आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 30, 2012

काकडी चे थालिपीठ

                                             ॐ
काकडी चे थालिपीठ : दहा १० रुपये ला पावशेर काकडी आणली.
मिळाली.काकडी धुतली किसनीने काकडी साला सगट किसली.
काकडी किसलेली ला पाणी सुटू दिले.नंतर काकडी व काकडीचे पाणी
ह्यात एक १ बाऊल ज्वारीचे पीठ घातले.पाव बाऊल हरबरा डाळीचे पीठ
घातले.तेल याचे मोहन घातले. चवी प्रमाणे मीठ, लाल तिखट घा तले.हळद
रंग चव म्हणून घातली.हिंग थोडा घातला.काकडी व काकडीचे पाणी ज्वारीचे पीठ
हरबरा डाळीचे पीठ मसाला एकत्र कालविला वरून पाणी घातले नाही.
तवा याला तेल लावले.तवा भर बसेल असा काकडी व पीठ याचा गोळा घेतला.
तवा ह्यात तेल घातले त्यावर गोळा ठापालां. मोठा केला.हाताच्या बोटाने
थालीपीठ याला भोक पाडली.पेटत्या गॅस वर तवा लावलेल्या काकडीचा थालीपिठा चा
तवा ठेवला. दोन्ही बाजूने काकडी चे पीठाचे थालीपीठ भाजले.
ताटात घातले.वाढले.दही बाऊल मध्ये घातले.दही व काकाडो चेपाणी ज्वारीचे पीठ ,
हरबरा डाळीचे पीठ मीठ,लाल तिखट ,हळद , हिंग सर्व मिळून भोक पाडलेले काकडी चे
तालीपीठ तयार झाले.केले.दही बरोबर खाण्यास दिले.

           DSCF3123 DSCF3126

%d bloggers like this: