रुद्राक्ष ५
ॐ
रुद्राक्ष
हा वृक्ष सदापर्णी असून वर्षभर पालवी फुटणे व काही पाने
गळून पडणे ही क्रिया अव्याहत पणे चालू असते.पिकणारे पान
प्रथम पिवळ्या रंगाचे होते व त्याचा रंग गडद होता होता नारिंगी
होतो.या अवस्थेपासून त्याची पानगळ सुरु होते; परंतु जी काही थोडी
पाने, काही काळ झाडावर च असतात त्यांचा रंग कॉफी च्या रंगा
सारखा दिसतो.
हिवाळ्यात म्हणजे नोव्हेंबर महिन्यात याला मोहोर म्हणजे फुले येतात.
ती येताना पानांच्या बगलेत गळून गेलेल्या उपपर्णाची जागी जमिनीकडे
लोंबणाऱ्या पुष्पमंजिऱ्या फुटतात व तेथे पुष्पगुच्छ तयार होतात.फुले
लहान व हस्तिदंती पांढऱ्या रंगाचे असतात व त्यांना मंद सुगंध ही असतो.
रातराणीच्या पुष्पगुच्छांशी यांची तुलना होऊ शकेल,
परंतु त्यांचा गंध रातराणी च्या फुलाच्या सुगंधा पेक्षा अंमळ
सौम्य असतो.लोंबणारे पुष्प गुच्छ पानांपेक्षा लहान असतात.
पाकळ्या लांबट आकाराच्या , पुढच्या बाजूस बोथट व झालरी प्रमाणे
मध्य भागातील विभागलेल्या असतात.पाकळ्यांचे देठ संदलां पेक्षा मोठे
असतात. पुष्पदलाची बैठक मांसल, सुरकतलेली व लावदार असते.पुंकेसर
व परागकोश देठरहित ३५ ते ४० पर्यंत असतात.
वृक्षाचे रोपण झाल्यापासून साधारणपणे फलधारणा
सात – आठ वर्षात होते. फळ गोलाकार व प्रथमवस्थेत
हिरवेगार असते.पूर्ण वाढलेले फळ रंग बदलून गडद निळ्या व
जांभळ्या रंगाचे होते. भोगोलिक परिस्थिती नुसार फळाचा
लहान – मोठा आढळतो.आपल्या महाराष्ट्रात फळाचा आकार २ ते २|| से.मी.
व्यासाचा पाहावयास मिळतो.फळ अश्मगर्मी बियुक्त असते. बी व वरचे सालात
पातळ गराचा थर असतो.तो चवीला आंबट गोड व तुरट लागतो.या गरात बरेच
औषधी गुणधर्म सामावलेले आहेत. या गराच्या खाली कठीण पृष्ठभागाची,
खडबडीत बी असते, तोच ‘ रुद्राक्ष ‘ होय. फळाचा पृष्ठभाग जरी गूळगुळीत असला
तरी आतील बी खडबडीत व टणक असते. त्यात कोणतीही सुसंगती नसते आणि
म्हणून च कोणतेही दोन रुद्राक्ष एकसारखे असत नाहीत. जेथे फळाचे देठ असते तेथे
बिला छिद्र असते. त्याव्दारे रुद्राक्षा च्या आतील भागांचे पोषण होते.या छिद्रा पासून
बीवर पाच अर्धगोल खाचा सुरु होऊन त्या खालच्या बाजूस पुन्हा एकत्र येऊन मिळतात.
यालाच रुद्राक्षा चे ‘ मुख ‘ असे संबोधतात.