आपले स्वागत आहे!

श्रीयंत्र १

                                ॐ
      श्रीयंत्र
श्रीयंत्र हे महात्रिपुरसुंदरी चे प्रतीक आहे. या यंत्रातील
बीजमंत्र व मांडणी बारकाईने पाहिली म्हणजे समस्त
ब्रह्माण्डाची उत्पत्ती व विकास कसा झाला हे समजते.
या यंत्रातील मध्यबिंदू म्हणजे शक्तित्रिकोण असून याच्या
चारी बाजूंना एकूण नऊ त्रिकोण आहेत.त्यापैकी उर्ध्वमुखी
पाच त्रिकोण हे शाक्तिदेवतांचे द्दोतक असून ते ‘ शिवयुवती ‘
या नावाने ओळखले जातात.उर्वरित चार अधोमुखी त्रिकोण हे
शिवद्दोतक असून त्यांना ‘ श्रीकंठ ‘ असे संबोधिले जाते.
शुवयुती चे पाच त्रिकोण हे ब्रह्मांडातील पंचमहाभूते,
पंच तन्मात्रा, पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मंद्रिये व पंचप्राण यांचे
द्दोतक समजले जातात. मनुष्यदेहा बरोबर असलेले या त्रिकोण
याचे साम्य तक्, असृक, मांस, भेद व अस्थी या स्वरुपांशी दाखविले जाते.
ब्रह्मांडातील चित् , बुध्दी, अहंकार व मन यांचे प्रतीकात्मक चार श्रीकंठरुपी
कोन हे मनुष्यदेहात मज्जा, शुक्र ( वीर्य ), प्राण व जीव या रुपाणे वास करतात.
श्रीयंत्राचे प्रकार
श्रीयंत्राचे मुख्यत्वे करुन दोन प्रकार आहेत.
एक सृष्टिक्रमानुसार दोन संहारक्रमानुसार बनविलेले.
वरील वर्णन पहिल्या प्रकारच्या यंत्राचे आहे. श्रीमत् आद्द
शंकराचार्य याच तत्वाचे पूजक व प्रसारक होते. म्हणजे
याचा अर्थ दक्षिनमार्गी लोक या यंत्राची उपासना करतात.
दुसऱ्या प्रकारचे जे यंत्र आहे त्याची रचना पहिल्याच्या नेमकी
उलट आहे. म्हणजे ‘ शिवयुवती ‘ त्रिकोण अधोमुख व ‘ श्रीकंठ ‘
त्रिकोण ऊर्ध्वमुख असतात. कौलमतानुयायी याच यंत्राची
पूजा करत असल्याने याला ‘ कौलाचार श्रीयंत्र ‘ अशी तंत्रशास्त्रात
संज्ञा आहे.

DSCF3019 DSCF3020

DSCF3021 DSCF3022

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: