आपले स्वागत आहे!

Archive for सप्टेंबर 19, 2012

गणपती

                                        ॐ
गणपती : १९९६ साल ! भाद्रपद महिना व सप्टेंबर महिना !
आम्ही त्याच्या आधी ३०/३५ वर्ष भाद्रपद शुक्लपक्ष मध्ये गणपती आणलेले
आहेत.पुष्कर आमचा मुलगा ! अमेरिका येथे जाण्यास निघाला.वाटलं गणपती व
याची तारीख दिनांक अमेरिका येथे जाण्याची तारीख एक आली तर आपण सर्वजण
विमानतळ तेथे कसे जाणार ! पण त्याची तारीख १५ सप्टेंबर ला आली.१४ सप्टेंबर ला रात्री
मी, हे,प्रणव, कमल माऊशी,व पुष्कर चा मित्र मकरंद व पुष्कर सर्वजण १४ सप्टेंबर ११ वाजता
मुंबई विमान तळ येथे पोहोचलो.१५ सप्टेंबर ला त्याचे विमान रात्री अडीच वाजता अमेरिका येथे
जाण्यास सुटले.आम्ही सकाळी ९ च्या कोयना मुंबई कोल्हापूर रेल्वे आलो रात्री १० वाजता.
१५ सप्टेंबर ला आलो १६ सप्टेंबर ला भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थी ला सकाळी गणपती आणले.i
नेहमी प्रमाणे पूजा नैवेद्द केला.झाला.सकाळी पुष्कर च्या मित्रा चा फोन पुष्कर अमेराका येथे आला
पुष्कर कडे तेव्हा फोन नव्हता.मी च घेतला मला एकदम काही सुचेना कस असेल मी मित्रा विचारत होते.
त्याने ठेवून दिला. १६ तारीख ला गणपती आले तो दिवस पुष्कर चा संध्याकाळी त्यान बाहेरून आम्हाला
फोन केला मी सुखरूप व मजेत आहे.लगेच ठेवला आता आम्ही खूप वेळ अमेराका तून बोलतो पण ते २ मिनिट
आठवतात.आताही !गणपती ने स्वत:चं आमच्या कडून करून घेतलं व पुष्कर ची अमेरिका विमानतळ हि करून
घेतलं !
आपल्याला वाटतं मातीचा गणपती ! पण तो आपणास सर्व देऊन आपल्या कडून करून घेतो ! हे नक्की चं !

उकडी चे मोदक

                                        ॐ
उकडी चे मोदक : एक नारळ याचे खोबर खोवून घेतले.
एक बाउल खोबर कीस एक बाउल केले झाले.त्यात एक बाउल
गूळ घातला. खोबर गूळ व खोबरातील पाणी एका पातेल्यात घेतले.
नारळ याचे पाणी प्यायले तर नैवेद्द उष्टा होतो. व नारळ याचे पाणी
सर्वांना मिळते.नारळ खोबर गूळ नारळ याचे पाणी पेटत्या गॅस वर पातेले
ठेवले.चांगले शिजविले फार घट्ट केले नाही.कडक होते.
दुसऱ्या पातेल्यात एक बाउल पाणी घातले.थोड मीठ घातले.तेल एक चमचा
घातले. पाणी उकळू दिले.एक बाउल तांदूळ याचे पीठ घातले.चांगली वाफ आणली.
झाकण ठेवले.
तांदूळ पीठ याची उकड चांगली केली.झाली.
एका ताटात थोडी थोडी तांदूळ याची उकड घेतली.तांदूळ याचा गोळा करून त्यात
नारळ याचे खोबर गूळ नारळ याचे पाणी याचे केलेले सारण भरले.अकरा ११ मोदक
केले झाले. दोन २ कारंजी केल्या.हे सर्व कुकर मध्ये पाणी घालून भांड्यात तांदूळ याचे
उकडी चे मोदक याला कुकर चे झाकण ठेवून वाफ आणली शिट्टी दिली नाही.
अशा प्रकारे तांदूळ पीठ नारळ खोबर नारळ पाणी गूळ सर्व एकत्र मोदक तयार केले.
झाले. मी केले ! आकार हाताने च मोदक यांना दिला.नीट नाही आला.
पण आमचा प्रणव म्हणाला मोदक चं छान झालेत ! आणि काय हवे ! हवं !

             DSCF2918 DSCF2913

 DSCF2914 DSCF2915DSCF2910

गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया!
घरातील गणपती.

 

कहाणी श्रीगणपतीची

कहाणी श्रीगणपतीची
ऐका, भगवान गणेशा तुमची कहाणी !
निर्मळ मळे, उदकाचे तळें बेलाचा वृक्ष,सुवर्णाची कमळे,
विनायकाची देवळें -रावळें. मनाचा गणेश मनीं वसावा.
हा वसा कधी घ्यावा ? श्रावणाच्या चौथीं घ्यावा.माघी
संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं ? पशापायलीचं पीठ
कांडावं, अठरा लाडू करावे.सहा देवाला द्दावे, सहा ब्राह्मणाला
द्दावे, सर्व कुटुंब मिळून सहांचें भोजन करावं.अल्पदान महापुण्य
असा गजानन स्मरावा, मनीं पाविजे चिंतिलं लाभिजे.मन:कामना
कार्यसिद्धी निर्विघ्न कारंजे.
ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.
* * *

DSCF2719

श्री सत्यविनायक

     ॐ
श्री सत्यविनायक
पूजा व व्रतकथा
गणपतिपूजन
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ | निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||
मुख्य पूजा
श्र्वेतांगं श्र्वेतवस्त्रं हितकुसुमगणैरर्चितंश्रेतगंधै : क्षीराब्धौ रत्नपीठे सुरतरुविमले रत्नसिंहासनस्थम् |
दोर्भि : पाशांकुशेष्टाभयधृतिरुचिरं चंद्रमौलिं त्रिनेत्रम् ध्यायेत् शांतयर्थमीशं गणपतिममलं सर्वदा सुप्रसन्नम् || १ ||
एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुरभुजम् | पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सत्यविनायकम् || २ ||
श्रीसत्यविनायकाय नम : ध्यानार्थे दुर्वांकुरान् समर्पयामि |
(ॐ सहस्त्रशीर्षा O ) विघ्नराज नमस्तुभ्यं आगच्छ गिरिजात्मज | इमां मया कृतां पूजां गृहाण सुरसत्तम ||
श्री सत्यविनायकाय नम : | आवाहनार्थे दुर्वांकुरान् समर्पयामि |
अनेकरत्नसंयुक्तं मुक्ताहारैर्विभूषितम् | स्वर्णसिंहासनं देव प्रीत्यर्थ प्रतिगृह्यताम् || श्री सत्यविनायकाय नम 😐
आसनार्थे दुर्वांकुरान् समर्पयामि | उमासुत नमस्ते S स्तु शंकरप्रिय सिध्दिद | भक्त्या पाद्दं माया दत्तं स्वीकुरु प्रनतप्रिय ||
श्री सत्यविनायकाय नम : | पादयो : पाद्दं समर्पयामि |
( ॐ त्रिपादूर्ध्व O ) व्रतद्दिश्य विघ्नेश गंधपुष्पाक्षतैर्युतम् | गृहाणार्घ्यं मया दत्तं सर्वसिध्दिं प्रयच्छ मे ||
श्री सत्यविनायकाय नम : | हस्तयो : अर्घ्यं समर्पयामि |
( ॐ तस्माव्दिराळजा O ) गंगाजलं समानीतं सुर्वणकलशे स्थितम् | इदमाचमनं देव ग्रहाण गणनायक ||
श्री सत्यविनायकाय नम : |आचमनीयं समर्पयामि | ( ॐ यत्पुषेण हविषा O )
गंगा सरस्वती रेवा-पयोष्णी-नर्मदाजलै : | अनापयामि गणाध्यक्ष तत : शांतिं प्रयच्छ मे ||
श्री सत्यविनायकाय नम : | स्नानं समर्पयामि |स्नानांतरेण आचमनीयं समर्पयामि |
मध : ( ॐ मधुवाता ऋतायते O ) सर्वौषधिसमुत्पन्नं पीयूषसदृशं मधुं | स्नानार्थं ते प्रयच्छामि गृहाण गिरिजासुत ||
श्री सत्यविनायकाय नम : | मधुस्नानं समर्पयामि | मधुस्नानानंतरं शुध्दोदकस्नानं समर्पयामि | पुष्पं च समर्पयामि
साखर : ( ॐ स्वादु : पवस्व O ) इक्षुदंडसमुभ्दूतदिव्यशर्करया ह्यहम् | स्नापयामि महाभक्त्या परितो भव शिवात्मज ||
श्री सत्यविनायकाय नम : शर्करास्नानं समर्पयामि | शर्करास्नानानंतरं शुध्दोदकस्नानं समर्पयामि | पुष्पं च समर्पयामि |
( ॐ गंधव्दारां दुराधएषां O ) कर्पूरैलासमायुक्तं सुगंधद्रव्यसंयुतम् | गंधोदकं गणाध्यक्ष स्नानार्थं प्रतिगृह्यताम् ||
श्री सत्यविनायकाय नम : | गंधोदकस्नानं समर्पयामि | गंधोदकस्नानानंतरंशुध्दोदकस्नानं समर्पयामि | सकलपूजार्थे गंधपुष्पं /
गंधदूर्वांकुरान् समर्पयामि |
पूर्वपूजा : श्रीसत्यविनायकाय नम : | धूपं आघ्रापयामि | श्री सत्यविनायकाय नम : | दीपं दर्शयामि |
( ॐ सत्यंतवर्तेन परिषिंचामि ) ( ॐ ऋतं त्वा सत्येन परिषिंचामि | ) अमृतोपस्तरणमसि |
वैदिक – (ॐ प्राणाय स्वाहा | ॐ अपानाय स्वाहा | ॐ व्यानाय स्वाहा |ॐ उदानाय स्वाहा | ॐ समानाय स्वाहा | ॐ ब्रह्मणे स्वाहा |
नैवेद्द्मध्ये पानीयं समर्पयामि |
( ॐ प्राणाय स्वाहा | ॐ अपानाय स्वाहा | ॐ व्यानाय स्वाहा | ॐ उदानाय स्वाहा | ॐ समानाय स्वाहा | ॐ ब्रह्मणे स्वाहा |)
उत्तरापोषणं समर्पयामि | हस्तप्रक्षालनं समर्पयामि | मुखप्रक्षालनं समर्पयामि | आचमनीयं समर्पयामि | करोव्दर्तनार्थे चंदनं समर्पयामि |
मुखवासार्थे, पूगीफलतांबूलं, खर्जुरीफलं, वाताम्बुफलं, यथासम्पादित कालोभ्दवफलं च समर्पयामि | सुवर्णपुष्पदक्षिणां च समर्पयामि |
नमोस्करोमि |
( ॐ कनिक्रदज्जनुष O ) तैले लक्ष्मीर्जलेगंगा, यतस्तिष्ठति वै प्रभो | तन्मांगलिकस्नानार्थं, जलतैले समर्पये ||
श्री सत्यविनायकाय नम : | अभ्यंगस्नानं समर्पयामि | उष्णोदकस्नानं समर्पयामि |
अनेन कृतपूर्वाराधनेन श्री सत्यविनायक : प्रियताम् | न मम |

          DSCF2719

%d bloggers like this: