आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 12, 2012

रुद्राक्ष १५

                                               ॐ
                  रुद्राक्ष
सप्तमुखी रुद्राक्ष – हा रुद्राक्ष ‘ सप्तमातृका ‘ किंवा ‘ अनंतनागा ‘ चे
प्रतीक मानला जातो.याला सप्तर्षी चा व देवी सरस्वती चा आशीर्वाद आहे.
सर्पदंशापासून संरक्षण, दीर्घायुष्य व अपघात पासून धारणकर्त्याचे रक्षण करतो
अशी या रुद्राक्षाची ख्याती आहे. हा धारण केल्याने मस्तकाशुळ, संधिवात व
विषमज्वर बरा होऊन रोगी खडखडीत बरा होतो.
अष्टमुखी रुद्राक्ष – याला साक्षात ‘ श्रीगणेशा ‘ चे प्रतीक मानतात.
इतकेच नव्हे तर ‘ चिंतामणी ‘ ‘ विनायक ‘ या नावानेही हा ओळखला जातो.
अष्टमातृका, ब्रह्मा, विष्णु व महेश याचा पूर्ण आशीर्वाद याला लाभला आहे.
तांत्रिक लोक या रुद्राक्षा ला कुण्डलिनी जागृत करण्याचे साधन मानतात.हा
रुद्राक्ष लाल रेशमी धाग्यात गुंफून गळ्यात धारण करावा , असे अधिकारी व्यक्ती
सांगतात. हा जवळ बाळगल्याने अचानक धनलाभ होतो.समय सूचकता अंगी बाणते.
धारणकर्ता बहुश्रुत होतो. इतकेच नव्हे तर त्याला अनेक कलात नैपुण्य प्राप्त होते.

               DSCF2991

%d bloggers like this: