रुद्राक्ष ८
ॐ
रुद्राक्ष
शेवटी अंतर्ज्ञानाने त्याला रुद्राक्ष शिवाज्ञेने तेथे आल्याचे
कळले तेव्हा त्याने भगवंतांना रुद्राक्षाला आवरण्याची विनंती
केली. श्रीकृष्णाच्या विनंतीस मान देऊन आपले दिव्य त्रिशूळ
त्याचे स्वाधीन केले व ते ईशान्येला फेकून रुद्राक्षाचा वध
करण्यास सुचविले. त्याप्रमाणे श्रीकृष्णाने निमिषार्धात त्याचा
वध केला;परंतु मरताना रुद्राक्षाने श्रीकृष्णाकडून वर मागून
घेतला,की जो कोणी माझे स्मरण करून आपल्या उपास्य
दैवताची उपासना करेल त्याला त्वरित फलप्राप्ती व्हावी.
रुद्राक्षाचे रक्त जेथे सांडले तेथे कालांतराने रुद्राक्ष वृक्षाची
उत्पत्ती झाली.
आणखी एक वेगळीच कथा म्हणजे भगवान शंकराने
तांडवनृत्य करताना आपला तृतीय नेत्र किंचित काळ
उघडला तेव्हा त्यातून अद् भुत असे ज्योतीकिरण सर्वत्र
पसरले.हा डोळा मिटण्याच्या प्रक्रियेत जे किरण
पृथ्वीतलावर पडले तेथे रुद्राक्ष वृक्षांची उत्पत्ती झाली.
रुद्राक्ष व रुद्र यांचा परस्परांशी घनिष्ठ संबंध आहे.
याचे कारण असे,की रुद्राक्षाची उत्पत्ती रुद्रापासून झाली
या विचाराशी वैदिक वाड्.मय सहमत आहे.