आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 6, 2012

रुद्राक्ष ९

                             ॐ
       रुद्राक्ष
ब्रह्मदेवाला आपणास पुत्र असावा अशी इच्छा झाली व
त्याप्रमाणे त्याच्या मांडीवर एका नीलवर्ण देवाची उत्पत्ती झाली.
तो सतत रडत होता म्हणून ब्रह्मदेवाने त्याला ‘ रुद्र ‘असे नाव दिले
व त्याच्या डोळ्यातून जे अश्रू जमिनीवर पडले तेथे कालांतराने
रुद्राक्षाचा वृक्ष निर्माण झाला आणि म्हणूनच रुद्र + अक्ष या दोन
शब्दाच्या एकत्रीकरणातून ‘ रुद्राक्ष ‘ या शब्दाची निर्मिती झाली.
रुद्राक्षाचा महिमा वर्णन करणारी कथा
फार पूर्वी केरळ मध्ये सर्व शास्त्रांत पारंगत असलेला देवदत्त
नामक एक विव्दान ब्राह्मण वास्तव्य करून होता. काळाच्या ओघात
कुसंगती मुळेदेवदत्त लुटमार करू लागला. जुगार खेळू लागला.
हळूहळू तो अट्टल मद्दपी बनला. अभक्ष्य भक्षण करू लागला.
वेगवेगळ्या मार्गाने रहिवाशांना छळू लागला.त्याच्या या स्वैराचारा
मुळे एके काळच्या त्या विव्दान ब्राह्मणाला रहिवाशांनी बहिष्कृत
करून गावाबाहेर हाकलून दिले.
देवदत्ताने अरण्य जवळ केले. तेथे तो वन्य प्राण्यांची शिकार
करून आपला उदरनिर्वाह करू लागला.कालातंराने त्याचा मृत्यू
जवळ आला.एक दिवस उपासमार झाल्याने मूर्च्छा येऊन अरण्यातच
तो मरण पावला.यमदूतांनी देवदत्तला यमपाशाने जखडले व त्याला
फरफटत ते यमपुरी कडे घेऊन गेले.जेथे त्याला मृत्यूने गाठले तेथे
योगायोगाने एक रुद्राक्ष पडलेला होता आणि नेमका त्याचा स्पर्श देवदत्त
च्या शरीराला झाला असल्याने भगवान शंकरांनी शिवगणांना त्याला
शिवलोकात घेऊन येण्याची आज्ञा केली.
शिवगणांना यमदूत देवदत्ताला फटके मारत यमपुरी कडे नेतांना
आढळले. शिवगणात व यमदुतात घनघोर युध्द झाले आणि यमदुतांनी
पराभूत होताच देवदत्ताला तिथेच टाकून पळ काढला. मग शिवगणांनी
देवदत्त याला उत्तम वस्त्रे परिधान करून विमानातून शिवलोकात नेले.
तेथे त्याने अनेक वर्षे शंकराच्या सान्निध्यात कालक्रमणा केली.

                       DSCF2991

%d bloggers like this: