आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 10, 2012

रुद्राक्ष १३

                                                 ॐ
                 रुद्राक्ष
एकमुखी रुद्राक्ष – हा रुद्राक्ष अत्यंत दुर्मिळ समजला जातो.
महान योगीच हा धारण करतात. त्याला परत्वाचे स्वरुप
साक्षात शिव व परात्पर तत्वात लीन होणारा समजले जाते.
सर्व मनोकामना ची पूर्ती करण्याचे अद् भुत सामर्थ्य या
रुद्राक्षात दडले आहे. गोल आकारातील एकमुखी रुद्राक्ष
क्वचितच आढळतो; परंतु चपट्या चंद्रकोरी च्या आकारातील
नेहमी पाहण्यात येतात. एकमुखी गोल रुद्राक्ष तांब्याच्या
फुलपात्रात बुडवून ठेवला असता अर्ध्या तासात पाण्याचे
तापमान वाढते.मातीच्या पात्रात दुधात बुडवून ठेवल्यास
ते किमान महिनाभर नासत नाही. हा धारण केल्यास
षड र पूंवर विजय मिळविता येतो व धारणकर्त्याला
कालांतराने विरक्ती प्राप्त होते.
व्दिमुखी रुद्राक्ष – अर्धनारी नटेश्र्वर ‘ म्हणजेच ‘ शिवा चे
प्रतीक असून पती-पत्नीतील मतैक्य, वैवाहिक सौख्य,
दु:खनाश,मन:शांती, उद्दोग धंदा किंवा व्यवसायात प्रगती
साधण्यासाठी हा धारण करावा.या योगे धारणकर्त्याची
कुण्डलिनी जागृत होण्याचा मार्ग सुकर होतो.
हा धारण केला असता धारणकर्त्याच्या व्यक्तीमत्वात
आमूलाग्र बदल होतो व तो समोरच्या व्यक्तीला क्षणार्धात
प्रभावित करू शकतो.
त्रिमुखी रुद्राक्ष – याला ‘ अग्निदेवते ‘ चे प्रतीक मानले जाते.हा
धारण केल्यास धारणकर्त्याला वाचासिद्धी प्राप्त होते.तहान व भूकेवर
विजय मिळविता येतो.आर्थिक सुबत्ता प्राप्त होते.बुद्धी कुशाग्र होते.
विद्दार्थांनी हा अवश्य धारण करावा.
चतुर्मुखी रुद्राक्ष – हा साक्षात ‘ ब्रह्मदेवा ‘ चे प्रतीक असून याचा प्रभाव
धारण कर्त्याच्या जिभेवर होतो आणि तो अल्पावधीत च ‘ वक्ता दशसहस्त्रेषु ‘
या पदवीला पात्र होतो. स्मरणशक्ती तीव्र होते. ‘ अग्निपुराणा ‘ नुसार हा
उजव्या दंडात किंवा शेंडीत धारण करावा. हा रुद्राक्ष दुधात उकळून ते प्राशन
केल्यास मनोविकार नाहीसे होतात.

                                DSCF2991

%d bloggers like this: