आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 14, 2012

रुद्राक्ष १७

                                            ॐ
            रुद्राक्ष
चतुर्दशमुखी रुद्राक्ष – भगवाव शंकरांच्या अश्रूंचे प्रतीक किंवा साक्षात्
‘ उमापती ‘ महादेवाचे स्वरुप असे या रुद्राक्षाचे वर्णन आहे. कोणी याला
पवनपुत्र हनुमानाचे प्रतीक ही मानतात.
हा धारण केल्याने सर्व ऐहिक सुखे प्राप्त होतात. हा शेंडीत धारण करतात.
व अतिशय दुर्मिळ असतो.योगविद्देत नैपुण्य प्राप्त करण्यासाठी हा गळ्यात धारण करावा.
पंचदशमुखी रुद्राक्ष – हा रुद्राक्ष ‘ वरुण देवते ‘ चे प्रतिनिधित्व करतो.हा धारण केल्यास
तनमानसिक आरोग्याचे रक्षण होते. संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होते. चर्मरोगांपासून
मुक्ती मिळते. पाण्यात बुडण्याचे भय राहात नाही.
षोडशमुखी रुद्राक्ष – चोरी, दरोडा, आर्थिक फसवणूक, आग व अपघात यापासून
धारणकर्त्याचे रक्षण होते. याला ‘ याला कालविजया ‘ चे प्रतीक मानतात.
हा नेहमी उजव्या दंडावर धारण करावा.
सप्तदशमुखी रुद्राक्ष – याला ‘ विश्र्वकर्म्या ‘ चे प्रतीक मानतात.
लक्ष्मीप्राप्ती साठी हा रुद्राक्ष नेहमी तिजोरीत ठेवावा. भाम्धाकाम
व्यावसायिक यांनी व खाणमालक यांनी हा सदैव डाव्या दंडावर
धारण करावा.
अष्टदशमुखी रुद्राक्ष – शेतकरी यांनी हा धारण केला
असता खूप फायदेशीर ठरतो.शेतीमालाचे उत्पादन
कल्पनातील वाढते. याला ‘ धरणीमाते ‘ चे व
‘ देवी कालिके ‘ चे प्रतीक समजतात. हा रुद्राक्ष सतत
गळ्यात धारण करावा. धारणकर्ता धैर्यवान कर्तृत्ववान होतो.
एकोनर्विशमुखी रुद्राक्ष – हा रुद्राक्ष ‘ नारायणा ‘ चे प्रतीक मानला
जातो. हा धारण केल्यास सर्व प्रकारची भौतिक सुखे विनासायास
प्राप्त होतात. हा रुद्राक्ष कटाक्षाने गळ्यातच धारण करावा.
विंशतिमुखी रुद्राक्ष – हा चतुर्दशमुखी रुद्राक्षा प्रमाणे वाचेवर
अधिष्ठित आहे. याला ‘ ब्रह्मा चे प्रतीक मानतात. धारणकर्त्याचे
नैत्रुत्वाची संधी चालून येते.

                            DSCF2991

%d bloggers like this: