आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 1, 2012

श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने १ नोव्हेंबर

|| श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर ||

प्रवचने १ नोव्हेंबर

गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे.

गीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे. वेद हे देवाच्या नि:श्वातून निघाले,तर गीता ही त्याच्या
मुखातून निघाली. गीतेचा विषय कोणता ? गीतेचा विषय म्हणजे मोहाचा नाश करण्याचे
तत्वदृष्ट्या आणि साधनदृष्ट्या विवेचन, हा होय. गीतेची सुरुवात म्हणजे अर्जुनाला मोह झाला;

याचा अर्थ असा की, त्याला कर्तेपणाचा अभिमानाने असमाधान उत्पन्न झाले , आणि त्यामुळे काय करावे आणि काय न करावे याची शंका त्याला उत्पन्न झाली. गीतेचा शेवट म्हणजे अर्जुनाला मोह नाश पावला;

याचा अर्थ असा की, कर्ता परमात्मा आहे हे निश्चित झाल्यामुळे जीवाच्या कर्माचे सुखदु:ख संपले.

खरोखर, गीतेचे रहस्य सांगावे ज्ञानेश्वर महाराजांनीच. भारतीय युध्दामध्ये परमात्मा पितांबर नेसून

अर्जुनाच्या रथावर बसून रणांगणावर अर्जुनाला गीता सांगते झाले. पुढे हजारो वर्षानी, भगवंत कपडे बदलून आले आणि त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली.

ज्ञानेश्वरी ही भगवंताची वाणी होय.त्यात सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करावे.
‘मी मागे आहे, तू पुढे चल.’ हेच भगवंतांनी आपणा सर्वांना सांगितले आहे.

DSCF3225  DSCF3226

पंचांग

                                        ॐ
पंचांग : श्रीशालिवाहन राजा यांनी स्वस्ति शक व नाम संवत्सर
सुरु केले आहे.नाम ६० आहेत एकच नाम परत वेळा येते.
आता स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम चालू आहे.
पंचाग चैत्र पाडवा ला सुरु होते.तसेच वर्ष पण चैत्र पाडवा ला
सुरु होते.१२ महिने असतात व तीन वर्षाने येणारे अधिक महिना
पंचांग मध्ये असतात. १ ) चैत्र २ ) वैशाख ( ३ जेष्ठ ४ ) आषाढ ५ ) श्रावण
६ )भाद्रपद ७ ) आश्र्विन ८ ) कार्तिक ९ ) मार्गशीर्ष १० ) पौष ११ ) माघ
१२ ) फाल्गुन असे बारा महिने असतात. फाल्गुन शेवट चा महिना असतो.
अधिक महिना तीन ३ वर्षाने केंव्हा ही येतो.
पंचांग प्रमाणे प्रत्येक महिना मध्ये सण वेगवेगळे असतात.
ती माहिती मी लिहिली आहे. पंचांग मध्ये वर्षा चे मुहूर्त असतात.
तिथी वार राशिप्रवेश दक्षिणायन उत्तरायण असते सहा ऋतु असतात.
१ वसंतऋतु २ ग्रीष्मऋतु ३ वर्षाऋतु ४ शरदऋतु ५ हेमंतऋतु ६ शिशिरऋतु
दोन महिना मध्ये १ ऋतु असतात.
पंचांग चंद्र कसा फिरतो त्यावर लिहिलेले असते.
२७ नक्षत्र व १२ राशि लिहिलेले आहेत.
|| नवग्रह स्तोत्र || आहेत .पंचांग मध्ये
मी सर्व लिहून काढली आहेत.
सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनि राहु केतु हे
ग्रहशील चक्र आहेत.
कोणता ही तिथी व वार लिहिलेले असतात.दोन २ तिथी
एका वारी येतात तरी १ ते १४ शुक्लपक्ष १५ ला पौर्णिमा असते
१ ते १४ कृष्णपक्ष १५ अमावास्या असते.
१ च्या तेथे वार असतो. नक्षत्र योग करण चंद्र राशिप्रेवेश व
इंग्रजी साल या ची तारीख दिनांक असते. तिथी ची माहिती असते.
१ प्रतिपदा २ व्दितीया २ त्रीताया ४ शुक्लपक्ष विनायक चतुर्थी
४ संकष्ट चतुर्थी मंगळवार ला चतुर्थी आली तर अंगारिका
चतुर्थी असते. ५ पंचमी ६ षष्ठी ७ सप्तमी ८ अष्टमी ९ नवमी
१० दशमी ११ एकादशी १२ घबाड १३ प्रदोष शिवारात्रि १४ चतुर्दशी
१५ शुक्लपक्ष पौर्णिमा ३० कृष्णपक्ष अमावास्या १४ पर्यंत
शुक्लपक्ष१४ व कृष्णपक्ष १४ सारखे तिथी असते १४ चौदा नंतर
१५ पौर्णिमा शुक्लपक्ष व १४ नंतर कृष्णपक्ष ३० आमावस्या असते.
मासवार राशिभविष्य आहे.
भारातात दिसणारी ग्रहणे याची माहिती आहे.
अनंत चतुर्दशी ची माहिती आहे. नवरात्र विषयी माहिती आहे.
गौरीपूजन याची माहिती आहे. श्राध्द विषयी माहिती आहे.
गर्भवती व सण / व्रते विषयी माहिती आहे. एका वर्षात
कोणते कार्ये करावीत याची माहिती आहे.सोयर / सूतक
धार्मिक आचरण याची माहिती आहे.
चंद्र नक्षत्र चरण समाप्ति भा.प्र. वेळेत
शुभ दिवस आनंदी दिवस चांगला दिवस १४ नं चांगला
चांगला दिवस शुभ दिवस उत्तम दिवस चांगला दिवस ११ नं चांगला
२० प्र.वर्ज्य चांगला दिवस १७ प.चांगला १५ प.वर्ज्य
असे दिवस पाहता येतात हि माहिती असते.
साखरपुडा डोहाळ जेवण बारसे जावळ गृहप्रवेश ( लौकिक )
हि माहिती पंचांग मध्ये असते.
ही सर्व माहिती सर्व साल च्या पंचांग मध्ये असते.
मी स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
चे पंचांग दाखवित आहे.

 DSCF3177 DSCF3174   DSCF3101 DSCF3175

%d bloggers like this: