आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 11, 2012

रुद्राक्ष १४

                                   ॐ
           रुद्राक्ष
पंचमुखी रुद्राक्ष – याला ‘ पंचानन शिवा ‘ चे किंवा ‘ कालाग्री रुद्रा ‘ चे
स्वरुप मानले जाते. यात पंचमहाभूतांचा समावेश असून अन्य सर्व मुखाच्या
रुद्राक्षाचे गुण अंतर्भूत आहेत.हा धारणकर्त्याला मन:शांती प्रदान करतो.
जपमाळ पंचमुखी रुद्राक्षांची च असते. हा रुद्राक्ष धारण केल्याने उच्च रक्तदाब
नियंत्रित ठेवता येतो. मानसिक संतुलन बिघडत नाही. तसेच सर्पदंश, अपघात
व शस्त्राघाता पासून रक्षण होते.
हा रुद्राक्ष सर्वार्धाने उत्कृष्ट असला तरी तो सहजगत्या उपलब्ध होतl नसल्याने
लोक अन्य मुखांच्या रुद्राक्षांकडे आकर्षित होतात.
लोलकविद्देत ‘ लंबक ‘ म्हणून पंचमुखी रुद्राक्षाचा आवर्जून वापर करतात.
षण्मुखी रुद्राक्ष – शिवपुत्र कार्तिकिय ‘ म्हणजेच ‘ स्कंदा ‘ चे प्रतीक म्हणजे हा
रुद्राक्ष. यावर महालक्ष्मी ची व पार्वती ची कृपादृष्टी आहे. काही ठिकाणी याला
गणेश स्वरूप ही मानतात.’ शिवाराहास्या ‘ नुसार हा विष्णुस्वरूप आहे.
बहुतेक व्यापारी हा रुद्राक्ष आपल्या गल्ल्यात ठेवतात. याचे कारण असे,की
याच्या अस्तित्वामुळे रिकामा रहात नाही. हा रुद्राक्ष धारण केला असता अमोघ
वत्कृत्व प्राप्त होते. व्यवसायाची भरभराट होते. स्मरणशक्ती वाढते.

                  DSCF2991

%d bloggers like this: