आपले स्वागत आहे!

ऋषिपंचमी

                            ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन वर्षाऋतु निज भाद्रपद शुक्लपक्ष गुरुवार
५ ऋषिपंचमी आहे.
तसेच दिनांक तारीख२० सप्टेंबर (९) २०१२ साल आहे.
कहाणी ऋषीपंचमी ची
ऐका ऋषीश्र्वरांनो, तुमची कहाणी !
आटपाट नगर होतं.तिथं एक ब्राह्मण होता. तो आपला शेतीभाती
करून सुखानं नांदत होता.पुढं एके दिवशी काय झालं ? त्याची बायको
शिवेनाशी झाली.विटाळ तसाच घरांत कालविला.त्या दोषानं काय झालं ?
तिचा नवरा पुढल्या जन्मीं बैल झाला. त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला
देवाची कारणी ! दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती.तो मोठा धार्मिक होता.
देवधर्म करी, श्राध्दपक्ष करी. आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई. एके दिवशी त्याच्या
घरी श्राध्द आलं. बायकोला सांगितलं, ” आज माझ्या बापाचं श्राध्द आहे.खीरपुरीचा
स्वयंपाक कर.”
ती मोठी पतिव्रता होती.तिने चार भाज्या, चार कोशिंबिरी केल्या.
खीरपुरीचा स्वयंपाक केला. इतक्यांत काय चमत्कार झालां ? खिरीचं भांड उघडं
होतं. त्यात सर्पानं आपली गरळ टाकली.हे त्याकुत्री नं पाहिलं.मनांत विचार केला,
‘ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील.मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल,’
म्हणून उधळी,पटकन जाऊन खिरीच्या पातेल्याला शिवली.ब्राह्मणाच्या
बायकोला राग आला.तिनं जळतं कोलीत घेतलं, नि कुत्रीच्या कंबरेत मारलं.
तो स्वयंपाक टाकून दिला.पुन्हां स्वयंपाक केला. ब्राह्मणांनं जेवू घातलं.
कुत्रीला कांही उष्टमाष्टदेखील घातलं नाही.सारा दिवस उपवास पडला.
रात्र झाली,तेव्हा ती आपल्या नवरा याचा जवळ म्हणजे बैलजवळ
गेली आणि आक्रोश करून रडूं लागली.बैलानं तिला कारण विचारलं
ती म्हणाली, ” मी उपाशी आहे.आज मला अन्न नाहीं,पाणी नाही,
खिरीच्या पातेल्यांत सर्पानं गरळ टाकलं, ते माझ्या दृष्टीस पडलं.
ब्राह्मण मारतील म्हणून मी पातेल्याला शिवलें. माझ्या सुनेला राग
आला.तिनं जळतं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली.माझं सारं अंग
दुखतं आहे.ह्याला मी काय करुं.?”
बैलानं तिला उत्तर दिलं,” तू आगळ्या जन्मी विटाळशीचा विटाळ
घरांत कालविलास,संपर्क मला झाला.त्या दोषानं मी बैल झालों.
आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं, तोंड बांधून मला मारलं.
मीदेखील आज उपाशीच आहे.त्याचं श्राध्द फुकट गेलं.”
हे भाषण मुलानं ऐकलं.लागलीच उठून बाहेर आला.बैलाला चारा
घातला.कुत्रीला अन्न घातलं,दोघांना चाम्गाल्म पाणी प्यायला दिलं.
मनांत फार दु:खी झाला.
दुसरे दिवशी सकाळी उठला,घोर अरण्यांत देला.तिथ ऋषींचा मेळा
पाहिला.त्यांना साष्टांग नमस्कार घातला.ऋषींनी त्याला प्रश्न
केला, ” तूं असा चिंताक्रांत कां आहेस ?”
मुलानं सांगितलं,” माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला
कुत्रीचा जन्म आला आहे.त्यांना मोक्ष कसा मिळेल, या चिंतेत मी पडलो आहे.
कृपा करून मला उपाय सांगा.”
तेव्हां ऋषींनी सांगितलं.| तूं ऋषिपंचमीचं व्रत कर.ते व्रत कसं
करावं ? भाद्रपद महिना येतो.चांदण्या (शुक्लपक्ष )पक्षांतली
पंचमी येते.त्या दिवशी काय करावं ? ऐन दुपारच्या वेळीं
नदीवर जावं. आघाड्याची प्रार्थना करावी,त्याच्या कष्टानं
दंतधावन करावं.आंवळकाठी कुटून घ्यावी,तीळ वांटून घ्यावे,
केसांना लावावे,मग अंघोळ करावी,धुतलेली वस्त्रे नेसावी.मग
चांगल्या ठिकाणी जावं.अरुंधती सह सप्तऋषीं चीं पूजा करावी,
असं सात वर्ष करावं.शेवटी उद्दापन करावं. ह्या व्रतानं काय होतं ?
रजस्वलादोष नाहींसा होतो,पापापासून मुक्तता होते.नाना तीर्थांच्या
स्नानंचं पुण्य लागतं. नाना प्रकारच्या दानांचं पुण्य लागतं.मनी इच्छिलेलं
कार्य होतं ”
मुलाने तें व्रत केलं. त्याचं पुण्य आपल्या आईबापास दिलं. त्या पुण्यानं काय
झालं ? रजोदोष नाहींसा झाला. आकाशांतून विमान उतरलं.बैल होता, तो सुंदर
पुरुष झाला.कुत्री होती, ती सुंदर स्त्री झाली.दोघं विमानांत बसून स्वर्गाला गेलीं.
मुलाचा हेतू पूर्ण झाला,तसा तुमचा आमचा होवो.ही साठां उत्तरांची कहाणी,
पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण . * * *

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: