आपले स्वागत आहे!

Archive for सप्टेंबर 22, 2012

हरबरा डाळीचे पुरण याचे मोदक

                                 ॐ
हरबरा डाळीचे पुरण याचे मोदक : एक बाऊल हरबरा डाळ कुकर च्या
भांड्यात घेतली.डाळ भिजवून पाणी राहील असे डाळ व भांडतात पाणी
घातले.हळद थोडी घातली.कुकर चे झाकण लावले.पेटत्या गॅस वर कुकर
ठेवला चार ४ पाच ५ शिट्या दिल्या.कुकर गार झाल्या नंतर चाळणी खाली
पातेले ठेवून चाळणीत हळद पाणी घातलेले हरबरा डाळ शिजलेली चाळणीत
घातली.डाळ पातेल्यात घेतली.एक १ बाऊल साखर व शिजलेली हळद टाकलेली
हरबरा डाळ साखर परत शिजविले.शिजविली.थोड पातळ पुरण तयार झाले.केले.
पुरण यंत्रात पुरण बारीक केले.कणिक तेल मीठ पाणी घालून भांड्यात तिंबली
भिजविली मळली.गोळा तयार झाला.केला.छोटे छोटे गोळे लाट्या केल्या.प्रत्येक
लाटीत हरबरा हळद टाकलेले साखर मध्ये शिजविलेले पुरण भरले.पाचं ५ मोदक
व दोन करंजी केल्या.तेलात तळून काढले.पुरण केले की शेवया याची खीर करतात.
शेवया तेलात परतून दुध साखर घालून शेवया याची खीर केली.
हळद टाकलेले साखरेचे हरबरा डाळीचे पुरण तेल मीठ कणिक पाण्यात तिंबलेली कणिक
त्यात पुरण याचे सारण भरलेले तेलात तळलेले पुरण याचे मोदक तयार केले.झाले.
नैवेद्द दाखविला फोटो काढला. छान वाटतं आहे.हलक वाटत आहे.

DSCF2910 DSCF2935

DSCF2936 dscf27193

सत्य विनायक व्रतकथा

                                                     ॐ
|| सत्य विनायक व्रतकथा ||
श्रीगणेशाय नम : सूत शौनकादि ऋषींना सांगतत – पूर्वी सत्यलोकी ब्रह्मदेव स्वस्थ बसलेला
असताना त्याचे जवळ देवर्षी नारद येऊन सर्व लोकांचे कल्याण व्हावे या इच्छेने अत्यंत नम्र होऊन
ब्रह्मदेवाला नमस्कार करून प्रश्र्न करते झाले || १ ||नारद म्हणातात,हे भगवान् आपण सर्वज्ञ आहात,
याकरिता ह्या जगात मनुष्यांनी आपल्या कल्याणाकरिता कोणत्या देवाची सेवा करावी ? ब्रह्मदेव म्हणतात..
नारदा सर्व वेदाच्या पूर्वी प्रतिष्ठा पावलेला म्हणजे ज्याच्यापासून वेद झाले तो जो ॐ काररुपी भगवान् तोच या
कलियुगामधे प्रत्यक्ष फल देणारा सत्यविनायक नावाचा देव होय .
सुदामा नावाचा एक ब्राह्मण उत्तम आचारसंपन्न व मोठा उदार असून अगदी दरिद्री होता.तो एकदा कुटुंबपोषणाच्या
चिंतेने व्याकूळ होऊन, आपल्या आश्रमात बसला असता त्याच्या स्त्रीने,’महाराज.आपला बाळमित्र व गुरुबंधु श्रीकृष्ण
ऐश्र्वर्यसंपन्न असा व्दारकेत नांदत असून तो दिन व ब्राह्मण याचेविषयी अर्याम्त दयाळू आहे त्याला भेटलात तर तो
तुमचे दारिद्र्य दु:ख दूर करील असे सुचविल्यानंतर तो ब्राह्मण (सुदामा) व्दाराकेस जाण्यास निघाला जाताना कृष्णाला
भेट देण्याकरिता म्हणून,मोठ्या प्रयत्नाने साठविलेले दोनतीन मुठी पोहे फाटक्या चिंध्यात बांधून घेऊन, तो जुन्या मित्राला
भेटण्याकरिता व्दाराकेस गेला.
तेव्हा तो आलेला पाहून, कृष्णाने त्याचा मोठा सत्कार केला.प्रथम मधुपर्कपूजा केली.
नंतर सुगंघि तेल लावून स्नान घातले व मिष्टान्न भोजन घालून ताम्बूल दिले.
नंतर उभयता एकांती गोष्टी करिता बसले,तेव्हा श्रीकृष्णांनी त्याच्या चार्य्रावरून त्याचे मनोगत
जाणले. श्रीकृष्ण सुदाम्याला म्हणतात,”मित्रा, मला भेट काय आणलीस ती दे ” असे म्हणून त्याच्याकडची
चिंध्याची पुरचुडी घेतली,आनी त्यातील मुथभर पोहे भक्षण करुन श्रीकृष्ण तृप्त झाले,आणि नामात म्हणाले,
” हाय हाय! माझ्या मित्राला काय हे दारिद्र्य राजामध्ये व या ब्राह्मणा मध्ये कितीसे अंतर राहते ते पाहतो
सत्यविनायकाच्या संतोषाने याचे दारिद्र्य नाहीसे करतो,” असा विचार करून, त्याने त्याला प्रश्र्न केला की तुझी
मुले -माणसे क्षेम आहेत ना ? तू आपल्या कुटुंबाचे पालन व पोषण कोणत्या धंद्दाने व कसे करतोस ? ” अशी कृष्णाची
प्रेमवाणी ऐकताच,सदामा लज्जित होऊन कृष्णाला म्हणाला देवां, तू नाथ असल्यामुळे सर्व जगाचे कल्याण आहे,मग तुझ्या
मित्राचे घरी कुशल आहे यात काय विचारावे ? हे यदुकुलश्रेष्ठा,मी आपल्या पोश्य्वार्गाचे परिपालन अयाचित वृत्तीने करीत असतो.
तथापि ती नित्यकर्मामधे गणली असल्याने ती ईश्र्वरार्पण बुद्धीने नित्य चालवून भुक्तिमुक्ति देणारा जो सत्यविनायक त्याचे
आराधन कर ” सत्यविनायक कोण हे सांगा श्रीकृष्ण म्हणतात – ” हे मित्रा जो सर्वाचा आदि असून सर्वाणि पूजा करण्यास योग्य
व जो साक्षात् परब्रहस्वरुपी आणि ब्रह्मा,विष्णु, महेश्र्वर इत्यादि आम्हि ज्याचे सेवकगण आहोत .त्याची पूजा करावी

पुष्टीपति ( पालनकर्ता ) जो विनायक याचा जन्म वैशाख महिन्यातील पौर्णिमा ला झाला .
त्या दिवशी किंवा वरद चतुर्थीस अथवा मंगळवार किंवा शुक्रवार हे व्रत करावे.
विनायकाचे यंत्र ठेवावे. विनायकाच्या यंत्रावर लक्ष्मीनारायण पार्वतीमहेश्र्वर;पर्थिवीवराह आणि
शक्तिमदन या चार देवतांची कोपऱ्यात क्रमाने करावी . स्थापना गर्गामुनिकडून तू या व्रताची बरोबर
अचूक माहिती घे,प्रसाद घेऊन मग घरी जा हे कृष्णाचे भाषण ऐकून सुदामा मोढ्या आनंदाने तेथे राहिला.
गर्गाचार्याकडून त्याने या व्रताची सर्व माहिती घेतली आणि संध्याकाळी मी सत्यविनायक याची पूजा करीन .
खवा साखर ह्याचे मैदात मोदक करून तळून प्रसाद करीन .

                        DSCF2719

%d bloggers like this: