आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 2, 2012

रुद्राक्ष ३

                                     ॐ
        रुद्राक्ष
वनस्पतीशास्त्र दृष्ट्या ‘ एलीओकार्पसtil ‘ या जातीतील
‘ एलीओकार्पस ग्रॅनिट्रस ‘ या प्रजातीचा वृक्ष म्हणजे रुद्राक्ष वृक्ष होय.
यालाच ‘ ग्रॅनिट्रस स्फेअरिका ‘ किंवा युट्रेसन बीड ट्री ‘ सुध्दा म्हटले जाते.
संस्कृत, मराठी व हिंदीत याला ‘ रुद्राक्ष ‘, तर बंगालीत ‘ रुद्राक्य ‘, आसामीत ‘ रुद्रइ ‘,
कानडीत ‘ रुद्राक्षी ‘, उत्तर प्रदेशात ‘ रुद्रक ‘, तामीळीत ‘ आक्कम -रुद्रकाई ‘,
तेलगूत ‘ रुद्राक्ष हालु ‘ व इंग्रजीत ‘ वुडन बेगर ‘ व ‘ युट्रेसम बीड ‘ असे संबोधिले जाते.
पूर्ण वाढ झालेल्या वृक्षाची उंची ५५ ते ६० फुट असून ८ ते १० फुट उंची पासून khodaalaa
फांद्दा फुटतात.बुंधा जमिनीतील रुंद व पसरट असतो.खोडाचा व्यास ३ ते ४ फुट व बाह्यांगाची
साल गडद करड्या रंगाची तर अंतर्साल तपकिरी असते.
वयात आलेल्या वृक्षाला सालीवर बारीक छिद्रे व आडव्या चिरा
दिसून येतात.खोडातून पाझरणारा डिंक अतिशय पारदर्शक व
बेताचा चिकट असतो.याची पाने आंब्याच्या पानांप्रमाणे चा दिसतात;
परंतु लांबीला ६ ते ७ इंच च असतात. तर रुंदीला १ ते १|| इंच च असतात.
पाने पातळ, मृदू व चकचकीत असतात. कोवळी पाने स्निग्ध व लवादार ही
असली तरी कालांतराने यांच्या वरील लव नाहीशी होते. पानाच्या कडा वेलबुट्टी
प्रमाणे नक्षीदार व दंतुर असतात.वृक्षावर पाने एकाआड एक अशी येतात व
त्यांच्या देठ एक चतुर्थांश ते एक तृतीयांश इंच लांबीचा असतो. पानांच्या
तळाशी असलेली उपपर्णे लहान असतानाच गळून पडतात.

                   DSCF2991

रुद्राक्ष २

              ॐ
रुद्राक्ष
त्याने ब्रह्मा-विष्णु इत्यादी सर्व देव-देवातांना सळो की
पळो करुन सोडले होते.त्यामुळे सर्व देव-देवेता मला शरण
आले.त्या सर्वांना संकटमुक्त करण्यासाठी मी एका अमोघ
अस्त्राची निर्मिती केली.
दिव्यवर्षासहस्त्रं तु चक्षुरन्मीलितं मया |
पश्र्चान्माकुलाक्षिभ्य : पत्तिता जलविन्दव : ||
मग मी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा त्यातून काही अश्रू ओघळले.
तत्राश्रुबिन्दुतो जाता महारुद्राक्ष वृक्षका 😐
ममाज्ञया महासेन सर्वेषां हितकाम्यया ||
त्यापासून रुद्राक्षाचा वृक्ष उत्पन्न झाला. हे महा सेना,
त्रैलोक्याच्या कल्याणासाठीच मी रुद्राक्षाची उत्पत्ती केली हे तू
नीट लक्षात ठेव.” तेव्हापासून भगवान शंकराच्या कृपेने
शिवभक्तांना रुद्राक्षाची प्राप्ती झाली.कालांतराने देशाच्या
विविध भागात रुद्राक्षाचे वृक्ष उत्पन्न होऊ लागले.
उत्पत्ती कथा
रुद्राक्षाच्या उत्पत्ती संदर्भात ‘ स्कंद पूराणा ‘ त एक कथा आहे.
ती अशी: प्राचीन काळी पाताळलोकचा मय नामक दैत्य राजा
महाबलाढ्य व महापराक्रमी होता.
तो अतिशय महत्वाकांक्षी असल्याने त्याने साम्राज्य विस्ताराचा
निर्णय घेतला आणि अल्पावधीतच तो अंमलाखाली आणला. हा हा
म्हणता त्याने त्रैलोक्य पादाक्रांत केले. इतकेच नव्हे तर हिमालयावर
आक्रमण करुन तोही आपल्या अधिपत्याखाली आणला आणि त्याच्या
उत्तुंग शिखरांवर सोने,चांदी व लोखंडापासून तीन अभेद्द वसतीस्थाने उभारली.
जी एखाद्दा अत्यंत बळकट किल्ल्यासारखी होती. ज्यात मयासुराचे तीन पुत्र
नाडीन्मल, तारकाक्ष व कमलाक्ष वास्तव्य करीत होते.ते सार्वजन देव,देवता,
गंधर्व व मनुष्यांवर अनन्वित अत्याचार करु लागले.

        DSCF2991

%d bloggers like this: