आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 4, 2012

रुद्राक्ष ६

                                  ॐ
       रुद्राक्ष
युध्दात विजय संपादन केल्यावर भगवान
शंकर,ब्रह्मा,विष्णु व इंद्र सह श्रमपरिहार करण्यासाठी
हिमालयाच्या एका शिखरावर विश्रांती घेण्यासाठी पोचले.
कालांतराने थकवा दूर झाल्यावर शंकर प्रसन्न होऊन हसू लागले.
तेव्हा अचानक त्यांच्या डोळ्यांतून चार अश्रूबिंदू ओघळले आणि
त्यापासून काही वृक्ष निर्माण झाले.रुद्राच्या अश्रूंपासून उत्पन्न
झालेल्या या वृक्षांना कालांतराने ‘ रुद्राक्ष वृक्ष ‘ म्हणून सर्वत्र
संबोधिले जाऊ लागले.
या संदर्भात आणखी एक कथा सांगितली जाते. ती अशी :
एकदा नारदांनी भगवान विष्णूंना रुद्राक्षाच्या उत्पत्ती बध्दल
मीहिती विचारली असता त्याने,हाच प्रश्र्न कार्तिकेयाने शंकरांना
विचारला असता जे कथन केले ते जसेच्या तसे नारदाला
सांगितले.
प्राचीन काळी त्रिपुर नामक उन्मत्त दैत्य
देवादिकांना उपद्रव देत असे म्हणून सर्व देव
भगवान शिवाकडे जाऊन त्यांचे साहाय्य
मागू लागले.त्रिपुरासुराच्या वधासाठी
शंकराने एका अमोघ अस्त्राच्या निर्मितीसाठी
विचार करताना आत्यंतिक श्रमाने त्याच्या नेत्रांतून je
अश्रू ओघळले,ते पृथ्वीवर जेथे पडले तेथे रुद्राक्ष वृक्ष उत्पन्न
झाले.

              DSCF2991

%d bloggers like this: