आपले स्वागत आहे!

श्रीयंत्र ९


श्रीयंत्र

श्रीयंत्र निर्मितीची पौराणिक कथा
श्रीयंत्र

ची संदर्भात पुराणात एक कथा

आढळते ती अशी – एकदा लक्ष्मी रुसून पृथ्वीवरून वैकुंठात
निघून गेली. तिच्या अनुपस्थितीमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्यामुळे
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र सर्वच चिंतातूर झाले. तेव्हा वसिष्ठांनी
प्रतिज्ञा केली, ” मी लक्ष्मीला प्रसन्न करून पुन्हा पृथ्वीतलावर आणीन .”
त्याप्रमाणे वसिष्ठ वैकुंठात जाऊन लक्ष्मीपुढे दत्त म्हणून उभे राहिले.
त्यांनी लक्ष्मीला पृथ्वीवर येण्याची वारंवार विनंती व आर्जवं केली ; पण ती
आपल्याच तोऱ्यात होती. ती आणखी फुरंगटून बसली तेव्हा वसिष्ठांनी
भगवान विष्णूंना साकडे घातले. त्यासाठी घोर तपश्र्चर्या आरंभिली.
यथावकाश ते प्रसन्न झाले तेव्हा वसिष्ठ त्यांना म्हणाले, ” हे भगवान्
लक्ष्मीच्या अनुपस्थितिमुळे पृथ्वीवर हाहाकार माजला आहे. सर्व व्यवहार
थंडावले आहेत. उत्साह मावळला आहे आणि सर्वत्र नैराश्य भरून राहिले आहे..
भगवान विष्णूं नी वसिष्ठांना धीर दिला आणि ते त्यांना
घेऊन तडक लक्ष्मी च्या महालात गेले. तिची समजूत घालण्याचा
विष्णूं नी आटोकाट प्रयत्न केला; पण पृथ्वीवर जाण्यास तिने स्पष्ट
शब्दात नकार देऊन दोघांची बोळवण केली. अपयश पदरी घेऊन वसिष्ठ
विमनस्क अवस्थेत पृथ्वीवर परतले आणि मोठ्या आशेने त्याच्याभोवती गोळा
झालेल्या समस्त पृथ्वीवासी यांना त्यांनी लक्ष्मी चा निर्णय ऐकवला तेव्हा सर्वजण
हताश व निराश झाले.
शेवटी सर्वजण गाऱ्हाणे घेऊन ब्रहस्पतीं कडे गेले. खूप विचार करून बृहस्पतीं नी
श्रीयंत्र निर्मितीचा उपाय सुचविला. तो सर्वां ना च पाटला. मग ब्रहस्पतीं च्या मार्गदर्शनाखाली
शेकडो कारागिरांनी एका अतिभव्य श्रीयंत्र याची निर्मिती यथावकाश पूर्ण केली.
दोनच दिवसांनी धनत्रयोदशी ला त्याची विधिवत् षोडशोपचार पूजा करून
मंत्रघोषात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि काय आश्र्चर्य साक्षात लक्ष्मी
सुहास्यवदनाने पृथ्वीवर अवतीर्ण झाली व म्हनाली, ” या श्रीयंत्र याची
प्रतिष्ठापनेमुळे मला येथे यावेच लागले. कारण तेच माझे निवासस्थान
असून त्यात माझा आत्मा वास करतो.”

DSCF3019 DSCF3020

DSCF3021 DSCF3031

DSCF3045 DSCF3040

DSCF3025 DSCF3033

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: