श्री ब्रह्मचैतन्य
ॐ
श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
श्री क्षेत्र गोंदवले
गोदंवले बुद्रुक अथवा ” थोरले गोंदवले ”
हे गाव सातारा – पंढरपूर रसत्यावर साताऱ्या पासून
६४ किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून सासवड-फलटण
मार्गे गोंदवल्यास थेट जाणाऱ्या स्टेट ट्रान्स्पोर्ट बसेसं आहेत.
तसेच मुंबई, वसई, ठाणे,कराड,विटे.सांगली,सोलापूर, पंढरपूर,
बार्शी, अक्कलकोट कोल्हापूर ते गोंदवले पण लाल यस स्टी आहे.S .T .आहे.
श्रीसमाधि मंदिर, गोंदवले बस पासून २०० मीटर अंतरावर आहे.
समाधी तळघरात असून तिच्यावर च्या मजल्यावर श्रीगोपालकृष्ण याची
मूर्ती आहे. याच परिसरात श्रीआईसाहेब यांचे मंदिर आहे.
नाममंदिर, गोशाळा, उतरण्यासाठी खोल्या, स्वयंपाक घर वगैरे वास्तूत आहे.
श्रीसमाधि मंदिरात पहाटे भूपाळ्या, काकड आरती, त्रिकाळ पूजा अभिषेक
नामजप, विष्णुसहस्त्रनाम आदि स्तोत्रे , पंचपदी भजन शेजारती असा नित्योपासना
कार्यक्रम असतो.या खेरीज श्रीरामनवमी गुरुपौर्णिमा गोकुळाष्टमी व दासनवमी
हे उत्सव नामजप सप्ताहासह साजरे होतात.
पुण्यतिथि उत्सव मार्गशीर्ष वद्द प्रतिपदा पासून दसमी पर्यंत असतो.
दसमी स पहाटे ५-५० वाजता निर्यानाकाल साजरा होतो.
राममंदिर आहे. नदी आहे.गोंदवले गावात श्रीमहाराज यांची जन्माची
राहण्याची वास्तू आहे, व ‘ थोरले ‘ राममंदिर,’ धाकटे ‘ राममंदिर,
दत्तमंदिर शनिमंदिर ही त्यांनी स्थापन केलेली मंदिरे आहेत.
या सर्व वास्तूंची मालकी श्री महाराजांच्या व्यवस्थापत्राप्रमाणे
नेमलेल्या विस्वस्तांकडे आहे.
श्रीमहाराजांचे आजोबा दृष्टांत होऊन मिळालेल्या
श्रीविठ्ठल – रखुमाई च्या मूर्ती त्याच आवारात आहेत .
१९६६ जुलै मध्ये पहिल्यांदी आमचं लग्न झाल्यावरती पहिल्यांदी
जाऊन आलो होतो. तेंव्हा जमीन शेणाने सारवायाच्या खोल्या होत्या
लांब लांब खोल्या होत्या. फुलपात्र व वाटया स्वतः भक्त लोक राखेनी
घासून पाण्याने स्वछ करत असत. नंतर नंतर ताट वाट्या आली.
आता फरशीच्या खोल्या झाल्या आहेत. पाण्याची पाईप लाइन आली आहे.
आता खूप बदल केला आहे !
आमच्या मुलांना पण शेणाने सारवलेल्या खोल्या आठवतात.
आमच लग्न झाल तेव्हा महिना च्या आत मी व हे
गोंदवले येथे जाऊन आलो !त्यावेळेला ! आताही हि
त्यावेळेच सर्व गोंदवले व देऊळ श्रीमहाराज यांची समाधी
आज हि आठवत आहे.!
अजून पण आम्ही मी सौ सुनबाई व मुले
गोंदवले येथे श्रीमहाराज यांच्या दर्शन घेण्यासाठी जात असतो.!
ॐ
श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
जन्म माघ शुध्द व्दादशी शके 1766 ( १७६६ )
पुण्यतिथी मार्गशीर्ष वद्द दशमी शके 1835 ( १८३५ )