आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 7, 2012

रुद्राक्ष १०

                          ॐ
     रुद्राक्ष
रुद्राक्ष कठीण व टणक असला तरी वरून सुरु होणारी
मुखें खालच्या बाजूस एकत्र येतात त्या ठिकाणी पृष्ठभाग
अंमळ ठिसूळ असतो. नैसर्गिक छिद्रात सुई किंवा टाचणी
घालून ढकलली असता ती या ठिसूळ पृष्ठभागातून सहजगत्या
आरपार जाऊ शकते.
फळे पक्व झाल्यावर उतरवून, वाळवून त्यावरील साल व गर
काढून टाकून बी साफ करून त्यांच्या माळा तयार करतात.
गर काढून टाकणे सोपे व्हावे म्हणून फळे शेणात किंवा
शेनामातीत मिश्रणात काही काळ बुडवून ठेवतात.त्यामुळे
गर बीपासून सहजगत्या वेगळा होतो.काही लोक माळा गुंफून
त्या लाल रंगाच्या पाण्यात बुडवून त्याला रंग चढवतात.
सर्वसाधारण रुद्राक्षाला थंडीत मोहोर येतो.पक्व फळे मे
वृक्षांना वर्षातून दोन वेळा फलधारणा होते.पहिला बहर
फेब्रुवारी – मार्च मध्ये येऊन पक्व फळे जुलै – ऑगस्ट मध्ये
हाती लागतात. तर दुसरा बहर ऑगस्ट – सप्टेंबर मध्ये येऊन,
पक्व फळे जानेवारी – फेब्रुवारी त हाती लागतात. या दोन
बहरा पैकी दुसरा बहर फळे तुलनात्मक दृष्ट्या मोठी आढळतात.
किंवा जून मध्ये हाती येतात; परंतु महाराष्ट्रात काही
वृक्षांना वर्षातून दोन वेळा फलधारणा होते .
या वृक्षाचे लाकूड पांढरट करडे किंवा राखी रंगाचे व अंमळ
चिवट ही असते;परतुं त्याचा उपयोग सरपण म्हणून च केला जातो.
या वृक्षाच्या पानात जंतुनाशक गुणधर्म असल्याने ती स्वतंत्रपणे
किंवा निंबोणी च्या पानाबरोबर पाण्यात उकळून जखमेवर बांधतात.
फळातील गराचा मेंदूचे विकारावर, अस्पमाराचे झटके येत असल्यास
उपचारासाठी उपयोग होतो.
रुद्राक्षाचे वृक्ष पश्र्चिम घाटात, महाबालेश्र्वर पासून दक्षिणे कडील
डोंगराळ प्रदेशात, त्रावणकोर व केरळ च्या पूर्वेकडील डोंगराळ
प्रदेशात, उत्तर प्रदेशात व भारताबाहेर ब्रह्मदेश, थायलंड, मलेशिया
व श्रीलंका येथे आढळतात.

                      DSCF2991

%d bloggers like this: