DSCF2808 DSCF2818

DSCF2822 DSCF2821

DSCF2817 DSCF2820

DSCF2819 DSCF2816

%d bloggers like this: