आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 8, 2012

रुद्राक्ष ११

                              ॐ
        रुद्राक्ष
रुद्राक्षाला सर्वसाधारण पणे पाच कंगोरे किंवा मुखे
असतात; परंतु अपवादात्मक परिस्थितीत अशी मुखे कमी
किंवा जास्त ही आढळून येतात.एक ते एकवीस मुखांची रुद्राक्षे
पाहाण्यात आहेत.क्वचित एकमेकांस चिकटलेले रुद्राक्ष आढळतात.
याला ‘ गौरीशंकर ‘ तर कधी तीन रुद्राक्ष एकमेकांस चिकटलेले आढळतात.
त्यांना ‘ ब्राह्मा, विष्णु , महेश ‘ असे संबोधिले जाते. एक मुखी रुद्राक्ष
अभावानेच आढळतो. ज्या वृक्षापासून एकमुखी रुद्राक्ष मिळतो तो पुढे
चार – पाच वर्षे फलधारणा करत नाही असे काही जाणकारांनी सांगितले.
एलिओकार्पस प्रजातीतील काही वृक्षांना फळांच्या बिया थेट रुद्राक्षा सारख्या
दिसतात.त्यामुळे फसगत होण्याची शक्यता असते. पंचमुखी रुद्राक्षांच्या
विपुलतेने ते सहसा कृत्रिम नसतात; परंतु त्याहून अधिक किंवा कमी मुखे
असलेल्या रुद्राक्षांची पूर्ण चिकित्सा करून ते खरेदी करावेत.
‘ रुद्राक्षी ‘ किंवा ‘ रुदरक ‘ या नावाने ओळखले जाणाऱ्या
वृक्षाच्या फळातील बी तंतोतंत रुद्राक्षा सारखी भासते. ही
रंगाने काळी असल्याने याला ‘ काळा रुद्राक्ष ‘ म्हणून संबोधिले जाते.
हृषीकेश व हरीव्दार सारख्या धार्मिक क्षेत्राच्या ठिकाणी यांच्या माळाi
सर्रास विकल्या जातात. हा काळा रुद्राक्ष वजनाला हलका असतो.
एलिओकार्पस ट्यूबरक्युलाटीस किंवा चपट्या रुद्राक्षास लोक
अज्ञानाने ‘ भद्राक्ष ‘ असे संबोधतात. विशेषत: हा वृक्ष उत्तर प्रदेश येथे
आढळत नसल्याने तेथे चपट्या रुद्राक्षाला सर्रास ‘ भद्राक्ष ‘ किंवा ‘ भद्रास ‘
असे म्हणतात.या वृक्षाच्या झाडाची बी रुद्राक्षापेक्षा वजनाने हलकी असते.
बीवर मुखे कोरून ‘ पाढरा रुद्राक्ष ‘ म्हणून चढ्या दराने बाजारात विकतात.
नैसर्गिक छिद्र असलेला रुद्राक्ष तंत्रस्त्राने सर्वोत्तम मानला आहे. याचे
कारण असे की, बहुतेक सर्व रुद्राक्षांना अणकुचीदार हत्याराने प्रयत्नपूर्वक
छिद्र पाडावे लागते.

                        DSCF2991

%d bloggers like this: