आपले स्वागत आहे!

श्रीयंत्र ३


श्रीयंत्र
नऊ चक्रांबद्दल माहिती

१ ) बिन्दु – शक्तित्रिकोण ह्यातील हा बिन्दु म्हणजे
महात्रिपुरसुंदरी किंवा ललितादेवी चे निवासस्थान होय.
मणिव्दीप हे सुधासागारात आहे.असे तांत्रिक मानतात,तेव्हा
बिन्दु हा व्दीपाचा निर्देशक होय, असे काही जाणकार मानतात.
२ ) त्रिकोण – हे चक्र त्रिकोण याचे बनलेले आहे.
त्रिकोणाच्या तीन कोनांवर कामरूप येथील कामेश्र्वरी, पूर्णगिरी
येथील वज्रेश्र्वरी ( या पिठाच्या देवतेचे नाव ‘ कालिका ‘ असे आहे.)
जालेश्र्वर येथील ‘ भगमालिनी ‘ ( या पिठाची देवता वज्रेश्र्वरी आहे.)
या देवता अधिष्ठित असून मध्यभागी उडियान येथील ‘ कात्यायनी ‘
देवता आहे.
३ ) त्रिकोणसमूह – या चक्रात आठ त्रिकोण आहेत.या
त्रिकोणांच्या बिन्दुंवर क्रमश : वशिनी, कामेश्र्वरी, मोहिनी, विमला,
अरुणा, जविनी, सर्वेश्र्वरी,व कौलिनी या देवता असून त्या मानवी
शरीरातील शीत, उष्ण, सुख, दु:ख, इच्छा, सत्य, रज व तम या गुणांचे
प्रतीक होत.
४ ) दहा त्रिकोणसमूह – या चक्रात दहा त्रिकोण आहेत.
त्यातील देवता अशा : सर्वज्ञा, सर्वशक्तिप्रदा,सर्वेश्र्वर्यप्रदा, सर्वज्ञानमयी,
सर्वव्याधिनाशिनी, सर्वधारा, सर्वपापहरा, सर्वानन्दमयी, सर्वरक्षा, व
सर्वइच्छाफलप्रदा, या होत. या देवता मानवी शरीरातील रेचक, पाचक,
शोषक, दाहक, प्लावक, क्षारक, उध्दारक, क्षोभक, जृम्भक व मोहक या
गुणांच्या प्रतीमूर्ती होत.
५ ) दहा त्रिकोणसमूह – या चक्रात दहा त्रिकोण आहेत.
त्यातील देवता अशा : सर्वसिध्दिप्रदा, सर्वसंपत्प्रदा, सर्वप्रियंकरी,
सर्वमंगलकारी, सर्वकामप्रदा, सर्वदु:खविमोचिनी, सर्वमृत्यूकाशमयी,
सर्वविघ्ननिवारिणी, सर्वांगसुंदरी, व सर्वसौभाग्यदायिनी या होत.

DSCF3019 DSCF3020

DSCF3021 DSCF3025

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: