आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 1, 2012

रुद्राक्ष १

        ॐ
चमत्कार चिंतामणी
रुद्राक्ष
रुद्राक्ष : कसा उत्पन्न झाला ?
एक दिवस भगवान शंकरांनी लिलावश होऊन आपले
दोन्ही डोळे उघडले तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून काही अश्रू
ओघळले आणि त्यापासूनच रुद्राक्षाचा वृक्ष झाला.
‘ शिवपुराणा ‘ त असा एक उल्लेख आढळतो, की
हिमालयात शंकरांना असुराधिपती त्रिपुरासुराचा वध
करण्यापूर्वी त्याच्याशी अनेक दिवस घनघोर युध्द करावे
लागले होते.त्यामुळे त्यांच्या डोळ्यांची आग होऊन ते
रक्तासारखे लालभडक झाले.तो दाह सहन न होऊन त्यांच्या
डोळ्यांतून खळकन् अश्रू बाहेर पडले तेव्हा ब्रह्मदेवांनी
त्यापासून एक वृक्ष उत्पन्न केला.कालांतराने त्या वृक्षाला
जी फळ आली त्यांना ‘ रुद्राक्ष ‘असे नामाभिधान प्राप्त झाले.
नारद उवाच –
एवंभुतानुभवो s यं रुद्राक्षो भवता s नद्द |
वर्णिता महतां पूज्य : कारणं तत्र किं वद ||
नारद म्हणाले, ” हे अनघ ( विष्णूचे एक नाव ),
रुद्राक्षाची पूजा अनेक महान पुरूषांकडून केली जाते ती का ? “
भगवान विष्णु उवाच –
एवमेव पुरा पृष्टो भगवान् गिरीश :प्रभु : |
षण्मूखेन च रुद्रस्तं यदुवाच श्रुणुस्व ( shrunusva ) तत् |
त्यावर भगवान विष्णु म्हणाले, ” हाच प्रश्र्न सर्वप्रथम
कार्तिकेयाने (कार्तिक याने )भगवान शंकरांना विचारला असता
त्यांनी जे उत्तर दिले ते ऐक. भगवान शंकर उवाच –
श्रुणु षण्मुख तत्त्वेन कथयामि समासत : |
त्रिपुरो नाम दैत्यस्तु पुरा s सीत् सर्वदुर्जय : |
भगवान शंकर म्हणाले , ” कार्तिकेया ( षण्मुख ), त्रिपुर
नामक एक दैत्य अतिशय उन्मत्त झाला होता.
हतास्तेन सुरा : सर्वे ब्रह्मविष्णवादि देवता : |
सर्वेस्तु कथिते तस्मिंस्तदाहं त्रिपुरं प्रति |
अचिंत्यं महाशस्त्रमघोराख्यं मनोहरम् |
सर्व देवमयं दिव्यं ज्वलंतं घोररुपि यत् ||
त्रिपुरस्थ वधार्धाय देवानां तारणाय च |
सर्वविघ्नोपशमनघोरास्तमचिंतयम् ||

      DSCF2991

%d bloggers like this: