ॐ
श्रीयंत्र
एकदा वैकुंठात भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणाले,
” लक्ष्मी, तू फार चंचल आहेस. दीर्घकाळ तू एके ठिकाणी
राहात नाहीस, हे काही मला योग्य वाटत नाही. “
त्यावर लक्ष्मी ताडकन् म्हणाली, ” प्राणनाथ,
माझा स्वभाव चंचल आहे खरा; परंतु मला दीर्घकाळ एकाच
ठिकाणी वास्तव्य करण्यास नि: संशय आनंद होतो आणि मानूनच
मी कोठे वास्तव्य करते, ते लक्षपूर्वक ऐका, जेथे अतिथी अभ्यागतांची
दान, मान इत्यादी रूपाने सेवा केली जाते तसेच अनाथ अंध पंगू,
गरिबांना प्रेमाने पोटभर जेवू घातले जाते आणि सज्जनांची व
ब्राह्मण यांची आदरपूर्वक सेवा केली जाते, इतकेच नव्हे तर
देव, देवता व पितरांची पूजा, भक्ती व श्राध्द योग्य रीतीने केले जाते,
प्रामाणिकपणे द्रव्यसंचय करून सन्मार्गाने त्याचा विनियोग केला जातो.
शांती, दया, दाक्षिण्य इत्यादी गुण जेथे असतात,
ज्या घरात सर्वत्र आनंद असतो, कलह, तंटा व निष्टूर
भाषा आहे तिथे जिथे थारा नसतो व स्त्रीवर्ग ही गृहकृत्यदक्ष
असतो अशा सद् गृहस्थांचे घरी सदैव वास्तव्य करण्यास मी
उत्सुक असते.”

ब्लॉग आवडला? इतरांना सांगा
Like this:
Like Loading...