आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 17, 2012

नवरात्र नैवेद्द डाळींब


स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन शरदऋतु आश्र्विन शुक्लपक्ष नक्षत्र विशाखा
२ बुधवार नवरात्र नवरात्रि दुसरा दिवस .
तसेच दिंनाक तारिख १७ अक्टोबर (१०) २०१२ साल आहे
बुधवार आहे.
नवरात्र म्हणुन डाळींब याचा नैवेद्द दाखविला आहे.

DSCF3094 DSCF3096

नवरात्री घट

                        ॐ
नवरात्री नवरात्र घट
घट रंगवून आरसे रंगीत गोल लावले आहेत.
ब्रश रंग याने पण चांगला घट तयार करतात.
गोल खूप मोठे वापरले चित्र पाहिजे तसे आले नाही
नुसते लावल्या सारखे वाटतात तरी मी घट तयार
करण्याचा प्रयत्न केला आहे.करतांना मनाला व वेळ
चांगला गेला.जातो.

    DSCF3076 DSCF3079

     DSCF3077

श्रीयंत्र १

                                ॐ
      श्रीयंत्र
श्रीयंत्र हे महात्रिपुरसुंदरी चे प्रतीक आहे. या यंत्रातील
बीजमंत्र व मांडणी बारकाईने पाहिली म्हणजे समस्त
ब्रह्माण्डाची उत्पत्ती व विकास कसा झाला हे समजते.
या यंत्रातील मध्यबिंदू म्हणजे शक्तित्रिकोण असून याच्या
चारी बाजूंना एकूण नऊ त्रिकोण आहेत.त्यापैकी उर्ध्वमुखी
पाच त्रिकोण हे शाक्तिदेवतांचे द्दोतक असून ते ‘ शिवयुवती ‘
या नावाने ओळखले जातात.उर्वरित चार अधोमुखी त्रिकोण हे
शिवद्दोतक असून त्यांना ‘ श्रीकंठ ‘ असे संबोधिले जाते.
शुवयुती चे पाच त्रिकोण हे ब्रह्मांडातील पंचमहाभूते,
पंच तन्मात्रा, पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मंद्रिये व पंचप्राण यांचे
द्दोतक समजले जातात. मनुष्यदेहा बरोबर असलेले या त्रिकोण
याचे साम्य तक्, असृक, मांस, भेद व अस्थी या स्वरुपांशी दाखविले जाते.
ब्रह्मांडातील चित् , बुध्दी, अहंकार व मन यांचे प्रतीकात्मक चार श्रीकंठरुपी
कोन हे मनुष्यदेहात मज्जा, शुक्र ( वीर्य ), प्राण व जीव या रुपाणे वास करतात.
श्रीयंत्राचे प्रकार
श्रीयंत्राचे मुख्यत्वे करुन दोन प्रकार आहेत.
एक सृष्टिक्रमानुसार दोन संहारक्रमानुसार बनविलेले.
वरील वर्णन पहिल्या प्रकारच्या यंत्राचे आहे. श्रीमत् आद्द
शंकराचार्य याच तत्वाचे पूजक व प्रसारक होते. म्हणजे
याचा अर्थ दक्षिनमार्गी लोक या यंत्राची उपासना करतात.
दुसऱ्या प्रकारचे जे यंत्र आहे त्याची रचना पहिल्याच्या नेमकी
उलट आहे. म्हणजे ‘ शिवयुवती ‘ त्रिकोण अधोमुख व ‘ श्रीकंठ ‘
त्रिकोण ऊर्ध्वमुख असतात. कौलमतानुयायी याच यंत्राची
पूजा करत असल्याने याला ‘ कौलाचार श्रीयंत्र ‘ अशी तंत्रशास्त्रात
संज्ञा आहे.

DSCF3019 DSCF3020

DSCF3021 DSCF3022

%d bloggers like this: