आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 19, 2012

नवरात्र नैवेद्द चिकू


स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन शरदऋतु आश्र्विन शुक्लपक्ष नक्षत्र ज्येष्ठा
५ पंचमी शुक्रवार ललिता पंचमी, पंचरात्रोत्सवारंभ, घबाड
आहे.
तसेच तारीख दिनांक १९ अक्टोबर (१०) २०१२ साल आहे.
नवरात्र नवरात्रि म्हणून चिकू याचा नैवेद्द दाखविला आहे.

DSCF3102 DSCF3103

नवरात्र फुलं झेंडू !

                          ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन शरदऋतु आश्र्विन शुक्लपक्ष चालू आहे.
नवरात्र नवरात्रि चालू आहे.
तसेच अक्टोबर २०१२ साल आहे.नवरात्र नवरात्रि चालू आहे.
फूल झेंडू ची फुलं खुप छान बाजारात आली आहेत .
मी दहा १० रुपये पावशेर घेतली आहेत आणली आहेत.
नवरात्र फुलं झेंडू !

  DSCF3115 DSCF3117DSCF3121 DSCF3122

राग – दुर्गा

                                           ॐ
राग – दुर्गा
आरोह – सा रे म प, ध s सा
अवरोह – सा ध प, म s रे s सा
पकड – धं सा रे मरे, ध s रे s सा
विस्तार – ताना
१ ) सारेमपधपमरेसा , धपमरेसा (३) वेळा घेणे – धरे s सा
२ ) म प ध सा ध प ध प , मपधपमरेसा – (३) वेळा घेणे
३ ) सारेमपधसा धप // मपधप मरेसा – (३) वेळा घेणे
४) सारेमम रेम पप मप धध प ध सासा
सा s सा धप ध s धपम प s पमरे म s म रे सा (३) वेळा घेणे
५ ) रेम (४)रेमरेसा धंसा // धासा (४) धसाधपमप
रेम (४) रेमरेरेसा धं सा (३) रे सा –
८ मात्र त्रिताल
३ ४ ५ ६ ७ ८
म पप धप / म s रे सा / सा रेरे म
१ २
ध s धप
अंतरा – ३
मपपमप , ध s ध सा s सा सा धरेरेसा ,, २ वेळा घेणे
धसासा ध रे सा धप , म पंप म ध प म रें – ३ मात्रे पासून गत घेणे
पेस्ट मध्ये ताल याचे आकडे सरकतात .तरी ते सतार वाजवितांना माहीत आहेत.

          DSCF3120

श्रीयंत्र ४

                                      ॐ
                श्रीयंत्र
६ ) चौदा त्रिकोणसमूह – या चक्रात चौदा त्रिकोण असून त्यातील
देवता मानवी शरीरातील रक्तवाहिन्यांच्या निदर्शक आहेत.या देवता अशा :
सर्वसंक्षोभिणी, सर्वविद्राविणी, सर्वकर्षिणी, सर्वाह्रदिनी, सर्वसंमोहिनी,
सर्वस्तंभिनी, सर्ववशंकरी, सर्वरंजनी, सर्वोन्मादिनी, सर्वार्थसाधिनी,
सर्वसंपत्तिपूरणी, सर्वमंत्रमयी व सर्वव्दंदक्षयंकरी.
या देवता मानवी शरीरातील रक्तवाहिन्या, अलंबुखा,कुहु,विश्र्वोदरी,
वारणा, हस्तिजिव्हा,यशोवती, पयास्विनी, गंधारी, पूषा, शंखिणी,
सरस्वती, इडा, पिंगला व सुषम्ना यांच्या प्रतीक होत.
७ ) आठ पाकळ्यांचे कमळ – या चक्रात अष्टपद्मदल असून त्यात
अनंगकुसुमा, अनंगमेखला, अनंगमदना, अनंगमदनतुरा, अनंगरेखा,
अनंगवेगिनी, अनंगमदनांकुशा, अनंगमालिनी, या देवता आहेत. या सर्व
देवता मानवी शरीरातील वचन, आदान, गमन, विसर्ग, आनंद, उपादान,
दान, उपेक्षा या गुणांच्या निदर्शक होत.
८ ) सोळा पाकळ्यांचे कमळ – या चक्रात सोळा दळांचे कमळ आहे.
यातील देवता अशा : कामाकर्षिणी, बुध्याकर्षिणी, अहंकारकर्षिणी,
शब्दाकर्षिणी, रुपाकर्षिणी, रसाकर्षिणी, गन्धाकर्षिणी, चित्ताकर्षिणी,
धैर्याकर्षिणी, आणि शरीराकर्षिणी या देवता मानवी शरीरातील मन, बुध्दी,
अहंकार इत्यादी गुणांच्या निदर्शक होत.
९ ) भूपूर व त्यामधील इतर देवता – या चक्रात ‘ भूपूरचक्र ‘
असे नामाभिधान असून याचे चार भाग आहेत. ते असे :
( अ ) षोडशदल कमळाच्या बाहेरील तडाग – सदृश चार वर्तुळे.
( ब ) षोडशदलाला लागूंन असलेली बाहेरची पहिली रेखा.
(क ) षोडशदलाला लागून असलेली बहेरची दुसरी रेखा.
(ड ) वरील रेखांच्या बाहेरचा भाग.
या चार भागात क्रमश : १० मुद्राशक्ति, १० विक्पाल,
८ मातृका आणि १० सिध्दी अधिष्ठित आहेत.
या देवतास्वरुप यंत्राची स्थापना अनेक शक्तिपीठ यातून
केलेली आढळते. उदाहरणार्थ, विंध्यवासिनी पिठामध्ये
भैरव कुंडा जवळ ( जिल्हा फरुकाबाद ) येथे अन्नपूर्णा
मंदिराच्या परिसरात, काशी विश्र्वेश्र्वरा च्या मंदिरात,
कोल्हापूर येथील महालक्ष्मी च्या मंदिरात, तुळजापूर ला
भवानी मंदिरात, कांजीवरम ला कामाक्षी च्या मंदिरात
श्रीयंत्र याची स्थापना केलेली आढळते.

    DSCF3019 DSCF3020

   DSCF3021 DSCF3031

 DSCF3025 DSCF3030

श्रीयंत्र ३


श्रीयंत्र
नऊ चक्रांबद्दल माहिती

१ ) बिन्दु – शक्तित्रिकोण ह्यातील हा बिन्दु म्हणजे
महात्रिपुरसुंदरी किंवा ललितादेवी चे निवासस्थान होय.
मणिव्दीप हे सुधासागारात आहे.असे तांत्रिक मानतात,तेव्हा
बिन्दु हा व्दीपाचा निर्देशक होय, असे काही जाणकार मानतात.
२ ) त्रिकोण – हे चक्र त्रिकोण याचे बनलेले आहे.
त्रिकोणाच्या तीन कोनांवर कामरूप येथील कामेश्र्वरी, पूर्णगिरी
येथील वज्रेश्र्वरी ( या पिठाच्या देवतेचे नाव ‘ कालिका ‘ असे आहे.)
जालेश्र्वर येथील ‘ भगमालिनी ‘ ( या पिठाची देवता वज्रेश्र्वरी आहे.)
या देवता अधिष्ठित असून मध्यभागी उडियान येथील ‘ कात्यायनी ‘
देवता आहे.
३ ) त्रिकोणसमूह – या चक्रात आठ त्रिकोण आहेत.या
त्रिकोणांच्या बिन्दुंवर क्रमश : वशिनी, कामेश्र्वरी, मोहिनी, विमला,
अरुणा, जविनी, सर्वेश्र्वरी,व कौलिनी या देवता असून त्या मानवी
शरीरातील शीत, उष्ण, सुख, दु:ख, इच्छा, सत्य, रज व तम या गुणांचे
प्रतीक होत.
४ ) दहा त्रिकोणसमूह – या चक्रात दहा त्रिकोण आहेत.
त्यातील देवता अशा : सर्वज्ञा, सर्वशक्तिप्रदा,सर्वेश्र्वर्यप्रदा, सर्वज्ञानमयी,
सर्वव्याधिनाशिनी, सर्वधारा, सर्वपापहरा, सर्वानन्दमयी, सर्वरक्षा, व
सर्वइच्छाफलप्रदा, या होत. या देवता मानवी शरीरातील रेचक, पाचक,
शोषक, दाहक, प्लावक, क्षारक, उध्दारक, क्षोभक, जृम्भक व मोहक या
गुणांच्या प्रतीमूर्ती होत.
५ ) दहा त्रिकोणसमूह – या चक्रात दहा त्रिकोण आहेत.
त्यातील देवता अशा : सर्वसिध्दिप्रदा, सर्वसंपत्प्रदा, सर्वप्रियंकरी,
सर्वमंगलकारी, सर्वकामप्रदा, सर्वदु:खविमोचिनी, सर्वमृत्यूकाशमयी,
सर्वविघ्ननिवारिणी, सर्वांगसुंदरी, व सर्वसौभाग्यदायिनी या होत.

DSCF3019 DSCF3020

DSCF3021 DSCF3025

%d bloggers like this: