आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 13, 2012

रुद्राक्ष १६

                                 ॐ
रुद्राक्ष
नऊमुखी रुद्राक्ष – हा रुद्राक्ष ‘ नवशक्ती ‘ किंवा ‘ भैरवा ‘ चे प्रतीक
मानला जातो. दुर्गेचा याला पूर्ण आशीर्वाद आहे.दु:ख, दैन्य व दारिद्र्य
धारणाकर्ताच्या आसपासही फिरकत नाही. काळ्या रेशमी धाग्यात गुंफून
रुद्राक्ष उजव्या किंवा डाव्या दंडात बांधावा. ह्रद् रोग्यांनी हा गळ्यात ह्रदयात
समांतर धारण करावा. या योगे शारीरिक व मानसिक क्लेश, शोक, निराशा
वगैरे पासून धारण कर्त्याचे संरक्षण होते.
दशमुखी रुद्राक्ष – या रुद्राक्षाला ‘ यमराजा ‘ चे प्रतीक मानले असून अष्टदिक् पाल
व जनार्दनाचा आशीर्वाद याला लाभाला आहे. हा गळ्यात विधिवत् धारण केला असता
भूत, प्रेत व समंधीत धबाधे पासून अल्पावधीत मुक्ती मिळते.अनिष्ट ग्रहपीडे पासून
संरक्षण मिळते. मन:शांती साठी या रुद्राक्षाची शिफारस केली जाते.
एकादशमुखी रुद्राक्ष – याला ‘ अकरा रुद्रां ‘ चे म्हणजेच त्र्यंबक, भव, शर्व, रुद्र, पशिपती,
ज्येष्ठ, कनिष्ठ, श्रेष्ठ, जघन्य, सोम, शिव, यांचे प्रतीक समजले जाते. काही ठिकाणी या
रुद्राक्षाला इंद्राचे प्रतीक ही समजतात. हा रुद्राक्ष दुर्मिळ असून धारणकर्त्याचा अल्पावधीत च
भाग्योदय होतो. चंचल लक्ष्मी स्थिर होते.वांझ स्त्रीने कमरे भोवती लाल रेशमाच्या धाग्यात हा
रुद्राक्ष गुंफून धारण केल्यास तिला यथावकाश पुत्र संतती प्राप्त होते.
व्दादशमुखी रुद्राक्ष – ‘ माहाविष्णू ‘ तसेच, ‘ बारा आदित्यां ‘ चे
प्रतीक म्हणजे हा रुद्राक्ष. बारा ज्योतिर्लिंगां चा याला आशीर्वाद असतो.
हा धारण केला असता तेज:पुंज व्यक्तिमत्व प्राप्त होते.शत्रू हतबल होतात.
शस्त्राघात व अपघातापासून संरक्षण होते.रक्तस्त्राव थांबतो.
त्रयोदशमुखी रुद्राक्ष – याला ‘ कामदेव ‘ स्वरुप ‘ इंद्रा ‘ चे प्रतीक किंवा साक्षात
मदनदेव समजतात. खुद्द देवेंद्रा चाच याला आशीर्वाद लाभल्याने सर्व देवता
धारणकर्त्यावर प्रसन्न होतात.श्राध्द करताना गळ्यात धारण केल्यास पितरांना
सद्गती प्राप्त होते.

                            DSCF2991

%d bloggers like this: