ॐ
श्रीयंत्र
६ ) चौदा त्रिकोणसमूह – या चक्रात चौदा त्रिकोण असून त्यातील
देवता मानवी शरीरातील रक्तवाहिन्यांच्या निदर्शक आहेत.या देवता अशा :
सर्वसंक्षोभिणी, सर्वविद्राविणी, सर्वकर्षिणी, सर्वाह्रदिनी, सर्वसंमोहिनी,
सर्वस्तंभिनी, सर्ववशंकरी, सर्वरंजनी, सर्वोन्मादिनी, सर्वार्थसाधिनी,
सर्वसंपत्तिपूरणी, सर्वमंत्रमयी व सर्वव्दंदक्षयंकरी.
या देवता मानवी शरीरातील रक्तवाहिन्या, अलंबुखा,कुहु,विश्र्वोदरी,
वारणा, हस्तिजिव्हा,यशोवती, पयास्विनी, गंधारी, पूषा, शंखिणी,
सरस्वती, इडा, पिंगला व सुषम्ना यांच्या प्रतीक होत.
७ ) आठ पाकळ्यांचे कमळ – या चक्रात अष्टपद्मदल असून त्यात
अनंगकुसुमा, अनंगमेखला, अनंगमदना, अनंगमदनतुरा, अनंगरेखा,
अनंगवेगिनी, अनंगमदनांकुशा, अनंगमालिनी, या देवता आहेत. या सर्व
देवता मानवी शरीरातील वचन, आदान, गमन, विसर्ग, आनंद, उपादान,
दान, उपेक्षा या गुणांच्या निदर्शक होत.
८ ) सोळा पाकळ्यांचे कमळ – या चक्रात सोळा दळांचे कमळ आहे.
यातील देवता अशा : कामाकर्षिणी, बुध्याकर्षिणी, अहंकारकर्षिणी,
शब्दाकर्षिणी, रुपाकर्षिणी, रसाकर्षिणी, गन्धाकर्षिणी, चित्ताकर्षिणी,
धैर्याकर्षिणी, आणि शरीराकर्षिणी या देवता मानवी शरीरातील मन, बुध्दी,
अहंकार इत्यादी गुणांच्या निदर्शक होत.
९ ) भूपूर व त्यामधील इतर देवता – या चक्रात ‘ भूपूरचक्र ‘
असे नामाभिधान असून याचे चार भाग आहेत. ते असे :
( अ ) षोडशदल कमळाच्या बाहेरील तडाग – सदृश चार वर्तुळे.
( ब ) षोडशदलाला लागूंन असलेली बाहेरची पहिली रेखा.
(क ) षोडशदलाला लागून असलेली बहेरची दुसरी रेखा.
(ड ) वरील रेखांच्या बाहेरचा भाग.
या चार भागात क्रमश : १० मुद्राशक्ति, १० विक्पाल,
८ मातृका आणि १० सिध्दी अधिष्ठित आहेत.
या देवतास्वरुप यंत्राची स्थापना अनेक शक्तिपीठ यातून
केलेली आढळते. उदाहरणार्थ, विंध्यवासिनी पिठामध्ये
भैरव कुंडा जवळ ( जिल्हा फरुकाबाद ) येथे अन्नपूर्णा
मंदिराच्या परिसरात, काशी विश्र्वेश्र्वरा च्या मंदिरात,
कोल्हापूर येथील महालक्ष्मी च्या मंदिरात, तुळजापूर ला
भवानी मंदिरात, कांजीवरम ला कामाक्षी च्या मंदिरात
श्रीयंत्र याची स्थापना केलेली आढळते.

ब्लॉग आवडला? इतरांना सांगा
Like this:
Like Loading...